ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

पत्नीचा जंगलात नेऊन निर्घृण खून

माटणे (महाराष्ट्र) येथील रमाकांत गावस याने आपली पत्नी रेश्मा गावस (४०) हिचा न्हावेली, कुडणे येथील जंगलात नेऊन गळा आवळून खून करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित रमाकांत याने खुनाची कबुली दिली असून पोलिसांनी कुडणे येथे खून केलेल्या जागी जाऊन कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला आहे. Read More »

सर्वोच्च न्यायालयाची खनिज मर्यादाविषयक समिती परतली

सर्वोच्च न्यायालयाची खनिज मर्यादाविषयक समिती खाण संबंधिच्या सर्व घटकांकडून माहिती घेऊन बुधवारी संध्याकाळी येथून रवाना झाली असून दि. २१ रोजी समिती आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करील. राज्यात किती खनिजाचे उत्खनन करणे शक्य आहे. तसेच त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकेल, यासंबंधीची माहिती या समितीने गोळा केली आहे. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालय कोणती भूमिका घेईल हे स्पष्ट होऊ ... Read More »

महिला चालकयुक्त टॅक्सीसेवेस प्रारंभ

पर्यटन विकास महामंडळाने महिला चालक असलेल्या पर्यटक टॅक्सी सुरू करून महिलांना वेगळ्या व्यवसायाची दिशा दाखविली आहे. गोव्यात येणार्‍या महिला पर्यटकांना किंवा कुटुंबांना या योजनेचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. Read More »

सरकारच्या कंत्राटी कामगारांचे सेवेतून कमी केल्यास आंदोलन

विविध सरकारी खाती, महामंडळे व स्वायत्त संस्था यात कंत्राटी पध्दतीवर काम करणार्‍या सुमारे १२०० कामगारांना सेवेतून काढून टाकण्याच्या हालचाली राज्य सरकारने केलेल्या असून हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. तसेच पर्रीकर सरकारने हा निर्णय बदलला नाही तर १० दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला जाईल, असा इशारा कामगार नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेतून बोलताना दिला. सरकारला आपला निर्णय ... Read More »

प्रवेश कर हटवून इंधनावरील कर वाढवण्याचा प्रस्ताव

येत्या अर्थसंकल्पाच्यावेळी राज्याच्या हद्दीवरील प्रवेशकराचा आढावा घेऊन इंधनावरील करात दोन ते तीन रुपये वाढ करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना सांगितले. इंधनाच्या करात किरकोळ वाढ करून प्रवेश शुल्क रद्द करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास महसुलावर परिणाम होणार नाही, परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही, असे ते म्हणाले. Read More »

डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिझेलच्या दरात कपात झाली तर एवढी मोठी कपात होण्याची चार वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. निवडणूक आचारसंहिता असल्याने १९ ऑक्टोबरनंतर दर कपातीची घोषणा होईल. Read More »

हळदोण्यात विवाहितेची आत्महत्या

हळदोणे येथील विधी उर्फ शांती वासुदेव उर्फ रवी केरकर या २३ वर्षीय विवाहित महिलेने काल सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घराच्या छप्पराच्या वाशाला दुपट्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. Read More »

महाराष्ट्रात ६४ %, हरयाणात विक्रमी ७५% मतदान

काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६४ टक्के तर हरयाणात आतापर्यंतचे सर्वाधिक विक्रमी असे ७५.८ टक्के मतदान झाले. मतदारांनी कुणाच्या भाग्यात काय लिहून ठेवले आहे हे आता रविवार दि. १९ रोजी मतमोजणीच्या दिवशी समजेल. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघांतून ८.३३ कोटी मतदारांनी हक्क बजावल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात १३व्या विधानसभा निवडीच्या रिंगणात पक्षांचे व अपक्ष मिळून ४१०० उमेदवार आहेत. Read More »

चेन्नईचा एफसी गोवावर निसटता विजय

स्थानिक एफसी गोवाचा २-१ असा पराभव करून चेन्नईन एफसीने हिरो इंडियन सुपर लीगमध्ये पहिला विजय नोंदवला. सामनावीर म्हणून चेन्नईन एफसीचा आघाडीपटू बलवंत सिंगची निवड करण्यात आली. Read More »

कॉलेज परिसरातील काळ्या काचांच्या गाड्यांविरुध्द लवकरच मोहीम

गोव्यातील महाविद्यालयात जे विद्यार्थी तसेच अन्य कोण काळ्या आरशांच्या चारचाकी गाड्या घेऊन येत असतात त्यांच्याविरुध्द लवकरच मोहीम उघडण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस विभागातील सूत्रांनी काल सांगितले. चारचाकी गाड्यांच्या आरशांवर काळ्या फिल्म्स बसवणे हे मोटर वाहन कायद्याच्या विरोधात आहे. Read More »