ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

पाच वर्षांपर्यंत मुलांना शिक्षणाच्या बेडीत अडकवू नका : राज्यपाल

आनंददायी बालशिक्षण परिषदेचे उद्घाटन पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलांना शिक्षणाच्या बेडीत अडकवून त्यांचे नुकसान करू नका, असे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सांगितले. साखळी येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आनंददायी बालशिक्षण परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. गोमंतक बालशिक्षण परिषद, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, गोवा राज्य भाषा संचालनालय आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. Read More »

क्षमता व बुद्धीचा वापर सहकार क्षेत्रात आवश्यक : मुख्यमंत्री पर्रीकर

सहकार भारतीच्या महाअधिवेशनाचे पर्वरीत उद्घाटन काम करण्याची क्षमता आणि बुद्धीचा वापर हे गुण सहकार क्षेत्रात काम करणार्‍यांच्या अंगी असणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. काल येथील विद्याप्रबोधिनी संकुलात सहकार भारती आयोजित पतसंस्थांच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. Read More »

कोकणी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन

नाटककाराने अहंकार बाजूला सारून नव्या प्रयोगांना सामोरे जायला हवे, मात्र तसे करताना जुन्या परंपरा विसरू नयेत, असे ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी सांगितले. गोवा कोकणी अकादमी व अंत्रुज लळितक बांदोडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या कोकणी नाट्य संमेलनाच्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर, संमेलनाध्यक्ष पुंडलिक नायक, स्वागताध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर, प्रतिभा मतकरी, बांदोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच नयन ... Read More »

‘सीआरझेड’ गुंता सोडविण्यासाठी लवकरच केंद्राची समिती

किनारी राज्यातील मच्छीमारांना ‘सीआरझेड’मुळे कोणत्या अडचणी येत आहेत हे केंद्र सरकारला कळून चुकले आहे. त्यामुळे हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. या कायद्यात दुरुस्ती करून समुद्र किनार्‍यांवरील मच्छीमारांच्या घरांना व त्यांच्या किरकोळ स्वरुपाच्या व्यवसायांना संरक्षण देण्याचा प्रयत्न असेल, आपण गोव्यातील मच्छीमारांचा प्रश्‍न केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. Read More »

पडोसे प्रकल्पातील कर्मचारी डिसेंबरपर्यंत सोसायटीत

पडोसे येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात गेली १० ते १२ वर्षे अल्पवेतनावर प्रामाणिक सेवा बजावत असलेल्या सुमारे दीडशेहून अधिक कामगारांना डिसेंबरपर्यंत सरकारच्या सोसायटीत समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली. दोडामार्ग येथे ते एका कार्यक्रमासाठी आले असता कर्मचार्‍यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. Read More »

संगीतात भारतीय शास्त्रीय  संगीत श्रेष्ठ : वाडकर

संगीतात भारतीय शास्त्रीय संगीत श्रेष्ठ आहे, असे प्रख्यात ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर यांनी सांगितले. स्वस्तीक संस्थेतर्फे आयोजित ‘स्वरमंगेश’ संगीत संमेलनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज दिवसभर होणार्‍या या संमेलनात श्री. वाडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. फिल्म संगीत थोडे कमी करून शास्त्रीय संगीताकडे वळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. Read More »

पेट्रोल-डिझेल २ रु. स्वस्त

पेट्रोल दरात रु. २.४१ प्रति लिटर तर डिझेल दरात रु. २.२५ प्रति लिटर कपात करण्याचा निर्णय तेल महामंडळातर्फे काल घेण्यात आला. हे दर काल शुक्रवार मध्यरात्रीपासून लागू झाले. पेट्रोल दरातील ही ऑगस्टपासूनची सहावी कपात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांच्या पार्श्वभूमीवर हा दरांचा आढावा घेण्यात आला. Read More »

‘मोप’ स्थगित ठेवून ‘दाबोळी’चा विस्तार करा

प्रदेश कॉंग्रेसचा ठराव : दोन विमानतळ परवडणार नसल्याचे मत मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रक्रिया स्थगित ठेवून दाबोळीचा पूर्ण विस्तार करण्याची मागणी करणारा ठराव काल झालेल्या प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीत संमत केल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो यांनी काल दिली. बांधा चालवा व हस्तांतर करा या तत्वावर मोप विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. आर्थिकदृष्ट्या राज्यात दोन विमानतळ परवडणे शक्य नाही. मोप उभारल्यानंतर ... Read More »

फडणवीसांचा शपथविधी थाटात; उद्धव यांची उपस्थिती

अमित शहांनी विनंती केल्याने ठाकरेंचा निर्णय महाराष्ट्रातील पहिल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा काल भव्य सोहळ्यात शपथविधी झाला. दरम्यान, सोहळ्यास शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शेवटच्या क्षणी उपस्थिती लावली. Read More »

बाबूश, जेनिफरवर आरोप निश्‍चित

पोलीस स्थानक हल्ला प्रकरण पणजी पोलीस स्थानकावरील हल्ल्याच्या प्रकरणी सांताक्रुझचे आमदार, बाबुश मोन्सेर्रात तसेच ताळगावचे आमदार जेनिफर मोन्सेर्रात व अन्य ३५ जणांविरुध्द म्हापसा येथील विशेष न्यायालयाने आरोप निश्‍चित केले. पुढील सुनावणी दि. १९ नोव्हेंबर रोजी होईल. Read More »