ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

४५ दिवसांत पणजी स्वच्छ, सुरळीत : जिल्हाधिकारी

भंगारातील वाहनांचा लिलाव; वाहतुकीत बदल पणजी शहराचा सवर्र्ंकष आराखडा तयार करून पुढील ४५ दिवसांत शहरातील वाहतूक तसेच पार्किंग व्यवस्थेत पूर्ण सुधारणा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी दिली. शहरात पडून असलेल्या वाहनांची यादी तयार करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकार्‍यांवर सोपविली आहे. वरील सर्व वाहनांचा लिलाव केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत शहर स्वच्छ ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. Read More »

एसआयटीचा अहवाल डिसेंबरपर्यंत : न्या. शाह

आणखी नावांचा शोध काळ्या पैशांच्या व्यवहारात गुंतलेले ‘लहान’ असोत किंवा ’मोठे’, सर्वांची चौकशी केली जाईल व अहवाल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सादर केला जाईल, असे सुप्रीम कोर्टातर्फे गठीत या समितीचे अध्यक्ष न्या. एम. बी. शहा यांनी काल सांगितले. Read More »

२५ गावांत कृषी सर्वेक्षण पूर्ण

कृषी उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने राबविलेल्या महत्वाच्या योजनेनुसार खात्याने निवडलेल्या २५ गावातील शेतकर्‍यांचे सर्वेक्षण जवळ जवळ पूर्ण झाले असून, शेतकर्‍यांच्या सूचनांनुसार वरील संबंधित गावामध्ये शेतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती खात्याचे संचालक आर्नाल्ड रॉड्रिग्स यांनी दिली. Read More »

बांधकाम उद्योजकांच्या हितासाठी ङ्गकूळ-मुंडकारफ दुरुस्ती

कॉंग्रेसचा आरोप : विधेयक मागे घेण्याची मागणी सरकारने विधानसभेत संमत केलेल्या कृषी कूळ दुरुस्ती विधेयकामुळे राज्यातील कुळांचा लाभ न होता भविष्यकाळात ‘बांधकाम उद्योजकांना व बिगर गोमंतकीयांना येथील शेतजमिनी गिळंकृत करण्यास अधिक मदत होईल, असे सांगून वरील वादग्रस्त विधेयक मागे घेण्याची मागणी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी काल पत्रकार परिषदेत केली. Read More »

बुखारींचे नवाज शरीफांना  निमंत्रण; मोदींना नाही

दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सयद अहमद बुखारी यांनी आपला १९ वर्षीय पूत्र शबान याला उत्तराधिकारी घोषित केले असून त्याच्या अभिषेकाच्या विधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेकांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. Read More »

‘शक्तीस्थळा’स मोदींच्या भेटीबाबत अनिश्‍चितता

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी असून, मात्र पंतप्रधान मोदी शक्ती स्थळ समाधीला भेट देण्याबाबत काहीच निश्‍चित झालेले नाही. महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशिवाय अन्य जणांची जयंती-पुण्यतिथी साजरी न करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. Read More »

गंगा प्रदुषित करणारे कारखाने बंद करा : कोर्ट

३१ मार्च २०१५पर्यंत प्रदूषणकारी द्रव्ये प्रक्रिया केल्याशिवाय गंगा नदीत सोडणे थांबवले नाही तर संबंधित कारखान्यांना टाळे ठोकावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने काल राष्ट्रीय हरित लवादाला दिले. न्या. टीएस ठाकूर आणि न्या. आदर्श कुमार गोयल व आर बानूमती यांच्या आदेशाचे पालन करण्यास सरकारने तयारी दर्शविली. Read More »

केरळ हायकोर्टाची बार बंदीला मान्यता

केरळमध्ये हॉटेलना जोडलेले सुमारे ७०० बार बंद करण्याच्या केरळ सरकारच्या धोरणास केरळ उच्च न्यायालयाने काल मान्यता दिली. २०२३ सालापर्यंत केरळ दारुमुक्त करण्याचा निर्णय कॉंग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने घेतला असून त्याचाच भाग म्हणून वरील धोरण घोषित केले होते. Read More »

छट पूजा उत्सव

Read More »

काळा पैसा : ६२७ नावे सुप्रीम कोर्टाला सादर

मार्चपर्यंत तपास पूर्ण करण्याचे कोर्टाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्र्शांनुसार केंद्र सरकारने काळा पैसा असल्याचा संशय असलेल्या विदेशी खातेधारक भारतीयांची ६२७ नावे सादर केली. ही सर्व खाती जीनेव्हाच्या एसएसबीसी बँकेतली आहेत. दरम्यान, सर्व खात्यांसंबंधी तपास येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यासही कोर्टाने सांगितले आहे. Read More »