बातम्या

विधानसभा वृत्त

अर्थसंकल्पातील आश्‍वासनांचा  कृती अहवाल देणार : मुख्यमंत्री चालू वर्षीच्या अर्थसंकल्पातून आपण जनतेला १८० प्रकारची आश्‍वासने दिली होती. त्यापैकी किती आश्‍वासने पूर्ण केली व कोणकोणती कामे केली याचा कृती अहवाल आपण सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर परींकर यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी सांगितले. Read More »

संपादित करायच्या भूखंडाची माजी मंत्र्याकडूनच खरेदी

मडकईकर यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश सन २००४ मध्ये जुने गोवे पोलीस स्थानकासाठी तत्कालीन मंत्री व कुंभारजुवेचे विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांनी सुचविलेल्या जमिनीचे संपादन करण्यास आपण तात्काळ मान्यता दिली होती. त्यावेळी तो भूखंड धुमे नामक व्यक्तीच्या मालकीचा होता. मात्र, आता तो मडकईकर बिल्डर्सच्या मालकीचा असल्याचे आढळून आले आहे. हा भूसंपादन कायद्याचा सरळसरळ गैरवापर असून भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी पोलिसांकरवी ... Read More »

‘जायका’ प्रकल्पामुळे सरकारी तिजोरीला फटका

महालेखापालांच्या अहवालात साबांखावर ताशेरे जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) तर्फे राज्यात सन २००९ ते २०१३ या काळात राबवण्यात आलेल्या प्रकल्पांवरील ३२९.०१ कोटी रुपयांचा भांडवली खर्च राज्य सरकारच्या खर्चात दाखवलाच गेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजना राबवण्याचा खर्च आणि त्यातून मिळालेला महसूल यांच्यात सन २००८ ते १३ या काळात तब्बल ४८०.५० कोटींची तफावत राहिली असल्याचा निष्कर्ष महालेखापालांनी आपल्या अहवालात काढला आहे. Read More »

भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्यास कारवाई : मुख्यमंत्री

मडगाव परिसरात सुमारे ४ हजार बिगर गोमंतकीय वेगवेगळ्या घरांमध्ये भाडेकरू म्हणून राहात असल्याचे आढळून आले आहेत. त्यांची पार्श्‍वभूमी कुणालाही माहीत नाही. या भाडेकरूंची संबंधितांनी पोलिसांना माहिती पुरविलेली नाही, नवा पोलीस कायदा आल्यानंतर यापुढे ओळख न ठेवता भाडेकरूना ठेवून घेणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. Read More »

रात्री अकरानंतर मद्यालयांत मद्यप्राशन करणार्‍यांनी वाहन चालवल्यास कारवाई

कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच रात्री अकरानंतर मद्यालयात मद्यप्राशन करून परतणार्‍यांच्या वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे, असे प्रकार रोखण्यासाठी रात्री मद्यालयात मद्यप्राशन करण्यासाठी जाणार्‍यांना घेऊन जाणार्‍याने मद्यप्राशन करता कामा नये अशी पध्दत विदेशात आहे. गोव्यातही तसा कायदा करण्याचा व त्याचे पालन न झाल्यास संबंधित मद्यालयांविरुध्दही कारवाई करण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. Read More »

चौदा हजार विद्यार्थ्यांना समुपदेशकांचा दिलासा

राज्यातील विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिक्षण महामंडळाने राबविलेल्या समुपदेशक नियुक्त करण्याच्या योजनेचा बराच फायदा झाल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात समुपदेशकांनी १४,४४७ विद्यार्थ्यांना हाताळण्याचे काम केले. त्यात आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या ५६ जणांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काल विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत यांनी शून्य प्रहरास उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिली. Read More »

शिवसेना खासदाराचे मुस्लिम कर्मचार्‍याशी गैरवर्तन : संसदेत गदारोळ

न्यू महाराष्ट्र सदनमध्ये शिवसेना खासदार राजन विचारे हे रमझानचा उपवास ठेवलेल्या मुस्लिम कर्मचार्‍याच्या तोंडात सक्तीने चपाती कोंबत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर काल संसदेत एकच गदारोळ माजला. या प्रकाराने धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे सांगत संबंधित खासदारांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. Read More »

घरे पाडल्याप्रकरणी कर्नाटक मंत्र्यांची बायणा येथे भेट

काटे बायणा येथे समुद्र किनार्‍यानजीकची धोकादायक घरे पाडल्याप्रकरणी कर्नाटकचे पर्यटन मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कन्नड लोकांशी चर्चा केली. गेली चार दशके हे लोक त्या वस्तीत राहत होते, त्यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे होती, असे असताना त्यांची घरे पाडणे चुकीचे आहे, असे देशपांडे म्हणाले. Read More »

नीता गावसचा मृतदेह सापडला; भावाला अटक

सत्तरीतील न्यू मोर्ले कॉलनीतील दोघा बहिणींनी आमोणा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पैकी बेपत्ता नीता विठ्ठल गावस हिचा मृतदेह काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पिळगांव येथे नदीत आढळला. दरम्यान, फोंडा पोलिसांनी काल नीताचा भाऊ रामचंद्र गावस याला अटक केली. Read More »

‘सेरुला’ भ्रष्टाचार प्रकरणी आणखी एक अटक

पर्वरीत सेरुला कोमुनिदादीत भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा अन्वेषण पोलिसांनी काल ताळगावचे पंचायत सचिव पीटर मार्टिन यांना अटक केली. घोटाळा झाला त्या काळात ते सेरुला कोमुनिदादीचे मुखत्यार होते. दरम्यान, या घोटाळ्यात काही दिवसांपूर्वी सही जणांना अटक करण्यात आली होती. Read More »