ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी संघटना करणार शक्तीप्रदर्शन

आठपैकी एकच मागणी पूर्ण झाल्याने नाराजी पर्यटक टॅक्सीवाल्यांच्या दहा मागण्यांपैकी आठ मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. प्रत्यक्षात भाडेवाढ वगळता अन्य कोणतीही मागणी पूर्ण केली नाही, मागण्या धसास लावण्यासाठी विधानसभा अधिवेशनाच्या काळात शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरविले असून यासंबंधी लवकरच कृषी कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेचे सरचिटणीस विनायक नानोसकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. Read More »

पुरावे नसल्याने हाफीजला पकडणे अशक्य : पाकिस्तान

पत्रकार वेद प्रताप वैदिक व मुंबई हल्ल्यातील सूत्रधार हाफीज सईद यांच्या भेटीचा विषय गाजत असतानाच, या भेटीबद्दल कल्पना नव्हती असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. हाफीजविरुद्ध काहीही पुरावा नाही त्यामुळे त्याला अटक करणेही शक्य नसल्याचे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितले. प्रेस क्लब इंडियाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी असेही स्पष्ट केले की हाफीज-वैदिक भेटीशी पाकिस्तानचा काही संबंध नसून ही ... Read More »

सरकारने माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विस्तार करावा

माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांचे साकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मनुष्य बळाचा गोव्यातच वापर झाल्यास ब्रेन ड्रेनवर नियंत्रण येऊ शकेल त्यामुळे सरकारने गोव्यात माहिती तंत्रज्ञान उद्योग स्थापन करून त्याचा विस्तार करावा, अशी मागणी करणारे निवेदन या क्षेत्रातील व्यावसायिकांनी सरकारला सादर केले आहे. गोव्यात संधी नसल्याने येथील युवकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते. इच्छा आहे म्हणून लोक बाहेर जाणे पसंत करीत नसतात. रोजगारासाठी जावे लागते. ... Read More »

विनयभंग करणार्‍या शिक्षकावर कारवाई नाही : नाराजी

कांदोळी येथील एका विद्यालयातील एका शिक्षकाने एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याची घटना घडल्यानंतरही सदर शिक्षकावर कोणतीही कारवाई न केल्याने विद्यालयाच्या प्राचार्याने आपल्या पदाचा गैरवापर केलेला असून या विनयभंग प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी करणारे एक निवेदन ‘ह्युमन राईट्‌स डिफेन्डर्स’ या बिगर सरकारी संघटनेने एका निवेदनाद्वारे गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या शेट तानावडेकर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी माहिती हक्क ... Read More »

साकवाळ सरपंचांना लाच घेताना अटक

भ्रष्टाचारविरोधी पोलिसांनी काल साकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांना लाच घेण्याच्या प्रकरणी रंगेहाथ अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. श्री. बोरकर यांनी घराच्या बांधकामास ना हरकत दाखला देण्यासाठी संबंधितांकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. भ्रष्टाचारविरोधी पोलिसांनी वरीलप्रकरणी सापळा रचून बोरकर यांना अटक केली व त्याच्याकडून ७५ हजार रुपये जप्त केले. आज त्याला रिमांडसाठी न्यायालयासमोर उभे करणार असल्याची माहिती बास्को जॉर्ज ... Read More »

गोव्यात सहा नवे आयएएस अधिकारी

काल जारी करण्यात आलेल्या एका आदेशाद्वारे आयएएस केशवचंद्रा व आयएएस मिहीर वर्धन यांची गोव्याबाहेर बदली झाली आहे. गोव्याला नवे सहा आयएएस अधिकारी मिळाले आहेत. दरम्यान, पोलीस उपमहानिरीक्षक ओ. पी. मिश्रा व ब्रह्मा सिंग व एस. पी. विजयसिंग यांचीही गोव्याबाहेर बदली झाली आहे. तर पी. करुणाकरन, सिंधू पिलाई, सुनील गर्ग, आणि व्ही. रंगनाथन यांना गोव्यात पाठविले आहे. Read More »

दिल्लीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर

राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या दिल्ली राज्यांचा ३६, ७७६ कोटी रुपयांचे, करांचा कोणताही प्रस्ताव नसलेला अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांनी काल संसदेत मांडला. अर्थसंकल्पात वीज अनुदानासाठी २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शिक्षणासाठी २४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पीय प्रस्तावांना कॉंग्रेस व अन्य विरोधकांनी विरोध दर्शविला. Read More »

मुंबईतील २२ मजली इमारतीला आग : एक मृत्यूमुखी

पश्‍चिम मुंबईतील लोटस बिझनेस पार्क या २२ मजली इमारतीला काल सकाळी आग लागल्यानंतर ती विझविण्याच्या कामात गुंतलेला अग्नीशामक दलाचा एक जवान मृत्यूमुखी पडला. तसेच सहाजण या दरम्यान गंभीर जखमी झाले आहेत. या आगीवर नियंत्रणासाठी ४० पाण्याचे बंब मागविण्यात आले. चारतासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. Read More »

युवकांनी अल्पसंतुष्ट न राहता यशोशिखरांना गवसणी घालावी

सत्कारमूर्ती डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा सल्ला मानवी प्रतिभा व कल्पनाशक्ती याला कोणतीही मर्यादा नसून युवा पिढीने अल्पसंतुष्ट न राहता एव्हरेस्टसारख्या यशाच्या मोठ्या शिखरांना गवसणी घालण्याचे उद्दिष्ट बाळगून अथक परिश्रम करीत रहायला हवे असे प्रयत्न होतील तेव्हाच भारत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश गाठू शकेल, असे थोर भारतीय शास्त्रज्ञ तथा गोमंतकीय सुपूत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काल येथे आपल्या सत्कारानंतर ... Read More »

युवकांनी अल्पसंतुष्ट न राहता यशोशिखरांना गवसणी घालावी

सत्कारमूर्ती डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा सल्ला मानवी प्रतिभा व कल्पनाशक्ती याला कोणतीही मर्यादा नसून युवा पिढीने अल्पसंतुष्ट न राहता एव्हरेस्टसारख्या यशाच्या मोठ्या शिखरांना गवसणी घालण्याचे उद्दिष्ट बाळगून अथक परिश्रम करीत रहायला हवे असे प्रयत्न होतील तेव्हाच भारत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश गाठू शकेल, असे थोर भारतीय शास्त्रज्ञ तथा गोमंतकीय सुपूत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काल येथे आपल्या सत्कारानंतर ... Read More »