ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

गोसुमंची डिचोलीत संघटनात्मक बांधणी

डिचोली (न. प्र.) गोवा सुरक्षा मंचच्या राज्यव्यापी बूथ चलो अभियानाचा भाग म्हणून वेगवेगळ्या मतदारसंघात बूथ संघटना बांधण्याासाठी पक्ष कार्यकर्ते झटत आहेत. पक्षाचे प्रेरणास्थान सुभाष वेलिंगकर ह्यांच्या उपस्थितीत रविवारी डिचोलीत मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या. डिचोली मतदारसंघातील लामगाव, कुंभारवाडा, भायली पेठ, नाईकनगर, खरपाल, साळ अशा विविध भागात बैठका यशस्वीपणे घेण्यात आल्या. यावेळी श्री. वेलिंगकर यांनी, उपस्थितांना मार्गदर्शन केले. कुबड्यांच्या आधारावर असलेल्या सरकारला ... Read More »

डिचोलीची केंद्र शाळा इमारत धोकादायक

डिचोली (न. प्र.) डिचोली येथील राज्यातील सर्वात आदर्श प्राथमिक शाळा अशी ख्याती असलेल्या डिचोली सरकारी केंद्र शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. या इमारीतीच्या भिंतीला विविध ठिकाणी तडे गेल्याने व नियमित सिमेंटचे तुकडे वर्गात पडत असल्यामुळे शाळेत शिकणार्‍या ३८५ मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. गेले सुमारे दोन वर्षे सतत पाठपुरावा करूनही सरकारकडून जी तातडीची कार्यवाही अपेक्षित होती ती ... Read More »

चिखली इस्पितळाचे लवकरच लोकार्पण करणार

वास्को (न. प्र.) चिखली येथील लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या उप-जिल्हा इस्पितळाच्या उद्घाटनाला या इस्पितळाला लागणार्‍या नोकरभरतीमुळे उशिर झाला असून नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच इस्पितळाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. नवेवाडे येथील निवेदम् सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा संस्थेतर्फे आयोजित अकराव्या अखिल गोवा दांडिया गरबा नृत्य स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ... Read More »

जांबावली दामोदर संस्थानच्या वैद्यकीय केंद्राचे उद्घाटन

मडगाव (न प्र.) जांबावली येथे श्री रामनाथ दामोदर संस्थान समितीने मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध केलेली असून सदर केंद्राचे उद्घाटन दसर्‍याच्या दिवशी रिवणचे सरपंच सुर्यकांत नाईक यांच्या हस्ते झाले. रविवार वगळता रोज दुपारी १.३० ते ३.३० पर्यंत मडगावचे डॉक्टर व्यंकटेश हेगडे सदर केंद्रात रुग्णांवर उपचार करतील. तर परिचारीका निशा लोलयेकर त्यांना मदत करतील. केंद्राच्या उद्घाटनावेळी संस्थानचे अध्यक्ष प्रकाश कुंदे, दत्ता हेगडे, ... Read More »

आयुष्याचा ‘सेतू’ अधांतरीच!

———————————————————————————- खोतीगाव पंचायत क्षेत्रात अनेक समस्या : लोक जगताहेत हलाखीचे जीवन ———————————————————————————————— काणकोण (न. प्र.) गोवा मुक्त होऊ अर्धे शतक उलटले. मात्र खोतीगाव पंचायत क्षेत्रातील कित्येक वाड्यांना आजही रस्ता, पूल नसल्यामुळे अन्य भागाशी संपर्क तुटलेला आहे. त्यातच अभयारण्याच्या जाचक नियमांमुळे मूळ भूमीपूत्र आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत असल्याचे दिसत आहे. या पंचायतीची स्थापना १९६९ साली म. गांधीजीच्या जन्मशताब्दीच्या काळात झाली. ... Read More »

आधुनिक यंत्राद्वारे शेती करा : पाटणेकर

डिचोली (न. प्र.) आज युवा पिढी शेतीकडे पाठ फिरवताना दिसते. मात्र, सरकारी योजनांचा लाभ घेत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतातून भरपूर उत्पन्न मिळेल आणि युवा पिढीचा रोजगाराचा मार्ग निकालात निघेल. मात्र, यासाठी युवा पिढीने पुढे येत सरकारच्या शेतीपूरक विविध योजनांचा लाभ घेत आधुनिक यंत्राचा वापर करत शेती केली पाहिजे, असे आवाहन आमदार राजेश पाटणेकर यांनी केले. डिचोली बोर्डे येथे यंत्राद्वारे ... Read More »

पी.व्ही. सिंधू दुसर्‍या फेरीत

पॅरिस फ्रेंच ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुुपर ७५० स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. महिला एकेरीत तृतीय मानांकित पी.व्ही. सिंधू हिने विजयी सलामी देताना अमेरिकेच्या बीवन झांग हिचा ३४ मिनिटांत २१-१७, २१-८ असा पराभव केला. दुसर्‍या फेरीत सिंधूचा सामना सायाका साटो व चियुंग एनगान ली यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत मात्र अर्जुन एमआर व रामचंद्रन श्‍लोक यांना द्वितीय मानांकित ली जुनहुई ... Read More »

हॉकी सीरिज फायनल्सचा टप्पा भारतात

लुसान एफआयएच हॉकी सीरिज फायनल्सचा ६ ते १६ जून या कालावधीत होणार्‍या टप्प्याचे यजमानपद भारताला मिळाले आहे. २०२० टोकियो ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी या स्पर्धेद्वारे दोन संघ पात्र ठरणार आहेत. प्रत्येक हॉकी सीरिज फायनल्समधून दोन संघ पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी स्थान मिळविणार आहेत. यजमान भारतासह आशियाई क्रीडा स्पर्धा विजेता जपान, मेक्सिको, पोलंड, रशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका व अजून ... Read More »

टाटा उद्योग समुहाच्या फुटबॉल स्पर्धेस बाणावलीत प्रारंभ

मडगाव (क्री. प्र.) टाटा उद्योग समूहाच्या आंतर कंपन्यांच्या फुटबॉल स्पर्धेस रविवार २२ ऑक्टोबरपासून बाणावली येथील मैदानावर प्रारंभ झाला. टाटा स्पोर्ट्‌स क्लबतर्फे दर वर्षी त्यांच्या देशभरातील विविध राज्यांतील कंपन्यांसाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदा गोव्यात पहिल्यांदाच २२ ते २७ ऑक्टोबरपर्यंत फुटबॉल स्पर्धा आयोजित केली गेली आहे. इंडिया इंडियन हॉटेल्स लिमिटेड (ताज, विवांता आणि जिंजर) यांच्या यजमानपदाखालील या स्पर्धेत टाटा ... Read More »

दिल्ली आणि चेन्नईन लढत गोलशून्य

दिल्ली इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात फॉर्मसाठी झगडत असलेला गतविजेता चेन्नईन एफसी आणि दिल्ली डायनॅमोज एफसी यांच्यातील नीरस लढतीत अखेर गोलशून्य बरोबरी झाली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला, पण त्यांच्यासमोरील समस्यांचा डोंगर कायम राहिला. दिल्लीच्या तुलनेत चेन्नईयीनचे प्रयत्न जास्त होते, पण त्यांना अचूकता साधता आली नाही. दुसर्‍या मिनिटाला चेन्नईयीनने प्रयत्न केला. डावीकडून थोई सिंगने मारलेल्या चेंडूवर एली साबिया ... Read More »