ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

जम्मू-काश्मीर बंदमुळे जनजीवनावर परिणाम

श्रीनगर जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दहशतवाद्यांबरोबरील चकमकींदरम्यानच्या स्फोटात ७ नागरिक ठार झाल्याच्या निषेधार्थ विभाजनवाद्यांनी काल बंद पुकारल्याने राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. Read More »

‘मी टू’ः तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली महिलांवरील लैंगिक छळणुकीप्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘मी टू’ चळवळीमुळे अनेक महिलांनी संबंधितांची नावे घेऊन लैंगिक छळणुकीचे आरोप केले असून त्यांच्यावर एफआयआर नोंदविण्याची मागणी करणार्‍या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. Read More »

मृतदेह गायबप्रकरणी दोघांची दोन तास चौकशी

पणजी (प्रतिनिधी) गुन्हा अन्वेषण विभागाने बांबोळी येथील गोमेकॉच्या शवागारातून गायब झालेल्या जानूझ गोन्साविस (२४ वर्षे) या युवकाच्या मृतदेह प्रकरणी फोरेन्सिक विभागाचे निलंबित प्रमुख डॉ. एडमंड रॉड्रीगीस व इतर दोघांची काल दोन तास चौकशी केली. या प्रकरणी फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. एडमंड रॉड्रीगीस, तांत्रिक साहाय्यक मच्छिंद्रनाथ जल्मी, साहाय्यक प्रकाश नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात ... Read More »

आयपीबीच्या ओएसडींना कॉंग्रेस नेत्यांचा घेराव

पणजी (न. प्र.) गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे चेअरमन असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत मंडळाने नव्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप करीत काल कॉंग्रेस पक्षाने या मंडळाचे ओएसडी तुळशीदास पै यांना घेराव घालून धारेवर धरले. युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, प्रसाद आमोणकर, विजय भिके, जनार्दन भंडारी व ऍड. दिया शेटकर यांनी पै यांना घेराव घालून त्यांना धारेवर धरले. Read More »

बांबोळीत आजपासूनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अंतराळ सुरक्षा, सुनामीवर चर्चा

पणजी (प्रतिनिधी) जनरल फोरम फॉर इंटरग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी (एफआयएनएस) ने आज दि. २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान बांबोळी येथे तारांकित हॉटेलमध्ये आयोजित सागर २.० या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेत बाह्य अंतराळ सुरक्षेवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लेफ्ट. जनरल डी. बी. शेकतकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. या परिषदेचे उद्घाटन २३ रोजी संध्याकाळी ५ वाजता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या ... Read More »

वास्कोत एटीएम, दोन दुचाक्या आगीत खाक

वास्को (न. प्र.) सासमोळे बायणा येथे रॉबिनयन रेसिडेन्सी इमारतीतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला आग लागून एटीएम खाक झाले. तेथे पार्क करून ठेवलेल्या एक स्कूटर व एक मोटरसायकलही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. तसेच ३ चारचाकी वाहने किरकोळ स्वरुपात जळली. सदर घटना रविवारी रात्री १.२० वा. घडली. आगीमुळे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या इमारतीतील दोन दुकाने आगीतून बचावली. दरम्यान, आगीची ... Read More »

राज्यात सरकारी नोकर्‍यांचा सौदा ः कॉंग्रेस

पणजी (न. प्र.) सरकारने मांद्रे मतदारसंघातील १०५ जणांना सरकारी नोकर्‍या दिल्यानेच आपण आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे दयानंद सोपटे यांनी केलेले विधान ही गंभीर बाब असून सरकारी नोकर्‍यांचा सौदा चालू आहे हे यावरून स्पष्ट होत असल्याचा दावा काल विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रश्‍नी कॉंग्रेस उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने सरकारी पदे विक्रीवर ... Read More »

अन्न भेसळ तपासणीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा

पणजी (न. प्र.) गोव्यातील लोकांच्या अन्नात भेसळ होते आहे की काय यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्यात एक जागतिक दर्जाची प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असून भारताच्या ‘एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी’कडे या प्रयोगशाळेची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी काल कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत पर्वरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. अन्नात भेसळ होत असलेल्या ज्या तक्रारी येतील त्या ... Read More »

विजय हजारे चषक तिसर्‍यांदा मुंबईकडे

बेंगळुरू आदित्य तरेच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात दिल्लीवर ४ गडी राखून विजय मिळवित मुंबईने तिसर्‍यांदा विजय हजारे चषकावर नाव कोरले. बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. मुंबईने यापूर्वी २००६-०७मध्ये राजस्थानवर मात करीत या चषकावर शेवटचे नाव कोरले होते. दिल्लीकडून मिळालेल्या १७८ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ (८), अजिंक्य रहाणे (१०), श्रेयस अय्यर ... Read More »

सायना अंतिम फेरीत

ओडेन्स भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने आपली विजयी घोडदौड कायम राखताना डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दुसर्‍यांदा धडक दिली. पुरुष एकेरीत मात्र भारताच्या किदाम्बी श्रीकांतचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. काल झालेल्या महिलांच्या उपांत्य फेरीत सायनासमोर आव्हान होते ते इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्काचे. परंतु सायनाने मारिस्काचे आव्हान २१-११, २१-१२ अशा सरळ सेट्‌समध्ये मोडित काढत स्पर्धेची दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठली. ... Read More »