ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

पोर्तुगीज नागरिकत्वाबाबत पर्रीकरांची दिल्लीत चर्चा

गोव्यातील पोर्तुगीज नागरिक परिवारांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. Read More »

केवळ पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी म्हणजे नागरिकत्व नव्हे

पोर्तुगीज कौन्सुल जनरलचे स्पष्टीकरण एखाद्या विदेशी नागरिकाला जर पोर्तुगीज नागरिकत्व मिळवायचे असेल तर त्यासाठी त्याला पोर्तुगीज प्रशासनाकडून कायदेशीररीत्या कार्तांव-द-सिदादांव हे ओळखपत्र मिळवावे लागते. जोपर्यंत त्याला ते ओळखपत्र मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती पोर्तुगीज नागरिक ठरू शकत नसल्याचे गोव्यातील पोर्तुगीज कौन्सुल जनरल डॉ. रुई कार्व्हालो बासैरा यांनी काल अनौपचारिकरीत्या पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासंबंधी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, एखाद्या विदेशी ... Read More »

जलसफरींवर नियंत्रणासाठी समुद्र किनार्‍यांवर ‘किऑस्क’

परवा खणगिणी-बेतूल येथे जलसफरीसाठीची बोट बुडून तीन रशियन महिला पर्यटक बुडून ठार होण्याची जी दुर्घटना घडली त्या पार्श्‍वभूमीवर जलसफरींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जलसफरी होतात त्या किनार्‍यांवर एक गाळेवजा कार्यालय (किऑस्क) उघडण्यात येईल. तेथे पर्यटक खात्याचा एक प्रतिनिधी व जलक्रीडा संघटनेचा एक प्रतिनिधी असेल, अशी माहिती पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली. Read More »

पोर्तुगीज वकालतीच्या महोत्सवात मराठीची दखल

सेमाना-द-कल्चरा इंडो पोर्तुगीजामध्ये (गोवा) यंदा मराठी संस्कृतीची दखल घेण्यात येणार असून मराठी रंगभूमी व विशेष करून संगीत नाटकांना उत्तेजन देण्यासाठी विशेष कार्य केलेले रंगकर्मी रामकृष्ण नाईक यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे या महोत्सवाच्या समितीचे अध्यक्ष जुझे एलमानो कुएलो पेरेरा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोव्यातील पोर्तुगीज वकालत या महोत्सवाची प्रमुख आयोजक आहे. Read More »

गोव्यात अल्पसंख्याक आयोगाची राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

राज्यपालांना निवेदन सादर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नीळकंठ हळर्णकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळाने काल गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन गोव्यात अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना करण्याची सूचना राज्य सरकारला करावी अशी विनंती करणारे एक निवेदन त्यांना दिल्याचे पक्षाचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. राज्यातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेच्या नजरेने या आयोगाची स्थापना होणे ही काळाची गरज असल्याचे ... Read More »

पणजीच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

पणजी शहरात होणारी वाहतुकीची कोंडी नाहीशी करण्यासाठी पणजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत प्रायोगिक तत्वावर काही बदल घडवून आणण्याचा निर्णय वाहतूक पोलीस विभागाने घेतला असल्याचे या विभागाचे उपाधीक्षक धर्मेश आंगले यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. फोंडा, रायबंदर, जुने गोवे, चिंबल, मडगाव व दक्षिण गोव्यातील अन्य भागात जाणार्‍या वाहनांना जुन्या पाटो पुलावरून दिवजां सर्कलच्या बाजूने जाण्यास दिले जाणार नाही. Read More »

एलपीजी सिलिंडर ३ रु. महाग

विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ३ रु. वाढणार आहे. विक्रेत्यांचे कमिशन हे ग्राहकांना सोसावे लागते. १४.२ किलो सिलिंडरवरील कमिशन आता रु. ४३.७१ झाले आहे. Read More »

सरकारात सहभागाबाबत सेनेचा आज निर्णय

महाराष्ट्रातील भाजप सरकारात सहभागी होण्याबाबत शिवसेना आज निर्णय घेणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी काल उद्धव ठाकरे यांच्याशी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. सेनेला सरकारात यायचे असल्यास कोणत्याही पूर्वअटींशिवाय यावे, असे मत भाजपने व्यक्त केले आहे. Read More »

महालेखापाल अहवाल सनसनाटी नको : जेटली

महालेखापालांनी आपला अहवाल माध्यमांचे मथळे होण्याकरिता सनसनाटी बनवू नये असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘कॅग’ना सांगितले आहे. २ जी आणि कोळसा वाटप घोटाळ्यात संभावित नुकसानाचे मोठे आकडे ‘कॅग’कडून घोषित करण्यात आल्यानंतर हेच मत कॉंग्रेसने व्यक्त केले होते. लेखापालांनी काम करताना लक्षात ठेवले पाहिजे की ते यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयाचे केवळ परीक्षण करीत आहेत. Read More »

‘कूळ-मुंडकारांच्या हितासाठीच दुरुस्ती’

मंत्री तवडकर, गणेश गावकर यांचे मत सरकारने कूळ व मुंडकार कायद्यात केलेली दुरस्ती कूळ व मुंडकारांच्या हितासाठीच आहे. काही मंडळी व ‘उटा’चे नेते विनाकारण दिशाभूल करीत आहेत, असे क्रीडा मंत्री रमेश तवडकर व आमदार गणेश गावकर यांनी सांगितले. कूळ-मुंडकारांची प्रकरणे मामलेदारांकडून दिवाणी न्यायालयात नेण्यासाठी एकमेव दुरुस्ती कायद्यात केली आहे. ती कूळ-मुंडकारांच्या हितासाठीच आहे. Read More »