बातम्या

खाणग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून ३ हजार कोटींच्या निधीसाठी प्रयत्न

खासदार नरेंद्र सावईकर यांची माहिती खाणबंदीमुळे अडचणीत आलेल्या खाणग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून तीन हजार कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्न चालविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून तशी मागणी केली असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे असे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. Read More »

रशियन समर्थक बंडखोरांकडून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न

युक्रेन सरकारकडून अधिकृत निवेदन क्षेपणास्त्राच्या हल्ल्याने पाडण्यात आलेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमान दुर्घटनाप्रकरणी आता युक्रेन सरकारने अधिकृतपणे वक्तव्य केले आहे. रशियाच्या मदतीने बंडखोर या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करत असल्याचे निवेदन काल युक्रेन सरकारने अधिकृतपणे केले. Read More »

लुसोफोनिया स्पर्धेत १०० कोटींचा घोटाळा

कॉंग्रेसचा आरोप : लवकरच सीबीआयकडे तक्रार गेल्या जानेवारी महिन्यात गोव्यात झालेल्या लुसोफोनिया क्रीडा स्पर्धांत ५० ते १०० कोटी रु. चा घोटाळा झाल्याचा दावा कॉंग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. याबाबत आठवडाभरात सीबीआयकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. माहिती हक्क कायद्याखाली आपण मिळवलेल्या माहितीतून संशय घेता येईल अशी बरीच माहिती मिळाली असल्याचा दावाही त्यांनी केला. Read More »

पावसाला घाबरून कॉंग्रेसचा मोर्चा रद्द

येत्या २२ रोजी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा तसेच राज्यपालांना सरकारविरुद्धचे आरोपपत्र सादर करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कॉंग्रेस प्रवक्ते शंभू भाऊ बांदेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. Read More »

शीला दीक्षित यांच्याकडून राज्यपालपदाच्या राजीनाम्याचे संकेत

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर युपीएच्या काळातील काही राज्यपालांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनी राजीनाम्याबाबत संकेत दिले आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या केरळमध्ये असून तिरुअनंतपूरम येथील पद्मनाभस्वामी मंदिराला त्यांनी भेट दिली असता श्रीमती दीक्षित त्यांच्यासोबत होत्या. Read More »

इस्रायलविरोधातील निदर्शकांवर गोळीबार : एक ठार

कुलगाम जिल्ह्याच्या कैमी शहरात काल गाझा पट्टीतील इस्रायली हल्ल्यांविरोधात निदर्शने करणार्‍यांवर झालेल्या गोळीबारात एक युवक ठार झाला. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातर्फे या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. Read More »

मृतदेह स्वीकारण्यास अग्निशामक दलाच्या जवानाच्या पत्नीचा नकार

येथील एका २२ मजली इमारतीला लागलेल्या आग दुर्घटनेत मरण पावलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाच्या कुटुंबियांनी सरकारकडून नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. Read More »

डिचोली अपघातात युवकाचा मृत्यू

डिचोली ते मये रस्त्यावर शासकीय तंत्रनिकेतनजवळ चारचाकी कार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात धबधबा डिचोली येथील सिद्धकाम प्रभाकर राऊळ या १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती डिचोली पोलीस स्थानकातून देण्यात आली. Read More »

खाणबंदीमुळे बेरोजगारांसाठीची योजना ३१ डिसेंबरपर्यंत

ट्रक मालकांसाठीची योजना ३० सप्टेंबरपर्यंत खाण व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगार बनलेल्यांसाठी राबविण्यात आलेली योजना आता ३१ डिसेंबरपर्यंत, तर ट्रक मालकांसाठीची पॅकेज ३० सप्टेंबरपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत या योजनेवर ९० कोटी रु. खर्च झाले आहेत. Read More »

मलेशियन विमानातील सर्वजण ठार झाल्याचे स्पष्ट

१८१ मृतदेह सापडल्याचा दावा युक्रेनमध्ये गुरूवारी क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे पाडण्यात आलेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानातील सर्व २९८ जण ठार झाले असून घटनास्थळी विखुरलेले १८१ मृतदेह ताब्यात घेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. सदर विमान कोणी पाडले याबाबत अद्याप निश्‍चित झालेले नसून रशियावादी बंडखोर व युक्रेनियन सरकार यांनी यासंदर्भात परस्परांवर आरोप केले आहेत. तथापि विविध देशांच्या प्रमुखांनी या कृत्याची स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. Read More »