बातम्या

नितीश-लालू २३वर्षांनंतर एकत्र जाहीर प्रचार करणार

तब्बल २३ वर्षांनंतर आता राजद प्रमुख लालू प्रसाद यादव व जनता दल (यू) नेते नितीश कुमार एका व्यासपीठावर येऊन निवडणूक प्रचार करणार आहेत. Read More »

कॉंग्रेसला पर्रीकर सरकारच्या ‘गुप्त कार्यक्रमाबाबत’ संशय

गोव्यातील शांतता बिघडवू पहाणार्‍या श्रीरामसेनेसारख्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सरकार पाठिशी घालण्याचा का प्रयत्न करीत आहे, असा प्रश्‍न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी काल केला. पर्रीकर सरकारने आपल्या पक्षाचा ‘गुप्त कार्यक्रम’ राबविण्याचा प्रयत्न चालविण्याचा संशय येत आहे. Read More »

ओडिशा पुरातील बळींची संख्या ४५ : स्थिती अजून बिकट

ओडिशामधील प्रलयंकारी पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ४५ झाली असून पुराचा ३३ लाख लोकांना जबर फटका बसला आहे. राज्याच्या २३ जिल्ह्यांमधील स्थिती या महापुरामुळे बिकट बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंडियाकेटा खेड्यातील घरे अर्धीअधिक पाण्याखाली गेली असून अनेकजण छप्परांवर अडकले आहेत. Read More »

‘इबोला’ रूग्ण भारतातही

आफ्रिकी देशांमध्ये सुमारे ९०० जणांचा बळी घेणार्‍या इबोला व्हायरसचा चेन्नई येथे आढळून आला आहे. मात्र हा रुग्ण भारतीय नसून तो न्यू गिनी देशातून आला आहे. सध्या त्याच्यावर चेन्नईतील राजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Read More »

खाजगी बसगाड्यांवर जाहिराती लावण्यास सरकारची मान्यता

बसमालक संघटनेकडून सरकारचे आभार राज्यातील खाजगी बसगाड्यांवर वेगवेगळ्या जाहिराती लावण्यास मान्यता देण्याच्या मागणीसह अन्य महत्वाच्या मागण्या पूर्ण केल्याबद्दल अखिल गोवा बस मालक संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत पर्रीकर सरकारचे आभार मानले आहे. Read More »

इराणात विमान कोसळून ४८ जण ठार

इराणची राजधानी तेहरानच्या पश्‍चिमी प्रांतात काल एक छोटे प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४८ जण ठार झाल्याचे वृत्त इराणच्या अधिकृत दूरचित्रवाणी वाहिनीने दिले आहे. सदर विमान तबास शहराच्या दिशेने जात असताना मेहराबाद विमानतळाजवळील भागात ते कोसळले. Read More »

आसामात अल्पवयीन मुलीवर विद्यार्थ्यांकडून बलात्कार

येथील रेल्वे स्थानकानजीक काही विद्यार्थ्यांनी एका १५ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार केला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. सदर मुलीबरोबर तिचा शेजारी राहणारा मुलगा होता. त्याला संशयित आरोपीनी मारहाण केली. Read More »

सीमा रेषेनजीक पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी सैनिकांकडून काल सलग दुसर्‍या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारत सीमा रेषेलगत पाक सैन्याकडून भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. Read More »

लष्करप्रमुख जनरल सुहाग यांची सियाचीनला भेट

भारताचे लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी काल सियाचेन हिमनदी भागाला भेट दिली. जम्मू काश्मीरमधील लडाखच्या तीन दिवसीय दौर्‍यावर लष्कर प्रमुख येथे आले आहेत. यावेळी सुहाग यांनी या क्षेत्रात लढताना आहुती दिलेल्या जवानांच्या स्मारकारवर पुष्पांजली अर्पण केली. Read More »

म्हापशात मसाज पार्लरवर छापे

सहा जणांना अटक, पाच मुलींची सुटक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी काल म्हापसा शहरात असलेल्या व्हिनस व मार्स या दोन मसाज पार्लरवर छापे टाकले. यावेळी पाच मुलींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी एकुण सहा जणांना अटक केली. मात्र चौघे प्रमुख आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. Read More »