ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

घरे पाडल्याप्रकरणी कर्नाटक मंत्र्यांची बायणा येथे भेट

काटे बायणा येथे समुद्र किनार्‍यानजीकची धोकादायक घरे पाडल्याप्रकरणी कर्नाटकचे पर्यटन मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कन्नड लोकांशी चर्चा केली. गेली चार दशके हे लोक त्या वस्तीत राहत होते, त्यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे होती, असे असताना त्यांची घरे पाडणे चुकीचे आहे, असे देशपांडे म्हणाले. Read More »

नीता गावसचा मृतदेह सापडला; भावाला अटक

सत्तरीतील न्यू मोर्ले कॉलनीतील दोघा बहिणींनी आमोणा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पैकी बेपत्ता नीता विठ्ठल गावस हिचा मृतदेह काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पिळगांव येथे नदीत आढळला. दरम्यान, फोंडा पोलिसांनी काल नीताचा भाऊ रामचंद्र गावस याला अटक केली. Read More »

‘सेरुला’ भ्रष्टाचार प्रकरणी आणखी एक अटक

पर्वरीत सेरुला कोमुनिदादीत भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा अन्वेषण पोलिसांनी काल ताळगावचे पंचायत सचिव पीटर मार्टिन यांना अटक केली. घोटाळा झाला त्या काळात ते सेरुला कोमुनिदादीचे मुखत्यार होते. दरम्यान, या घोटाळ्यात काही दिवसांपूर्वी सही जणांना अटक करण्यात आली होती. Read More »

भारत-पाक विदेश सचिव बोलणी २५ ऑगस्टला

भारत – पाकिस्तानच्या विदेश सचिवांची बैठक २५ ऑगस्टला इस्लामाबादेत होणार आहे. द्विपक्षीय शांतीवार्ता पुनर्जीवित करण्याच्यादृष्टीने या बोलण्यांकडे पाहिले जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची शपथविधी सोहळ्यानंतर नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर दोन महिन्यांनी प्रथमच दोन्ही देशांत बोलणी होत आहेत. Read More »

जागतिक बँकेचे भारताला १८ अब्ज डॉलर्स कर्ज

भारताच्या प्रस्तावित ९ टक्के विकास दरावर विश्‍वास दाखवून येत्या तीन वर्षांच्या काळात जागतिक बँक भारताला १८ अब्ज डॉलर्स कर्ज उपलब्ध करून देणार आहे. भारत जागतिक बँकेचा एक प्रमुख ग्राहक आहे. गेल्या आर्थिक वर्षी जागतिक बँकेने भारताला ५.२ अब्ज डॉलर्स कर्ज दिले होते. Read More »

साळावली धरणाचा जलाशय

Read More »

विशेष दर्जा : सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला जाणार

राज्याची विशेष दर्जासाठीची मागणी धसास लावण्यासाठी गोवा सरकार सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला गोवा विधानसभेत सांगितले. Read More »

विधानसभा वृत्त

जुने गोवे ते थोरले गोवे रस्त्याचे सर्वेक्षण करणार : मांद्रेकर जुने गोवे (ओल्ड गोवा) ते थोरले गोवे (गोवा वेल्हा) या दरम्यान कदंबकालीन महामार्गाचे (राजमार्ग) काही अवशेष अद्याप अस्तित्वात असून या पार्श्‍वभूमीवर भारतीय पुरातत्त्व या महामार्गाचे सर्वेक्षण करण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे पुरातत्व खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार विष्णू वाघ यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना ... Read More »

बेकायदेशीर विदेशी नागरिकांच्या परतपाठवणीचे धोरण बनवणार

बेकायदेशीर पद्धतीने गोव्यात वास्तव्य करून बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍या विदेशी नागरिकांना येथून त्यांच्या देशात पाठविण्यासाठी धोरण तयार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत आमदार मायकल लोबो यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिले. Read More »

खाण अवलंबितांना करदात्यांचा पैसा का?

सावळ : खाण घोटाळा करणार्‍यांकडून पैसे वसूल करा राज्यातील खनिजवाहू ट्रकमालक, यंत्रसामुग्रीचे मालक व अन्य खाण अवलंबितांना जनतेच्या करातून गोळा केलेला पैसा न देण्याची जोरदार मागणी डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी काल अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी केली. Read More »