ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

माओवाद्यांशी संबंधांवरून महाराष्ट्र पोलिसांचे ५ राज्यांत अटकसत्र

>> गोव्यातही एकाच्या घराची झडती ः पंतप्रधान मोदींच्या हत्या कटाशी संबंधांचा संशय माओवाद्यांशी संबंध असल्याचा संशय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माओवादी हत्या करणार असल्याच्या दाव्याच्या आधारावर काल पुणे पोलिसांनी पाच राज्यांमध्ये संबंधित संशयितांच्या ठिकाणांवर छापे मारून तेलगुतील सुप्रसिद्ध कवी पी. वरावर राव, गौतम नवलखा, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, अनू भारद्वाज यांच्यासह काही अन्य कार्यकर्त्यांना अटक केली. या प्रकरणी गोव्यातही ... Read More »

कंत्राटी शेती विधेयक विधानसभेत मांडणार

>> भाज्या विदेशात निर्यातीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन देणार ः सरदेसाई कंत्राटी शेती विधेयक राज्य विधानसभेच्या आगामी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. राज्यातील भाजीच्या विदेशात निर्यातीसाठी पुढाकार घेणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास योजना राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. मिरामार येथील धेंपो विज्ञान व कला महाविद्यालय, कृषी खाते आणि गोवा फलोत्पादन महामंडळ यांच्या ... Read More »

द्रमुक अध्यक्षपदी स्टॅलिन बिनविरोध

द्रमुक पक्षाचे अध्यक्ष म्हणून या पक्षाचे दीर्घकालीन सर्वेसर्वा स्व. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची काल बिनविरोध निवड झाली. मोठे बंधू एम. के. अलगिरी यांच्या विरोधाला न जुमानता ही निवड झाली आहे. सुमारे अर्धा शतक अध्यक्षपदी राहिलेल्या करुणानिधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा वारसदार म्हणून आपल्या हयातीतच स्टॅलिन यांची निवड केली होती. एका सभेत स्टॅलिन यांच्या निवडीची घोषणा करण्यात आल्यानंतर द्रमुक कार्यकर्त्यांनी ... Read More »

राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय

मागील काही दिवसांपासून कमजोर बनलेला मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवनावर परिणाम झाला. आजही राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात आत्तापर्यंत ८९.०७ इंच पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद १५ टक्के कमी आहे. हवामान खात्याच्या सरासरीनुसार आत्तापर्यंत सुमारे १०४ इंच ... Read More »

जायकाप्रकरणी दिगंबर कामत विशेष न्यायालयात उपस्थित

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी जायका प्रकरणी म्हापसा येथील विशेष न्यायालयात काल हजेरी लावली. सक्तवसुली विभागाने या मनी लॉण्डरींग प्रकरणी तक्रार केली आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार कामत प्रमुख संशयित आरोपी आहेत. तर माजी बांधकाम मंत्री तथा बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव दुसरे संशयित आरोपी आहेत. जायका प्रकरणी कामत यांनी खास न्यायालयात उपस्थिती लावल्यानंतर त्यांची वैयक्तिक २५ हजार ... Read More »

ऐतिहासिक कांस्य

टेबल टेनिसमध्ये दक्षिण कोरियाकडून भारताला ३-० असा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत ३९व्या स्थानावरील जी. साथियान याला पहिल्या सामन्यात ली सांगसू याने ११-९, ९-११, ३-११, ३-११ असे हरविले. यानंतर अटीतटीच्या लढतीत शरथ कमल याचा सिक जियोयंग याने ९-११, ९-११, ११-६, ११-७, ८-११ असा पराभव केला. २२ वर्षीय योजिन जांग याने अँथनी अमलराज याचा ५-११, ... Read More »

मनजीतची सुवर्णधाव

>> ८०० मीटरमध्ये जिन्सन जॉन्सनला रौप्य ऍथलेटिकच्या ट्रॅक प्रकारांमध्ये भारताने काल शानदार कामगिरी केली. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही भारताचे धावपटू मनजीत सिंग आणि जिन्सन जॉन्सन यांनी पदकांचा डबल धमाका करत इतिहास रचला. मनजीतने १ मिनिट आणि ४६.१५ सेकंदात ८०० मीटर अंतर कापत सुवर्ण पदक पटकावले. ८०० मीटरमध्ये १९८२ साली भारताने शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे मनजीतची कालची कामगिरी खास ठरली. ... Read More »

तिरंदाजीत भारताला रौप्य पदके

जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल तिरंदाजी कंपाऊंड प्रकारात भारतीय पुरुष आणि महिला संघांना दक्षिण कोरिया संघांकडून पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले. तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात भारतीय पुरुष संघाचा दक्षिण कोरियाविरुद्ध झालेला अंतिम सामना रोमहर्षक झाला होता. परंतु चौथ्या सेटसाठी दोघांमध्ये बरोबरी झाली आणि अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन साईनी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला शूटआऊटमध्ये ... Read More »

२५ टक्के गळतीमुळे पाणी पुरवठ्यात समस्या

>> मंत्री सुदिन ढवळीकर : अनेक प्रकल्पांमुळे दोन वर्षांत स्थिती सुधारणार राज्यात दरदिवशी ७०० एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण करून नागरिकांना पुरवठा केला जात आहे. परंतु, पाण्याच्या वितरणामध्ये सुमारे २५ टक्के पाण्याची गळती होत असल्याने सर्वच भागात मुबलक प्रमाणात पाण्याच्या पुरवठ्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. राज्यातील पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असून आगामी दोन वर्षात पाणी पुरवठ्यामध्ये निश्‍चित ... Read More »

गोवा डेअरीच्या अधिकार्‍याला लाचप्रकरणी एसीबीकडून अटक

भ्रष्टाचार विरोधी विभागाने (एसीबी) कुर्टी फोंडा येथील गोवा डेअरीचे साहाय्यक व्यवस्थापक (अभियांत्रिकी) विनायक धारवाडकर यांना एका कंत्राटदाराकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहाथ पकडले. एसीबीने लाच घेताना ताब्यात घेतलेले विनायक धारवाडकर गोवा डेअरीमध्ये डेअरी विकास राष्ट्रीय प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहे. गोवा डेअरीला केंद्राकडून डेअरी विकास योजनेखाली निधी प्राप्त होतो. या निधीतून आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी केली जाते. या ... Read More »