ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

४३ देशांच्या नागरिकांना ‘व्हिसा ऑन अरायव्हल’

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिजी आणि प्रशांत महासागरी देशांसह जवळजवळ ४३ देशांच्या नागरिकांना भारतात आल्यावर व्हिसा देण्याची योजना (व्हिसा ऑन अरायव्हल) आजपासून कार्यान्वित होणार आहे. या प्रवाशांचे इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल अथॉरायझेशनही करता येईल. Read More »

‘सार्क’ परिषदेत भारताच्या प्रस्तावांस पाकचा विरोध

दक्षिण आशियाई देशांमध्ये जवळचे संबंध प्रस्थापित होण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे भरलेल्या ‘सार्क’ देशांच्या परिषदेत काल व्यक्त केली असतानाच पाकिस्तानने मात्र भारताने पुढे केलेल्या महत्त्वपूर्ण प्रस्तावांचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे अठरावी सार्क परिषदही निष्फळ ठरली. Read More »

आठवीतल्या विद्यार्थ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

दिल्लीजवळील फरिदाबाद येथील एका शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याने स्वतःला काल जाळून घेतले. होली चाईल्ड स्कूल या शाळेतील शिक्षकाने आपल्याला वाईट वागणूक दिल्याने आपण तसे केल्याचे त्याने सांगितले. Read More »

लीलावती इस्पितळाच्या माजी विश्वस्तास अटक

मुंबईमुंबईतील प्रख्यात लीलावती इस्पितळाचे माजी विश्वस्त किशोर मेहता यांना काल अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. Read More »

रिअल एजन्सीला  फसविल्याची तक्रार

रिअल एजन्सीला पाच कर्मचार्‍यानी १४ लाख रुपयांना ठकविल्याची तक्रार कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत डी. कदम यांनी मडगांव पोलिस स्टेशनवर नोंदविली आहे. स्मीता गुरुदास नाईक (बाळ्ळी), दत्ता महादेव देविदास (रिवण), मिलाग्रीस आंतांव (शिरोडा), सुदेश नाईक (नावेली) व बसप्पा हरिजन या माजी कर्मचार्‍यांनी २०१३ ते मे २०१४ पर्यंतच्या काळांत वितरीत केलेल्या बियरचे १३ लाख ८८ हजार ७९ रुपये कंपनीच्या खात्यात भरले नाहीत. ती ... Read More »

नावेली येथे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रातवाडो नावेली येथील सुशांत फर्नांडिस याने सुर्‍याने भोसकून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांत तो गंभीर जखमी झाला असून, हॉस्पिटलांत उपचार घेत आहे. Read More »

कूळ कायदा दुरुस्तीला भंडारी समाजाचा विरोध

अनिल होबळे यांची पत्रकार परिषद कूळ कायद्यातील दुरुस्तीचा गोमंतक भंडारी समाजाबरोबरच अन्य इतर मागासवर्गावर बराच परिणाम झालेला आहे. त्यामुळे विधानसभेत संमत केलेले वादग्रस्त विधेयक मागे घेण्याची मागणी गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी काल पत्रकार परिषदेत केली. Read More »

कृष्णवर्णियाच्या हत्येस जबाबदार पोलिस निर्दोष : अमेरिकेत दंगली

फर्ग्युसन येथे एका कृष्णवर्णियाच्या हत्येस जबाबदार असलेल्या एका श्वेतवर्णिय पोलिसाला दोषी धरण्यास तेथीलन न्यायालयाने नकार दिल्याने संतप्त झालेल्या जमावांनी अमेरिकेच्या अनेक भागांत दंगली माजवल्या आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये सदर हत्येची घटना घडली होती. Read More »

पर्रीकरांचा आमदारकीचा राजीनामा सभापतींनी स्वीकारला

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सादर केलेला पणजी मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा आपण स्वीकारला असून लवकरच यासंबंधीची माहिती राजपत्रात प्रसिद्ध होईल व त्याचबरोबर निवडणूक आयोगालाही कळविले जाईल, असे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. पणजी मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याचे निवडणूक आयुक्तांना कळविल्यानंतर निवडणूक आयुक्त पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करतील. पर्रीकर यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील भाजप आमदारांची संख्या २० बनली आहे तर एकूण सदस्यांची ... Read More »

जम्मू काश्मीरात विक्रमी ७१.२८% मतदान 

१२१ वर्षीय महिलेचे मतदान जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात रामबन जिल्ह्यात १२१ वर्षीय महिला मतदाराने काल मतदान केले. १२१ वर्षीय नूर बीबीने कब्बी गावातील मतदान केंद्रावर काल दुपारी मतदान केल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. परिवारजनांसोबत ती मतदानाला आली होती. तिने अजून एकही मतदान चुकविलेले नसल्याचे तिच्या परिवारजनांनी सांगितले. Read More »