ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

गरज भासल्यास दूध महासंघ ताब्यात घेऊ : मुख्यमंत्र्यांचा इशारा

राज्यातील दूध पुरवठा सुरळीत करण्यासाठी गरज भासल्यास सध्याचा दूध महासंघ ताब्यात घेऊन उत्तर गोव्यासाठी वेगळा महासंघ स्थापन करण्याची सरकारची तयारी आहे, असे सांगून दूध महासंघ आपल्या व्यवसायात वाढ न करता हितसंबंध जपण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत विष्णू वाघ यांनी आणलेल्या यासंबंधीच्या लक्षवेधी सूचनेवर सांगितले. Read More »

रोड शो साठी १४ कोटी रु. खर्चून काय मिळवले?

विरोधकांकडून पर्यटनमंत्री धारेवर गोवा पर्यटन खात्याने विदेशात आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळावे व रोड शो यांवर गेल्या दोन वर्षांच्या काळात १४ कोटी रु. खर्च केल्याच्या प्रश्‍नावरून काल विरोधी आमदारांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना धारेवर धरून हे व्यापारी मेळावे व रोड शो यातून काय निष्पन्न झाले ते सांगण्याचा हट्ट धरला. मंत्री दिलीप परुळेकर यांनी हे व्यापारी मेळावे व रोड शोमुळे गोव्यात पर्यटकांचा आकडा ... Read More »

नारायण राणेंकडून राजीनामा मागे

महाराष्ट्रात नेतृत्वबदल करणार नसल्याबाबत कॉंग्रेस श्रेष्ठी ठाम असतानाही नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा काल मागे घेतला. आपणास ‘योग्य तो आदर’ दिला जाईल असे वचन दिले गेल्याने आपण ही तडजोड केल्याचे ते म्हणाले. पंधरवड्यापूर्वी राणे यांनी नेतृत्वबदल होत नसल्याच्या निषेधार्थ मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तसेच सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाकाली कॉंग्रेस आगामी निवडणुकीत पराभूत होईल, असे भाकित वर्तविले होते व आपणास पराभवाचे ... Read More »

स्वतंत्र केडर : सप्टेंबरपर्यंत निर्णय

गोव्याचे आयएएस अधिकार्‍यांच्या वेगळ्या केडरसाठीची जी मागणी केलेली आहे त्यासंबंधी येत्या सप्टेंबरपर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार पांडुरंग मडकईकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. Read More »

अंजुणे धरण भरले; आज दरवाजे उघडणार

अंजुणे धरणाच्या पातळीत ९० मीटरपर्यंत वाढ झालेली असून धरणाची क्षमता ९३.२ मीटर असल्याने आज बुधवारी धरणाचे दोन किंवा चार दरवाजे उघडून सुकतीच्यावेळी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ज्ञानेश्‍वर सालेलकर यांनी दिली. धरण परिसरात मंगळवारी २ इंचाहून अधिक पावसाची नोंद झालेली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण उशिरा भरल्याचे सांगण्यात आले. Read More »

पेट्रोलवर सवलतीमुळे २०० कोटी महसूल घटला

खाण व्यवसाय बंद झाल्याने कर रद्द केल्याने पेट्रोलवर मूल्यवर्धित कर रद्द केल्यामुळे २०० कोटी रुपये महसूल घटला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितले. Read More »

गुजरातचे राज्यपाल कोहलींकडे गोव्याचा ताबा

गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा देण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनातून जारी आदेशात म्हटले आहे. सध्या गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा असलेल्या मार्गारेट आल्वा यांचा कार्यकाळ ५ ऑगस्टला संपल्यामुले ही व्यवस्था करण्यात आली आहे. Read More »

गोव्यातून २७४७ कोटींची बेकायदेशीर खनिज निर्यात

शाह आयोगाचा संसदेला अहवाल; कंपन्यांकडून व्याजासह नुकसान वसुलण्याची शिफारस गोव्यातून २७४७ कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खनिजाची निर्यात झाली असल्याचे शहा आयोगाने काल संसदेला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. देशातील बेकायदेशीर खनिज व्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. एम. बी. शाह आयोगाने काल आपला दुसरा अहवाल सादर केला. दरम्यान, झारखंडमध्ये सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा झाल्याचे व उदिशात खाण कंपन्यांनी इतर ... Read More »

विधानसभा वृत्त

अब्दुल शेखचा मृत्यू हृदयविकारानेच : पार्सेकर १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेताना अब्दुल सतार शेख या इसमाचे जे निधन झाले ते १०८ रुग्णवाहिकेत प्राणवायू (ऑक्सिजन) नसल्याने नव्हे तर सदर व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने झाला अशी माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल गोवा विधानसभेत दिली. Read More »

अन्न सुरक्षा कायद्याची सप्टेंबर २०१५ पर्यंत अंमलबजावणी

केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत म्हणजे सप्टेंबर २०१५ पर्यंत अन्न सुरक्षा कायद्याची गोव्यात अंमलबजावणी करणार असल्याचे नागरी पुरवठा मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी काल विधानसभेत आपल्या खात्याच्या मागणीवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले. Read More »