ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

‘त्या’ प्रकरणी भारताकडून चीनकडे चिंता व्यक्त

चीनकडून पाक सैनिकांना प्रशिक्षण भारतविरोधी कारवाया करणार्‍या पाकिस्तानी सैनिकांना शस्त्रास्त्र हाताळणीसाठी चीनी लष्कराकडून प्रशिक्षण दिले जात असल्याबाबत भारताने चीनकडे आपली चिंता व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तानच्या भारताविरोधी कारवायांना पाठिंबा न देण्याची सूचनाही भारताने चीनला अधिकृतपणे केली असल्याची माहिती काल केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. Read More »

पाचवा वनडेही जिंकला; विराटचे नाबाद शतक

भारताचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’ कर्णधार विराट कोहलीच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर भारताने शेवटच्या सामन्यातही ३ गडी राखून विजय मिळवित श्रीलंकेला ५-० असा क्लीन स्विप दिला. सामनावीर म्हणून श्रीलंकन कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची निवड करण्यात आली. तर मालिकावीराचा पुरस्कार भारतीय कर्णधार विराट कोहलीला प्राप्त झाला. Read More »

गोवा एफसी-मुंबई सिटी एफसी लढत आज

दिल्ली डायनामोजवर आकर्षक विजयानंतर उत्साहित आणि आत्मविश्वासाने भारावलेला गोवा एफसी संघ आपल्या तिसर्‍या आपलला विजयी संवेग जारी राखण्याच्या इराद्यानेच मुंबई सिटी एफसी संघाविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. Read More »

सचिनने घेतले आंध्रप्रदेशातील गाव दत्तक

मास्टर ब्लास्टर विक्रममादित्य फलंदाज तथा राज्यसभा खासदार असलेल्या सचिन तेंडुलकरचे काल रविवारी आंध्रप्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तमराजूकन्ड्रिगा गावामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तेंडुलकरने ‘खासदार आदर्श ग्राम योजने’तर्ंगत हे गाव विकास करण्यासाठी दत्तक घेतले आहे. ११० कुटुंबे राहत असलेल्या या गावात अद्याप रस्त्याची आणि शौचालयाची सुविधा नाही. Read More »

एका वर्षानंतरच मोदी सरकारचे मूल्यमापन : खुर्शीद

चीनच्या घुसखोरीबाबत टीका मोदी सरकारमधील त्रुटी किंवा उणिवा यांचा आढावा सद्यस्थितीत योग्य ठरणार नाही. त्यावर भाष्य करण्यासाठी किमान सहा महिने ते एका वर्षाचा अवधी द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी येथे व्यक्त केली. Read More »

सकारात्मकतेने कार्य केल्यानेच धर्मा चोडणकर यशस्वी : श्रीपाद

धर्मा चोडणकर यांनी नेहमी सकारात्मक विचार करून प्रत्येक कार्य केले. म्हणून ते यशस्वी झाले असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल त्यांच्या षष्ठ्यपूर्ती सोहळ्यानिमित्त समारंभात बोलताना केले. येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सहकार क्षेत्रात धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कामगिरी केलेल्या माजी आमदार चोडणकर यांना त्यांच्या हितचिंतकांतर्फे गौरव करण्यात आले. मिळालेल्या संधीचा चांगल्या कामासाठी उपयोग करून घ्यायचे ठरविल्याने कळत नकळत हातून चांगले ... Read More »

पंतप्रधानांच्या कार्यशैलीबद्दल व्यंकय्यांकडून प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करताना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मोदी स्वत:ही झोपत नाही व आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनाही झोपू देत नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांची अशी कार्यशैली असली त्या कार्य शैलीचाही आम्ही आनंद घेत आहोत. कारण मोदी जे काही करत आहेत ते सर्वसामान्यांच्या हितासाठीच असे नायडू यांनी स्पष्ट केले. Read More »

सातार्‍यात कंटेनर ट्रकखाली चिरडून आठ ठार

सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा येथे बसची वाट पाहणार्‍या लोकांवर कंटेनर ट्रक कलंडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत किमान ८ जण ठार व १५ जण जखमी झाले. कालच्या या दुर्घटनेतील ठार झालेल्यांची ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेवेळी कंटेनर ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता. जखमींना सातारा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. Read More »

भाजप-शिवसेना पुनर्मिलनासाठी संघाकडून भाजप नेत्यांना सूचना

महाराष्ट्रात सत्तेतील वाट्यावरून भाजप-शिवसेना यांच्यातील राजकीय घटस्फोटानंतर आता या पक्षांचे पुनर्मिलन घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालविण्याऐवजी शिवसेनेशी पुन्हा युतीसाठी प्रयत्न करण्याविषयी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप नेत्यांना सूचना केल्याचे या सूत्रांनी सांगितले. Read More »

शीख समाज पीडीपीलाच मतदान करेल

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत शीख समाज पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीलाच (पीडीपी) मतदान करणारे असल्याचे ऑल पार्टीज शिख को आर्डिनेशन कमिटीने काल येथे स्पष्ट केले. जातीय पातळीवर या राज्यात दुही निर्माण करू दिली जाणार नाही असेही वरील संघटनेने सांगितले. Read More »