ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

भारत-विंडीज दुसरी वनडे आज

विशाखपट्टणम भारत व विंडीज यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळविला जाणार आहे. या मैदानावर नाणेफेकीचा कौल विजेता ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून झालेल्या सातही सामन्यात नाणेफेक जिंकलेला संघच सामन्याचा विजेता ठरला आहे. गुवाहाटी येथील पाटा खेळपट्टीवर विंडीजला ३२२ धावांचा यशस्वी बचाव करण्यात अपयश आले होते. शिमरॉन हेटमायरचा अपवाद वगळता विंडीजच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले ... Read More »

घरच्या मैदानावर गोव्यासमोर मुंबईचे आव्हान

गोवा दोन अवे लढतीत चमकदार कामगिरी केल्यानंतर आज एफसी गोवा संघ घरच्या मैदानावर इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आपला तिसरा सामना मुंबई सिटी एफसी संघाविरुद्ध खेळणार आहे. बुधवारी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर मुंबईविरुद्ध फॉर्म कायम राखण्याचा त्यांचा निर्धार असेल. दोन सामन्यांतून चार गुण मिळविलेला गोवा सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. पहिल्या सामन्यात गोव्याला नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध २-२ अशी बरोबरी ... Read More »

अडकोण-भोम येथे गाडीवर वृक्ष पडून ५ लाखांची हानी

माशेल (न. वा.) भोम वरचावाडा येथे काल दुपारी २ वाजता अचानक पाऊस वारा नसताना भलामोठा वृक्ष झाडाच्या खाली पार्क केलेल्या जीए ०५ टी २२४८ या मासळी वाहतूक करणारे ज्ञानेश्‍वर नाईक यांच्या बॉलेरोगाडीवर तसेच डिओ जीए ०५ सी ४३६७ स्कूटरवर कोसळला. बॉलेरो गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून डिओ स्कुटरचेही नुकसान झाले. बॉलेरो गाडीचे अंदाजे ५ लाख रुपये एवढे नुकसान झाल्याचे बॉलेरोचे ... Read More »

साळगावकरचा विजय

पणजी (क्री. प्र.) गोवा प्रो लीग स्पर्धेतील काल सोमवारी धुळेर येथे झालेल्या सामन्यात साळगावकर एफसीने बार्देश एफसीचा ३-१ असा पराभव केला. कॉर्प्स ऑफ सिग्नल्सविरुद्धच्या सामन्यात चार गोल झळकावल्यामुळे आत्मविश्‍वास उंचावलेल्या साळगावकरने कालदेखील आक्रमक खेळाची पुनरावृत्ती केली. बार्देशने सामन्यातील पहिला गोल केला. ४५व्या मिनिटाला रिचर्ड कार्दोझच्या पासवर ड्वेन टिकलो याने हा गोल झळकावला. मोबिन राय याने अवैधरित्या चेंडू हाताळल्यामुळे साळगावकरला ७२व्या ... Read More »

गोव्याच्या फलंदाजांची हाराकिरी

पणजी (क्री. प्र.) विजय मर्चंट सोळा वर्षांखालील दक्षिण विभागीय क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात गोव्याने हैदराबादविरुद्ध वर्चस्वाची संधी काल गमावली. जीसीए अकादमी मैदानावर काल दुसर्‍या दिवशी गोव्याचा पहिला डाव १५३ धावांत संपला. हैदराबादला पहिल्या दिवशी १८७ धावांत गुंडाळल्यानंतर गोव्याला वर्चस्वाची संधी होती. परंतु, गोव्याची फलंदाजी कोलमडली. केवळ कौशल हट्टंगडी (५६), लखमेश पावणे (२५) यांनी थोडाफार प्रतिकार केला. हैदराबादकडून निखिलने ६ गडी बाद ... Read More »

बंगळुरूचा पुण्यावर दणदणीत विजयर

पुणे इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात गतउपविजेत्या बंगळुरू एफसीने एफसी पुणे सिटीवरील वर्चस्वाची मालिका कायम राखत ३-० असा दणदणीत विजय मिळविला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने पूर्वार्धात दोन मिनिटांच्या अंतराने केलेले दोन गोल बहुमोल ठरले. व्हेनेझुएलाच्या मिकूने उत्तरार्धात एका गोलची भर घातली. बंगळुरूने तीन सामन्यांत दुसरा विजय मिळविला असून त्यांनी एक बरोबरी साधली आहे. त्यांचे सात ... Read More »

वेस्ली, स्नेहाला दुहेरी किताब

पणजी (क्री. प्र.) क्लब टेनिस दी गास्पर डायस टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेेत वेस्ली रोझारियो याने पुरुष व कनिष्ठ गटाचे विजेतेपद पटकावत दुहेरी किताब मिळविला. स्नेहा राणे हिने उपकनिष्ठ व कनिष्ठ गटात बाजी मारत शानदार कामगिरी केली. सृकृती दासने महिला एकेरीचे जेतेपद आपल्या नावे केले. गोवा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष व्हेरो नुनीस, उपाध्यक्ष विष्णू कोलवाळकर, क्लब गास्पर डायसचे सचिव सुनील नाईक, ... Read More »

काणकोणात पर्यटकांची वर्दळ!

पैंगीण (न. प्र.) काणकोण तालुक्यातील समुद्रकिनारे जगप्रसिध्द आहेत. या तालुक्याला २६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. पाटणे, पाळोळे, आगोंद हे किनारे देशी तसेच विदेशी पर्यटक जास्त पसंत करतात. राज्यातील पर्यटन हंगामाला सुरूवात झाली असून देशी, विदेशी पर्यटक काणकोणातील समुद्र किनार्‍यांवर यायला सुरुवात झाली आहे. काणकोण तालुक्यातील बहुसंख्य किनार्‍यांवर वर्षाचे बाराही महिने पर्यटक असतातच. पण पावसाळ्यात त्यांची संख्या खूप कमी असते. ... Read More »

सुभाष वेलिंगकरनी मांद्रेतून निवडणूक लढवावी ः गोसुमं

हरमल (न. वा.) गोव्याच्या राजकारणाला नवसंजीवनी देण्यासाठी सुभाष वेलिंगकरांनी गोव्याच्या राजकीय पटलावर पदार्पण करताना मांद्रे मतदारसंघांतून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी गोवा सुरक्षा मंच मांद्रे प्रभागाने पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. या पत्रकार परिषदेला विनायक च्यारी यांच्यासमवेत उत्तर गोवा सरचिटणीस अभय सावंत, कार्याध्यक्ष राया नाईक, उपाध्यक्ष कृष्णा नाईक, शशिकांत हरमलकर, युवा अध्यक्ष स्वरूप नाईक, सचिव संजय नाईक, सदस्य शशिकांत पेडणेकर आदी ... Read More »

टप्प्याटप्प्याने भूमिगत वीजवाहिन्या ः काब्राल

सांगे (न. प्र.) राज्यात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सामान्य लोकांवर भार न घालता टप्प्याटप्प्याने केले जाईल. हे काम संयुक्त पद्धतीने किंवा पीपीपी मॉडेलद्वारे केले जाईल असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले. पंटेमळ – कुडचडे येथील ३३/११ केव्ही वीज उपस्थानकावरील ११ केव्ही असोल्डा – शेळवण फीडर कार्यान्वित केल्यानंतर तसेच भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामाच्या पायाभरणीवेळी वीजमंत्री बोलत होते. यावेळी कुडचडे काकोडाचे नगराध्यक्ष फॅलिक्स फर्नांडिस, ... Read More »