ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

‘सुरय’ तांदळांच्या गिरणीस मान्यता

शेतकर्‍यांना ‘सुरय’ तांदूळ उत्पादनाची सुविधा मिळणार राष्ट्रीय कृषी विकास योजनेखाली धारगळ येथे खाजगी तत्वावर गोवा कोल्ड स्टोरेज या कंपनीला सुरय तांदळांसाठी गिरण घालण्यास मान्यता दिली असून या प्रकल्पाचे कामही चालू असल्याची माहिती कृषी संचालक अर्नाल्ड रॉड्रिगिस यांनी दिली. Read More »

सर्वोत्तम देण्यासाठी शिक्षण उत्तम साधन : मुख्यमंत्री

आनंददायी बालशिक्षण अधिवेशनाचा समारोप सर्वोत्तम ते देण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे उत्तम साधन आहे. त्यामुळे बालवयात मुलांना देण्यात येणारे शिक्षण चांगल्या पध्दतीने देण्याचे कर्तव्य शिक्षकाला पार पाडायचे आहे. त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या मर्जीनुसार मुलांच्या डोक्यावर शिक्षणाचे ओझे देऊ नये. तसे झाल्यास मुलांचे भविष्य कालवंडण्याची भीती असते असे विचार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे व्यक्त केले. Read More »

भाजपशी युतीसाठी घाई नाही : उध्दव ठाकरे

महाराष्ट्रात भाजपशी युती करण्याची शिवसेनेला घाई नसून या संदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल असे वक्तव्य शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल येथे केले. विधानसभा निवडणुकानंतर ठाकरे काल येथे आले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केले. Read More »

पाकिस्तानात आत्मघाती बॉंब हल्ल्यात ५५ ठार

भारत-पाकिस्तान वाघा सीमेनजीक पाकिस्तानच्या हद्दीत कार आत्मघाती बॉंबहल्ल्यात किमान ५५ जण ठार व २०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आला.वाघा सीमेजवळील पार्किंग विभागात हा हल्ला झाल्याची माहिती पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने दिली आहे. Read More »

हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे पीडीपीचे प्रयत्न

प्रादेशिक भेदभाव व धर्ननिरपेक्षता याविषयीच्या मुद्द्यांद्वारे जम्मू काश्मीरमधील विरोधी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीने हिंदू मतदारांना भुलविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. Read More »

खाण पॅकेजला पंतप्रधानांची तत्त्वत: मान्यता : मुख्यमंत्री

पायाभूत सुविधांसाठी १५०० कोटी रु.चा केंद्रासमोर प्रस्ताव सादर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाण पॅकेज देण्यास तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रासमोर ठेवला असल्याचेही ते म्हणाले. Read More »

एक कि. मी. ‘बफर झोन’वर सहमती

त्या खाणींचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या हाती अभयारण्यापासून एक किलोमीटर ‘बफर झोन’ निश्‍चित करण्याच्या प्रस्तावास पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मान्यता दिली आहे. दरम्यान, अभयारण्यातील खाणी रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरच अवलंबून असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. Read More »

‘मोप’ हवाच : पर्रीकर

सध्या दाबोळी विमानतळावर वर्षाकाठी साडेचार लाख प्रवाशी हाताळले जातात. या विमानतळाची क्षमता जास्तीत जास्त ४० लाख प्रवाशी हाताळण्याची आहे. २०२० साली प्रवाशांची संख्या ७० ते ७० लाख इतकी होईल, त्यामुळे मोप विमानतळ आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. Read More »

एफसी गोवाचा आयएसएलमध्ये पहिला विजय

ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर टोल्गे ऑझ्बेने सामन्याच्या अंतिम क्षणात नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलाच्या जोरावर एफसी गोवा संघाने दिल्ली डायनामोज एफसीवर २-१ अशी मात करीत हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. दिल्ली डायनामोजतर्फे मॅड्‌स जंकरने ७व्या मिनिटाला आघाडीचा गोल नोंदविला होता. तर शेख जेवेल राजाने ७२व्या मिनिटाला एफसी गोवाला बरोबरी साधून दिली होती. तर सामन्याच्या अंतिम क्षणात राखीव खेळाडू ... Read More »

पेडणे महाविद्यालयात ‘आयआयटी’ची व्यवस्था

पेडणे सरकारी महाविद्यालय इमारतीचा विस्तार सुरू आहे. तेथे आयटीचे वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. आयआयटी संस्थेसाठी जागा शोधण्याचे काम चालू आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याबरोबर बैठक निश्‍चित झाल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. सध्या कोलवाळ येथे कमी खर्चात २५०० फ्लॅट बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन इमारतींचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेऊन तेथे आयआयटी विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती ... Read More »