ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

भारताचा निसटता पराभव

जोहोर बाहरू सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेतील आपल्या शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात भारताला काल ब्रिटनकडून २-३ असा निसटता पराभव पत्करावा लागला. यामुळे सलग चार विजय मिळविलेल्या भारताची अपराजित घोडदौड खंडित झाली. कालच्या सामन्यापूर्वीच भारताने आपला अंतिम फेरीतील प्रवेश नक्की केल्याने निकालाचा परिणाम झाला नाही. १२ गुणांसह भारतीय संघ पहिल्या स्थानी असून पाच सामन्यांतून ३ विजयांसह १० गुण घेत ब्रिटनचा संघ ... Read More »

श्रीलंका अंतिम फेरीत

पणजी (क्री. प्र.) के. सिल्व्हाचे शतक आणि चंदना देसप्रिया ६६ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर जोरावर श्रीलंकेने इंग्लंडला एफतर्फी लढतीत १० गड्यांनी नमवित पर्वरी येथील जीसीएच्या मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या दृष्टिहीनांच्या टी-२० क्रिकेट तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता शनिवारी होणार्‍या अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेचा सामना यजमान भारताविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध ... Read More »

वास्कोतील गरबा, दांडिया कार्यशाळेचा समारोप

वास्को (न. प्र.) लोककलेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असल्याने लोककलेची जपणूक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रवींद्र भवन बायणाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी केले. रवींद्र भवन बायणातर्फे आयोजित गरबा, दांडिया कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी सदस्य नोएला रॉड्रिग्ज, प्रसाद प्रभुगावकर, सुदेश भोसले, मोहन डिचोलकर, रामानंद रायकर, दांडिया गरबा प्रशिक्षक उमेश फटजी उपस्थित होते. गेले आठ दिवस चाललेल्या या ... Read More »

नौदल अधिकार्‍यांच्या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन

वास्को (न. प्र.) नोफ्रा, दाबोळी येथे नौदल अधिकार्‍यांसाठी उभारण्यात आलेल्या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन पश्‍चिम विभागाचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल गिरीष लुथ्रा यांच्या हस्ते करण्यात आले. विवाहितांसाठी असलेल्या आवास योजनेअंतर्गत १०० सदनिकांचा हा प्रकल्प आहे. डिसेंबर २००९ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. परंतु काही तांत्रिक समस्यांमुळे दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. नोफ्रा दाबोळी येथे पाच बहुमजली इमारती उभारण्यात ... Read More »

पेडणे दसरोत्सवात चोख बंदोबस्त ठेवा

पेडणे (न. प्र.) पेडणे येथील प्रसिद्ध दसरा आणि सुप्रसिद्ध पुनव उत्सवात सर्व खात्याच्या अधिकार्‍यांनी चोख बंदोबस्ताबरोबरच कोणतीच भाविकांची गैरसोय होणार नाही यांची दखल घेऊन कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा महत्त्वाच्या सूचना पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी ११ रोजी पेडणे शासकीय विश्रामधाम येथे अधिकार्‍यांच्या बैठकीत केल्या. यावेळी पेडणे उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर, मामलेदार राजेश आजगावकर, वाहतूक अधिकारी पिलर्णकर, वीज साहायक अधिकारी के. व्हीलीयम, पोलीस ... Read More »

शेतकर्‍यांना अधिक प्रभावी योजना हव्यात

पेडणे (न. प्र.) शेतकरी शेतीद्वारे आपला उदरनिर्वाह चालवत असतात. विविध योजना कार्यरत असल्या तरी त्या योजना वाढवण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आगामी काळात आधुनिक यंत्रांची संख्या वाढवण्यासाठी आता शेतकर्‍यांनी शेतीची व्याप्ती वाढवून पडीक शेती ओलिताखाली आणावी, असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी केले. ते मांद्रे येथे पेडणे तालुका शेतकरी सोसायटीच्या मालकीच्या भात कापणी मळणी हार्वेस्टिंग यंत्राचा शुभारंभ करताना बोलत होते. ... Read More »

कला अकादमीत चतुरंग नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन

पणजी (सां. प्र.) पणजी येथील कला अकादमीत काल शुक्रवार दि. १२ रोजी चतुरंगच्या बहुभाषिक नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनाचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर यांच्या हस्ते चतुरंग नाट्यमहोत्सवाचे पारंपरिक समई प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. यंदाचा महोत्सव रंगकर्मी स्व. तातोबा वेलिंगकर यांना अर्पण करण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर सेझा गोवाचे मुख्य कार्यकारी ... Read More »

खरपाल येथे अपघातात दोडामार्गचे तीन जखमी

दोडामार्ग (न. प्र.) गोवा दोडामार्ग खरपाल गोवा हद्दीत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास स्कूटरवरून कामावर जात असताना कालव्यावरून मोटारसायकल घेऊन आलेल्या दोघा युवकांनी स्कूटरला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोडामार्गमधील तीन जण जखमी झाले. जखमींवर गोवा येथे उपचार सुरू आहेत. दोडामार्ग येथील आनंद हेरेकर हे आपली स्कूटर घेऊन दोडामार्ग पणजी मुख्य रस्त्याने गोव्यात जात होते. तर दोडामार्ग थेथिल विनायक ताटे व ... Read More »

खाण कंपन्यांकडून कामगारांना घरी पाठवण्याची प्रक्रिया सुरू

Read More »

केरी-पालयेत रेती वाहतूक रोखली

हरमल (न. वा.) पालये -किरणपाणी व केरी येथील स्थानिक रेती व्यावसायिकांनी महाराष्ट्रातून बेकायदेशीरपणे रेती, चिरे, खडीची पालये – किरणपणीमार्गे गोव्यात वाहतूक करणार्‍या ट्रक वाहनचालकांनाआज शुक्रवार दि. १२ रोजी पालये किरणपाणी येथे पाच तास रोखून धरून ट्रक वाहतूक माघारी वळवली. दरम्यान जोपर्यंत सरकारकडून येथील स्थानिक रेती व्यावसायिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पालये-किरणपाणीमार्गे महाराष्ट्रातील रेती वाहतुकीचे ट्रक रोखून धरले जातील व याविरुद्ध ... Read More »