ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

संरक्षक भिंत कोसळून ५ कार, ७ मोटरसायकलींची हानी

पावसाचा परिणाम : आके-मडगाव येथील घटना आके येथील दाऊद रेसिडेन्सी येथील दगडी संरक्षक भिंत कोसळून दाऊदमधील तीन कार गाड्यासहीत, प्रतिभा हाऊसिंग सोसायटीच्या जी व ई इमारतीतील दोन कारसहीत सात मोटरसायकलींची हानी झाली त्यांत सात मोटरसायकलीही दगड व मातीखाली चिरडल्या गेल्या. या संरक्षक भिंतीमुळे २० ते २५ लाख रुपयांची हानी झाली. पथदिव्याचे तीन खांब कोसळले. पाण्याची वाहिनी फुटली. ही घटना पहाटे ... Read More »

गोव्यात वादळाचा इशारा

अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निलोफर’ वादळाच्या पार्श्वभूमीवर वेधशाळेने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात व दमण दीव, लक्ष्वद्वीपला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. समुद्रात तयार झालेल्या या वादळामुळेच सध्या गोव्यात पाऊस सुरू झाला आहे. Read More »

सकारात्मक राजकारणाचे प्रतीक बना : मोदी

रालोआ खासदारांसोबत पंतप्रधानांचे चहापान सकारात्मक राजकारणाचे प्रतीक बना असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या घटक पक्षांतील सर्व खासदारांना केले. पंतप्रधान बनल्यानंतर आपल्या पंतप्रधान निवासस्थानी आयोजित पहिल्याच अशाप्रकारच्या चहापानाच्या कार्यक्रमात मोदींनी रालोआ खासदारांशी संवाद साधला. Read More »

महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेत घेण्यास उत्सुक : भाजप

नेता निवडीसाठी उद्या बैठक शिवसेनेला सरकारमध्ये सामील करून घेण्यासाठी भाजप उत्सुक असल्याचे काल भाजप नेते विनोद तावडे यांनी सांगितले. महाराष्ट्र भाजपची उद्या बैठक होणार असून यात विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. Read More »

मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्रीपदी शपथबद्ध

मनोहर लाल खट्टर यांनी काल हरियाणाचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ६० वर्षीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून घडलेले खट्टर हे संघटन कौशल्य व स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जातात. राज्यपाल कॅप्टन सिंग सोळंकी यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. खट्टर यांच्यासोबत त्यांच्या १० जणांच्या मंत्रिमंडळानेही शपथ घेतली. Read More »

जंगल सफरीद्वारे प्राणी-पक्षी दर्शन

वन पर्यटन विभागाचा प्रस्ताव बोंडला येथील प्राणी संग्रहालयाला भेट देणार्‍या देशी तसेच विदेशी पर्यटकांसाठी लवकरच जंगल सफरींचे आयोजन करण्याची योजना आहे, असे वन खात्यातील वन्यजीव व पर्यावरण पर्यटन विभागातील वनपाल डी. एन्. एफ्. कार्व्हालो यांनी सांगितले. Read More »

राज्य सह. बँक अध्यक्षावरील अविश्‍वासावर उद्या चर्चा

कोर्टाने दिला होता आदेश गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांच्यावरील अविश्वासाच्या ठरावावर उद्या मंगळवार दि. २८ रोजी चर्चा घेण्याचे निश्‍चित झाले आहे. बँकेच्या संचालक मंडळावरील १६ सदस्यांपैकी ९ सदस्यांनी फळदेसाई यांच्या विरुध्द अविश्‍वासाचा ठराव आणला होता. मनमानी कारभाराचा त्यांच्यावर आरोप आहे. Read More »

इमाम बुखारींना जाळण्याचा प्रयत्न

जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांना भेटण्यास दिले जात नसल्याने रागावून एका ३२ वर्षीय माथेफिरू युवकाने बुखारींना जाळण्याच्या इराद्याने त्यांच्यावर केरोसीनची बाटली फेकून मारण्याची घटना घडली.पश्‍चिम बंगालचा रहिवासी असलेल्या कमलाउद्दीन नामक या युवकाला नंतर सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. Read More »

भारतीय हद्दीत विदेशी ट्रॉलर्सना बंदीची मागणी

गोयच्या रापोणकारांचे एकवोट आणि राष्ट्रीय मच्छीमारी कामगार मंचने भारतीय सागरी हद्दीत विदेशी मच्छीमारी ट्रॉलरना मासे मारण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. वरील संघटना पारंपरिक मच्छीमाराच्या हिताचे जतन करण्यासाठी वावरत असून त्यांनी भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात वरील प्रश्‍नी दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करून दिली आहे. Read More »

केवळ २५ टक्के शेतीचे नुकसान : खात्याचा दावा

राज्यातील ७५ टक्के शेतकर्‍यांनी भात कापणी व मळणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर यंत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना सध्या पडत असलेल्या संततधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनीही त्यास दुजोरा दिला. कापणी न केलेल्या भाताला कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या कापणी न केलेल्या शेतकर्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. Read More »