बातम्या

पुढील काही दिवस पाऊस चालूच राहण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून त्यामुळे पुढील ४-५ दिवस पाऊस चालूच राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. Read More »

मोदींची वाटचाल हिटलरच्या दिशेने : पृथ्वीराज चव्हाण

ऍडॉल्फ हिटलर हा लोकशाही मार्गानेच निवडून आला होता. परंतु कालांतराने त्याने काय केले ते सार्‍या जगाने पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन महिन्यांची कार्यपद्धती पाहता त्यांची पावले हिटलरच्या कार्यपद्धतीच्या दिशेने पडत असल्याचे जाणवत आहे अशी बोचरी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे केली. Read More »

दोन अल्पवयीन मुलींचे शिवोली येथून अपहरण

शिवोली येथील ईशकृपा सदन या वसतीगृहात राहणार्‍या दोघा अल्पवयीन मुलींचे अज्ञातानी अपहरण केल्याची तक्रार येथील सेंट जोसेफ चर्चच्या सिस्टर यांनी हणजुण पोलीस स्थानकात दिली आहे. ओरिसा येथील एक व काणकोण येथील एक (दोन्ही १६ वर्षीय) अशा मुलींचे शिवोली येथून अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार आहे. Read More »

भारत-पाकिस्तानच्या सीमा अधिकार्‍यांची बैठक

पाकिस्तानकडून शस्त्रसंबंधी उल्लंघनाच्या सततच्या प्रकारांनंतर काल वाघा आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दल व पाकिस्तान रेंजर्स यांच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. या ध्वजाधिकारी बैठकीत उभय देशांदरम्यान चर्चा चालू ठेवावी असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीएसएफचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी दिली. Read More »

गोवा फ्रँचाइजी ‘एफसी गोवा’च्या बोधचिन्हाचे अनावरण

Read More »

गोव्याच्या राज्यपालपदी मृदुला सिन्हा यांची नियुक्ती

राज्यपालांच्या नेमणुका गोव्याच्या राज्यपाल म्हणून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष व प्रसिद्ध हिंदी साहित्यिक मृदुला सिन्हा (७१) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल दुपारी राष्ट्रपती भवनातून वरील आदेश जारी करण्यात आला. तूर्त गोव्याच्या राज्यपालपदाचा हंगामी ताबा ओमप्रकाश कोहली यांच्याकडे होता. Read More »

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीतच : प्रवाशांचे हाल

रोहा ते रत्नागिरीदरम्यान ३० गाड्या रखडल्या करंजाडी- वीर दरम्यानच्या मार्गावर रविवारी मालगाडीचे डबे घसरल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसत असतानाच काल पुन्हा कोकण रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक पार कोलमडल्यामुळे चाकरमान्यांचे बरेच हाल झाले. मध्य रेल्वेच्या ड्रायव्हर-गार्ड यांनी घातलेल्या हद्दीच्या वादानेही या गोंधळात भर घातली आहे. या प्रकारामुळे रोहा ते रत्नागिरीदरम्यान ३० गाड्या रखडल्या आहेत. Read More »

‘एफसी गोवा’ क्लबचे दिमाखदार उद्घाटन

‘वन टीम वन ड्रीम’ ध्येयाने प्रेरित गोव्याच्या ‘एफसी गोवा’ संघाचा उद्घाटन सोहळा काल येथे दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. येत्या दि. १२ ऑक्टोबर ते २० डिसेंबर या कालावधीत होणार्‍या या बहुचर्चित तथा बहुप्रतिक्षित ‘हिरो इंडियन सुपर लीग’ मध्ये भाग घेणार्‍या ‘एफसी गोवा’चे नामकरण काल येथील हॉटेल मेरियॉटमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते झाले. तसेच गोव्याचा राज्य प्राणी ‘गवा रेडा’ची ... Read More »

भाजप संसदीय मंडळावरून अडवाणी, जोशी यांना वगळले

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने भाजप संसदीय मंडळावरून पक्षाचे संस्थापक असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना वगळण्यात आले आहे. संसदीय मंडळावर आता अडवाणी व जोशी यांच्या जागी शिवराजसिंग चौहान व जे. पी. नड्डा यांची वर्णी लावली आहे. भाजपची त्रिमूर्ती मानले जाणार्‍या अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची वर्णी आता पाच सदस्यीय मार्गदर्शक मंडळावर लावण्यात ... Read More »

अडवाणी, जोशी भाजपकडून वृध्दाश्रमात

कॉंग्रेसकडून संभावना ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना संसदीय मंडळावरून वगळून मार्गदर्शक मंडळात पाठवणी केल्याप्रकरणी कॉंग्रेसने भाजपच्या निर्णयावर उपहासात्मक टीका केली आहे. भाजपने अडवाणी व जोशी यांना वृध्दाश्रमात दाखल केले आहे अशा शब्दात कॉंग्रेसने भाजपच्या निर्णयाची संभावना केली आहे. Read More »