बातम्या

अखेर पोलीस संरक्षणात ‘ते’ तियात्र सादर

तौसिफ दि नावेलीम या युवकाने लिहिलेल्या ‘आकांतवादी गोयांत नाकात’ या तियात्राच प्रयोग व्हावा यासाठी काल लोकांनी पोलिसांवर दबाव आणून संरक्षण देण्यास भाग पाडले. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात मडगावच्या गोमंत विद्या निकेतन नाट्यगृहात तियात्र सादर झाले. प्रयोग झाल्यास त्याला व घरच्यांना ठार करण्याचे धमकीचे फोन आल्याने तौसिफने तियात्राचा खेळ रद्द केला होता. श्रीराम सेनेनेही तियात्रास विरोध प्रकट केला होता. Read More »

तरच देश जागा होईल : पुरंदरे

देशभक्ती शिकवावी लागत नाही ती जन्मत:च अंगात असते, ९ ऑगस्ट हा क्रांती दिवस देशभक्तीच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा आहे. त्या दिवसाच्या स्मृतींनी मन जागे झाले तर राष्ट्र जागे होईल व आपले बळ वाढेल असे सांगून, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यात ‘चले जाव’ची क्रांती केली. आज दहशतवादी, नक्षलवादी, राष्ट्रद्रोही, भ्रष्टाचारी, अतिरेकी यांच्यासाठी ‘चलेजाव’ची क्रांतिकारी घोषणा करावी लागेल. त्यासाठी आळस ... Read More »

कॉंग्रेसचे पूर्ण उच्चाटन झालेले नाही : शहा

विजयाची भूक कायम ठेवावी व यंदा होणार्‍या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. जम्मू काश्मीर, हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका यंदा होत असून देशातून कॉंग्रेसचे पूर्ण उच्चाटन अजून झालेले नाही, हे लक्षात ठेवावे लागेल, असे ते म्हणाले. Read More »

मोलेचे सातेरी महिला भजनी मंडळ प्रथम

कला अकादमीची राज्यस्तरीय स्पर्धा कला अकादमी आयोजित भजनसम्राट स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय महिला भजनी स्पर्धेत मोले येथील श्री सातेरी महिला भजनी मंडळाने २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस व स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती फिरता चषक पटकाविला. अडकोण – बाणस्तरी येथील युवती भजनी मंडळाला द्वितीय तर चिंबल येथील श्री भगवती महिला भजनी मंडळाला तृतीय बक्षीस प्राप्त झाले. Read More »

मुख्याधिकारी, कारकूनाविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंद

पेडणे पालिकेचे माजी मुख्याधिकारी कमलाकर हळर्णकर व वरिष्ठ लिपीक मदन शेणवी देसाई यांच्याविरुद्ध काल पोलिसांच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने गुन्हा नोंद केला. त्यांना सोमवारी अटक केले जाण्याची शक्यता आहे. Read More »

गोमेकॉच्या खंडित वीज पुरवठ्याला आरोग्यमंत्री जबाबदार : राष्ट्रवादी

गोमेकॉत दोन दिवस वीजपुरवठा खंडित होऊन रुग्णांचे हाल होण्याची जी घटना घडली, त्याला आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेच जबाबदार असल्याचा आरोप काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. Read More »

‘हिरोशिमा नागासाकी’च्या स्मरणार्थ पणजीत निदर्शने

जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉंब हल्ले करण्याची जी घटना घडली त्या घटनेला ६९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल ऑल इंडिया पीस ऍण्ड सॉलिडेअरीटी या संघटनेने येथील फेरीबोट धक्क्याजवळ निदर्शने केली. यावेळी बोलताना ख्रिस्तोफर फोन्सेका व ऍड्. सुहास नाईक म्हणाले की अण्वस्त्रांमुळे संपूर्ण जगाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. Read More »

परदेशात नोकरीच्या आमिषाने गंडवले

परदेशात नोकरी देतो असे सांगून १० लाख २३ हजार रुपयांना गंडवल्याची तक्रार काणका-वेर्ला येथील रॉबर्ट पिंटो यांनी केल्यानंतर म्हापसा पोलिसांनी नवेवाडे वास्को येथील नितीश गणेश कुंभारजुवेकर नाईक (३८) व ठाणे-मुंबई येथील अजय वीरसिंग राठोड याला अटक केली. Read More »

भटक्या गुरांसाठीच्या वाहनाचे उद्घाटन

Read More »

शहिदांच्या वंशजांच्या उपस्थितीने दाटला गहिवर

आज बांबोळीत क्रांतीदिन कृतज्ञता सोहळा क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि भारतीय स्वातंत्र्यसमराच्या धगधगत्या इतिहासात अजरामर झालेल्या अशा अनेक शहीदांच्या वंशजांनी काल पणजीत एका अनौपचारिक कार्यक्रमात आपल्या आजोबा, पणजोबांच्या त्या तेजस्वी क्रांतिकार्याच्या स्मृती जागवल्या, तेव्हा उपस्थितांची मनेही हेलावून गेली. Read More »