ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

खाण अवलंबितांना करदात्यांचा पैसा का?

सावळ : खाण घोटाळा करणार्‍यांकडून पैसे वसूल करा राज्यातील खनिजवाहू ट्रकमालक, यंत्रसामुग्रीचे मालक व अन्य खाण अवलंबितांना जनतेच्या करातून गोळा केलेला पैसा न देण्याची जोरदार मागणी डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी काल अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी केली. Read More »

किती नोकर्‍या निर्माण केल्या : राणे

गुंतवणूक धोरण राबवून राज्यात ५० हजार नोकर्‍या निर्माण करण्याची घोषणा करणर्‍या सरकारने आतापर्यंत किती रोजगाराच्या संधी निर्माण केल्या ते आधी सांगावे, असे आव्हान विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी काल विधानसभेत सरकारला दिले. महागाई वाढत असल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. Read More »

दुसर्‍या बहिणीचा शोध जारी; भावाविरुद्ध गुन्हा नोंद

आमोणा पुलावरून नदीत उडी टाकलेल्या दोघा बहिणींपैकी एकीचा कालही शोध घेण्यात आला मात्र ती सापडू शकली नाही. दरम्यान, दुसर्‍या बहिणीस तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात यश आले होते. दरम्यान, भावाने मारल्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे वाचलेल्या सुजाताने सांगितले होते त्यामुळे फोंडा पोलिसांनी भा.दं.सं. ३०६ कलमाखाली भाऊ रामचंद्र विठ्ठल गावस याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. Read More »

तिळारीचा तिढा : प्रकल्पग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारकडे तरतूद नाही

गोव्याकडे पैसे मागण्याची मंत्र्यांची सूचना महाराष्ट्र – गोवा या दोन्ही राज्यांदरम्यान पार पडलेल्या नियोजन मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे तिळारी प्रकल्पग्रस्तांना देय रकमेबाबत प्रकल्प अधिकार्‍यांकडून निधीची तरतूद करण्याबाबत प्रकरण दाखल करण्यास प्रकल्प अधिकारी कमी पडल्याचे काल जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आढळून आले. Read More »

राज्याच्या पर्यटनावर मुतालिक यांचा परिणाम : सरदेसाई

मुतालिक नावाचा जो आजार स्वीकारलेला आहे त्याचा राज्याच्या पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम होणार आहे, असा इशारा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिला. केंद्रात मोदींचे सरकार आल्यानंतर आता सरकारची भाषाच बदलल्याचे सरदेसाई यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी सांगितले. Read More »

सुब्रतो रॉयना पॅरोल नामंजूर

गुंतवणूकदारांच्या देय १० हजार कोटी रूपयांची व्यवस्था करण्यासाठी विदेशातील हॉटेल्स विकायची आहेत असे सांगून सहारा समूहाचे चेअरमन सुब्रतो रॉय यांनी मागितलेला ४० दिवसांचा पॅरोल (सशर्त मुक्तता) सर्वोच्च न्यायालयाने काल नामंजूर केली. Read More »

रमाकांत बोरकरना जामीन

सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांची काल न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. ७५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर शनिवारी १९ जुलै रोजी दुपारी म्हापसा येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या न्यायालयात न्या. पी. व्ही. सावईकर यांच्यासमोर हजर केले त्यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. Read More »

हरित परवाने करणार सोपे

हरित परवाने मिळविण्यासाठीची प्रक्रिया सोपी केली जाणार असल्याचे पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. पर्यावरणाची हानी न करता विकास हा सरकारचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. विविध वादांमुळे अडकून राहिलेले ३५ हजार कोटी रुपये सरकार वृक्ष लागवडीसाठी विविध राज्यांना देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. Read More »

आमोणा पुलावरून बहिणींचा आत्महत्येचा प्रयत्न

एकीला वाचवण्यात यश; एक बेपत्ता मोर्ले-गुळ्ळे येथील दोघा सख्ख्या बहिणींनी आमोणा पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पैकी एका बहिणीला वाचवण्यात यश आले तर दुसरी बेपत्ता आहे. काल दुपारी २.४५ वा. च्या सुमारास हा प्रकार घडला. Read More »

आजपासून विधानसभा अधिवेशन

आजपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून विधानसभा परिसरात १४४ कलम जारी केले आहे. दि. २१ ऑगस्टपर्यंत चालणार्‍या अधिवेशनात विरोधी कॉंग्रेस पक्षाची भूमिका व कार्य पद्धत काय असेल यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. Read More »