बातम्या

स्वातंत्र्यदिनी पेट्रोल दरात कपातीची घोषणा

१५ ऑगस्टपासून पेट्रोल दरात १.८९ ते २.३८ रुपये प्रति लिटर एवढी दरकपात करण्यात येणार असल्याचे तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल सांगितले. जून २०१० मध्ये सरकारने पेट्रोल दरांवरील नियंत्रण काढून टाकल्यानंतर मंत्र्याकडून पेट्रोल दरकपातीची घोषणा केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. Read More »

सरकारी वकील, पोलीस उपनिरीक्षकांच्या लवकरच नियुक्त्या

वेगवेगळ्या न्यायालयीन सरकारी वकील व एपीपीची पदे लवकरच भरण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत लवू मामलेदार यांनी शून्य तासावेळी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर दिले. Read More »

ओपातील यंत्रणा बिघडल्याने तिसवाडी पाणी पुरवठ्यात व्यत्यय

ओपा पाणी प्रक्रिया यंत्रणेत बिघाड झाल्याने काल सकाळपासून पणजीसह तिसवाडी तालुक्याच्या अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्राहकांना त्रास झाला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयावरही त्याचा बराच परिणाम झाला. पाण्याअभावी गोमेकॉतील कारभार ठप्प झाला. Read More »

१९ डिसेंबरपूर्वी मडगावात जिल्हा कृषी कार्यालय

येत्या १९ डिसेंबरपूर्वी मडगाव येथे जिल्हा कृषी कार्यालय व सांगे येथे उप कार्यालय स्थापन करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सुभाष फळदेसाई यांच्या प्रश्‍नावर दिले. सांगे व केपे हे दोन्ही तालुके कृषी उत्पादनात अग्रेसर आहेत. Read More »

कोमुनिदाद, सरकारी जमिनींवरील बेकायदेशीर घरे होणार नियमित

उपमुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्‍वासन कोमुनिदाद तसेच सरकारी जमिनीतील बेकायदेशीर घरे सहा महिने ते वर्षभरात नियमित करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल विधानसभेत दिले. तसेच कोमुनिदादीचा भूखंड खरेदी करण्यासाठी पंधरा वर्षांऐवजी २५ वर्षांच्या वास्तव्याचा दाखला सक्तीचा करण्याचा व दोनापावल येथील आयटी पार्क अन्यत्र हलविण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचेही डिसोझा यांनी आपल्या मागण्यांवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले. कोमुनिदादी किंवा सरकारी जमिनींवर नवी ... Read More »

सचिवालय संकुलात भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी सर्वसामान्यांच्या दारी शिक्षणाची गंगा देण्याचे ऐतिहासिक कार्य केले, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पर्वरीतील सचिवालय संकुलातील स्व. बांदोडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी काढले. स्व. बांदोडकर यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे श्री. पर्रीकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. Read More »

विधानसभा वृत्त

माध्यम प्रश्नाच्या निर्णयावर मी व्यक्तिशः असहमत : मुख्यमंत्री पर्रीकर भाऊसाहेब पुण्यतिथीनिमित्ताने नवी मराठी अकादमी घोषित शैक्षणिक माध्यम प्रश्नी आपल्या सरकारने जो निर्णय घेतला आहे, तो व्यक्तिशः आपल्याला स्वतःला मान्य नाही, मात्र दोन्ही बाजूंचा विचार करून सामोपचाराच्या भावनेतून सदर निर्णय सरकारने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत केले. कोकणीबरोबरच मराठी भाषेचाही आपल्या सरकारला अभिमान असून आजच्या स्व. भाऊसाहेब ... Read More »

गोवा मराठी अकादमीच्या अध्यक्षपदी प्रा. अनिल सामंत

११ सदस्यीय अस्थायी कार्यकारिणी घोषित गोवा सरकारने राज्यातील मराठीप्रेमींच्या दीर्घकालीन मागणीची नोंद घेत ‘गोवा मराठी अकादमी’ ही स्वायत्त संस्था निर्माण करण्यासाठी पावले उचलली असून तिचे एकंदर स्वरूप ठरवण्यासाठी तसेच घटना इ. बनविण्यासाठी प्रा. अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवरांची अकरा सदस्यीय अस्थायी कार्यकारिणी जाहीर केली आहे. येत्या तीन महिन्यांत या संस्थेची उभारणी करण्याचे लक्ष्य या कार्यकारिणीपुढे ठेवण्यात ... Read More »

मुतालिकांच्या नावे फूट पाडण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री

राम सेनेचे नेते प्रमोद मुतालिक हे कर्नाटकातील हुबळीत राहत असताना विनाकारण त्याच्या नावाने गोव्यात आवाज उठवून लोकांमध्ये फूट पाडण्याचा व लोकांना भडकावण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सांगितले. Read More »

शिरसईचे माजी सरपंच कांदोळकर अपघातात ठार

शिरसईचे माजी सरपंच प्रदीप अनंत कांदोळकर (४६, शिरसई बेलविस्ता) यांच्या स्कूटरला काल सकाळी ८ वाजता थिवी येथील मेजर बेकरी जवळ कर्नाटक राज्य परिवाहन महामंडळाच्या बसने धडक दिल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला. Read More »