ब्रेकिंग न्यूज़

बातम्या

केटीएमचा गोव्यात दिमाखदार स्टंट शो

पणजी युरोपातील एक प्रमुख रेसिंग लेजंड असलेल्या केटीएमद्वारे गोव्यामध्ये थरारक केटीएम स्टंट शो सादर करण्यात आला. व्यावसायिक स्टंट रायडरचे कौशल्य आणि थरारक स्टंट राइडचा गोमंतकीयांना अनुभव देण्याच्या उद्देशाने या स्टंट शोचे आयोजन करण्यात आले होते. पणजीतील मिरामार रोडवरील युथ होस्टेलच्या बास्केटबॉल कोर्टवर हा स्टंट शो पार पडला. यावेळी व्यावसायिक स्टंट टीमद्वारे श्वास रोखायला लावणारे काही स्टंट केटीएम ड्युक बाइकवर सादर ... Read More »

गवाणेतील हरिजन कुटुंबे न्यायाच्या प्रतिक्षेत

वाळपई (न. प्र.) सत्तरी तालुक्यातील खोतोडे पंचायत क्षेत्रामध्ये अठ्ठेचाळीस वर्षांपासून अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या हरिजन बांधवांच्या १४ कुटुंबांना न्यायाची प्रतिक्षा आहे. यासंदर्भात उत्तर गोवा जिल्हाधिकारी लेविन्स मार्टीन यांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरत या प्रकरणी दहा दिवसांत अहवाल मागवला आहे. गोवा मुक्त होऊन ४८ वर्षे झाली तरीही अजूनपर्यंत या कुटुंबांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, अशा प्रकारच्या मुलभूत समस्या असतानाही सरकारची ... Read More »

पक्षबदलूंना मांद्रेत थारा नाही

हरमल (न. वा.) स्वतःच्या स्वार्थासाठी कॉंग्रेस पक्ष व मांद्रे मतदारसंघातील १६ हजार मतदारांचा विश्वासघात करणार्‍या पक्षबदलूंना पुन्हा मांद्रेत थारा नसेल. दयानंद सोपटे यांनी आपला गुणधर्म जनतेला दाखवून दिला आहे. येणार्‍या पोटनिवडणुकीत येथील स्वाभिमानी मतदार त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिल्यशिवाय राहणार नाही, असे संतापजनक उद्गार मांद्रे मतदारसंघाचे माजी गट कॉंग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर यांनी हरमल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काढले. ... Read More »

कोलवाळमध्ये महिलांची पाण्यासाठी वणवण

म्हापसा (न. प्र.) रामनगर-कोलवाळ येथील रहिवाशांना गेल्या एक वर्षापासून सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जात नसल्याने गेल्या ८ नोव्हेंबर २०१७ रोजी म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता. यावेळी तेथील अभियंते सुभाष बेळगांवकर यांनी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आश्‍वासन आज एक वर्ष झाले तरी अद्यापही पूर्ण झालेले नाही. तसेच या मतदारसंघातील आजी माजी आमदारांनीही आजपर्यंत लक्ष दिले नसल्याने येथील महिला ... Read More »

भाजपचे नाराज नेते, कार्यकर्त्यांना गोसुमंचे दरवाजे खुले : वेलिंगकर

भाजपमधील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना गोवा सुरक्षा मंचाचे दरवाजे खुले आहेत. गोसुमंमध्ये प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारचे बंधन नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा संघचालक तथा गोवा सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर यांनी काल व्यक्त केले. कॉंग्रेसच्या दोन आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व इतरांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली ... Read More »

सभापतींना तातडीने दिल्लीत बोलाविले

सभापती डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय नेतृत्वाने डॉ. सावंत यांना दिल्लीत पाचारण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नेतेपदासाठी चर्चेत असलेल्या संभाव्य नावांमध्ये डॉ. सावंत यांच्या नावाचा समावेश आहे. डॉ. सावंत केंद्रातील भाजप नेत्यांबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत माहितीसाठी डॉ. सावंत यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ ... Read More »

पार्सेेकरांचा निर्णय आज शक्य

पेडणे (न. प्र.) मांद्रेचे माजी कॉंग्रेस आमदार दयानंद सोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे दुखावलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आज होणार्‍या भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपली भूमिका जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मांद्रे मतदारसंघ तसेच राज्यभरातील तमाम भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या या बैठकीकडे नजरा लागून आहेत. आजच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री पार्सेकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत ... Read More »

नेतृत्वबदल ः भाजपचे केंद्रीय नेते गंभीर

पणजी (प्रतिनिधी) मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे भाजप केंद्रीय नेतृत्व राज्यातील नेतृत्वबदल करून स्थिर प्रशासन देण्यावर गंभीरपणे विचार करीत आहे, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी नवी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर जारी केलेल्या संदेशातून काल दिली आहे. मात्र, मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे चर्चेवेळी अमित ... Read More »

कदंबला सातवा वेतन आयोग लागू करण्यास सरकारने सहकार्य करावे

पणजी (प्रतिनिधी) सरकारने कदंब महामंडळाच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तसेच मडगाव, म्हापसा, वास्को येथील बसस्थानकांची कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार कार्लुस आल्मेदा यांनी कदंबाच्या ३८ व्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना येथे काल केले. या कार्यक्रमाला वाहतूक सचिव एस. पी. सिंग (आयएएस), महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक परेरा नेटो, संचालक मंडळाचे सदस्य व अधिकारी ... Read More »

जिल्हा मिनरल फंड वापरण्यास कोर्टाची बंदी

पणजी (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दोन्ही जिल्हा मिनरल फंडाच्या संचालकांना आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी पुढील आदेशापर्यंत संबंधित जिल्हा मिनरल फंडाचा ताबा घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा मिनरल फंडाच्या माध्यमातून सुमारे १८० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हा मिनरल फंडाला कायदेशीर वैधता नसल्याचे न्यायालयाला आढळून ... Read More »