ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

भारत-पाक लष्कर भिडले; सीमेवर तणाव वाढला

४० भारतीय चौक्यांवर गोळीबार जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर काल पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर तणाव वाढला. भारत-पाकिस्तानचे लष्कर भिडल्याने भीतीने सीमेलगतच्या हजारो लोकांनी घरदार सोडून पलायन सुरू केले आहे. पाकिस्तानच्या बाजूने होत असलेल्या गोळीबारात भारतीय लष्करानेही आता चोख प्रत्युत्तर द्यायला सुरू केले आहे. Read More »

विशेष राज्य दर्जा : सर्वपक्षीय शिष्टमंडळ गृहमंत्र्यांकडे नेणार

कायदा समितीलाही बरोबर घेणार गोव्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ व कायदा समितीला नेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मुव्हमेंट फॉर स्पेशल स्टेटस या संघटनेला दिले, अशी माहिती या संघटनेचे नेते प्रजल साखरदांडे यांनी काल दिली. Read More »

४७ जणांच्या फसवणूक प्रकरणी अल्पवयीनाने केले आरोप मान्य

१९ लाख पूजा शंकेला दिल्याची जबानी सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४७ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी अल्पवयीन संशयित आरोपीने आपण पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. मात्र त्याची साथीदार संशयित आरोपी पूजा शंके (३३) हिने आपण एकही पैसा घेतलेला नसून आपण फक्त नोकरी करीत असल्याचे सांगितले. तथापि तिला १९ लाख रुपये पोहोचल्याचे अल्पवयीन आरोपीने काल मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी कुडचडे पोलिसांना ... Read More »

ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने पुन्हा चक्रीवादळ घोंघावतेय

ओडिशाला संहारक फैलान वादळाने फटका दिल्यानंतर नेमक्या एका वर्षाच्या कालावधीनंतर आता या राज्यावर आणखी एक वादळ चाल करून येत असल्याची माहिती वेधशाळेतर्फे देण्यात आली आहे. ‘या वादळाची ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल सुरू असून तेनस्सरीत किनार्‍यासह अंदमानच्या सागरी भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास प्रारंभ झाला आहे. येत्या २४ तासात त्याची तीव्रता वाढणार आहे,’ अशी माहिती येथील भारतीय वेधशाळेचे संचालक सारत ... Read More »

दहावी, बारावीच्या ऑनलाईन अर्जातील दोष सुधारावेत : राष्ट्रवादी

गोव शालान्त मंडळाने यंदा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची सोय केलेली आहे. ती चांगली असली तरी या अर्जात विद्यार्थ्यांच्या वडिलांचे नाव भरण्यासाठी जी जागा ठेवण्यात आलेली आहे ती खूपच कमी असल्याने विद्यार्थ्यांपुढे समस्या निर्माण झालेली आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केला. Read More »

शॅक उभारणीसाठी ८० टक्के जागा निश्‍चित

पर्यटन हंगामात समुद्र किनार्‍यांवर शॅक उभारण्यासाठी ८० टक्के जागा निश्‍चित करण्याचे काम पूर्ण झाले असून पुढील तीन-चार दिवसांत उर्वरित २० टक्के जागा निश्‍चित केल्या जातील. निश्‍चित केलेल्या जागांवर शॅक उभारण्यास हरकत नसल्याचे पर्यटन खात्याचे संचालक अभ्यंकर यांनी शॅक मालक संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. Read More »

खांडेपार पुलासाठी निविदा जारी

सुमारे १८० कोटी रुपये खर्चाच्या खांडेपार पुलाची निविदा जारी केली असून जुवारी नदीवरील सहापदरी नव्या पुलाचा मार्ग जवळ जवळ निश्‍चित झाला असून दिवाळीनंतर डीपीआर केंद्राला पाठविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले. ढवळीकर यांनी या विषयावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. Read More »

एफसी गोवाला चाहत्यांचा उत्तम पाठिंबा

येत्या १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल)मधील आठ संघापैकी एक असलेल्या एफसी गोवाला आतापासूनच चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. Read More »

पाकिस्तानकडून सीमेवर  गोळीबार चालूच; ५ मृत्युमुखी

भारताकडून पुन्हा ताकीद आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने गोळीर चालूच आहे. सोमवारी पुन्हा जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या तुफान गोळीबारात पाच नागरीक मृत्युमुखी पडले तर २९ अन्य जखमी झाले. दरम्यान, पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करण्याची घटना घडली. Read More »

सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीबाबत वाहतूक खात्याचे घुमजाव

दुचाकीस्वारालाच हेल्मेट सक्ती : देसाई राज्यातील महामार्गांवरून दुचाकीस्वराच्या मागे बसून प्रवास करणार्‍यांना हेल्मेटची सक्ती करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला होता तो मागे घेण्यात आलेला असून हेल्मेटची सक्ती ही फक्त दुचाकी चालवणार्‍यांसाठीच असेल असे वाहतूक खात्याचे संचालक अरुण यांनी काल सांगितले. जे दुचाकीचालक हेल्मेट न घालता महामार्गांवरून प्रवास करतील त्यांच्या दुचाक्या ताब्यात घेण्यात येतील व हेल्मेट आणल्यानंतरच दुचाक्या घेऊन त्यांना पुढच्या ... Read More »