बातम्या

गोमंतक मराठी अकादमी ताब्यात घेण्याबाबत सहा महिन्यांत निर्णय

नव्या अकादमीत कर्मचार्‍यांना सामावून घेणार पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमीच्या स्थापनेपासून तिला सरकारने किमान सव्वा कोटी रुपयांचे अनुदान दिलेले आहे. त्यामुळे वरील अकादमीची इमारत आणि मालमत्ता ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून कायद्यानुसार येत्या सहा महिन्यांच्या आत निर्णय घेणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत श्री. विष्णू सूर्या वाघ यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिला. Read More »

‘लाडली’साठी वयात सवलतीचा विचार

स्त्री भ्रूण हत्या घटल्याचा दावा ४० वर्षेपर्यंत वयाच्या मुलींना लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेता येतो. लग्न करण्याची इच्छा असलेल्या अशा मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी सहा महिन्यांची सवलत देण्याचा सरकार विचार करीत असल्याचे महिला आणि बाल विकासमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल विधानसभेत आपल्या खात्याच्या मागणीवरील चर्चेस उत्तर देताना सांगितले. Read More »

गोमेकॉतील रुग्णांच्या परवडीचे विधानसभेत पडसाद

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याअभावी रुग्णांचे हाल झाल्याचे तीव्र पडसाद काल विधानसभेत उमटले. इस्पितळात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक दुःखी असतात. अशाप्रसंगी डॉक्टरांनी पेचप्रसंग निर्माण करू नयेत, असे आवाहन आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल डॉक्टरांना केले. Read More »

आयएनएस कोलकोता

Read More »

शैक्षणिक माध्यमविषयक विधेयक सोमवारी विधानसभेत

इंग्रजी शाळांना कोकणी-मराठी शिकवणे सक्तीसाठी कायदा येणार शिक्षण माध्यमासंबंधीचे विधेयक येत्या सोमवारी विधानसभेत मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल शिक्षणावरील मागण्यांवरील चर्चेस उत्तर देताना विधानसभेत सांगितले. अल्पसंख्यांकांच्या इंग्रजी माध्यमातील शाळा वगळल्यास अन्य कुठल्याही इंग्रजी शाळांना सरकारतर्फे अनुदान देण्यात येणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच अल्पसंख्यांकांच्या इंग्रजी माध्यमातील शाळांना द्विभाषिक पाठ्यपुस्तके लागू करण्याची अट असेल असे स्पष्ट करतानाच ... Read More »

विधानसभा वृत्त

सांताक्रुजमधील जलवाहिनींची कामे मार्चपर्यंत पूर्ण : ढवळीकर सांताक्रुज मतदारसंघातील जलवाहिनी संदर्भातील सर्व कामे मार्च २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत बाबूश मोन्सेरात यांच्या प्रश्‍नावर दिले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण व मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन अशा कामांच्या बाबतीत चर्चा केली. त्यांनी ‘प्लॅक्सी’ निधीचा वरील कामासाठीही वापर करण्याची सूचना केली आहे. ... Read More »

स्टॅम्प ड्युटी भरलेल्या खाणींच्या लीज नूतनीकरणास मान्यता द्या

न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश ज्या खाण कंपन्यांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे त्यांच्या लीज नूतनीकरणास मान्यता द्यावी, असे निर्देश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले. वाद नसलेल्या अन्य अर्जांवर तीन महिन्यात निर्णय घेण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. Read More »

न्यायाधीश निवडीची ‘कॉलेजीयम’ पद्धत रद्द करणारे विधेयक लोकसभेत संमत

न्यायाधीश निवडीची सध्याची ‘कॉलेजीयम’ पद्धत रद्द करणारे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग विधेयक काल लोकसभेत संमत करण्यात आले. सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाच्या न्यायाधीशांची निवड आयोगामार्फत करण्यासाठी विधेयकात तरतूद आहे. Read More »

तुम्ही खरोखरच गंगा वाचवू पाहता काय?

सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला खडसावले ‘गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा विषय तुमच्या जाहीरनाम्यावर होता. मग आता त्यावर तुम्ही कोणतीच कृती कशी काय करत नाही? खरोखरच तुम्ही गंगा वाचवू पाहता काय?’ असे सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने काल केंद्र सरकारला या प्रश्‍नावर धारेवर धरले. Read More »

लोकसभा उपसभापतीपदी थंबीदुराई बिनविरोध

अखेर अपेक्षेनुसार लोकसभेच्या उपसभापतीपदी अभाअद्रमुकचे ६७ वर्षीय नेते एम. थंबीदुराई यांची काल बिनविरोध निवड झाली. यामुळे या पदावर दोन वेळा निवडून येणारे ते पहिले नेते ठरले आहेत. या पदासंदर्भात लोकसभेत काल गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ठराव मांडला व त्याला विदेश व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी अनुमोदन दिले. आवाजी मतदानाने त्यांची ही निवड झाली. सर्व सदस्यांनी बाके वाजवून त्यांच्या निवडीचे स्वागत केले. Read More »