बातम्या

गोवा फॉरवर्ड विस्ताराच्या तयारीत

गोवा फॉरवर्डच्या कार्याचा विस्तार विरोधी पक्षाच्या मतदारसंघात करण्यात येणार आहे. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघांतील बर्‍याच पंचायतींचे सरपंच, पंच सदस्य, काही नगरपालिकांतील नगरसेवक गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. आज एका पंचायतीचे सरपंच आणि पंच सदस्य पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सहभागी मंत्री, आमदारांच्या मतदारसंघात पक्षाचा ... Read More »

दैनिक नवप्रभा मोबाईल ऍपचे मुख्यमंत्र्यांहस्ते अनावरण

दैनिक नवप्रभाने आपले मोबाईल ऍप विकसित केले असून त्याचे अनावरण गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, नवहिंद पेपर्स अँड पब्लिशर्सचे सरव्यवस्थापक प्रमोद रेवणकर व माहिती तंत्रज्ञान उपव्यवस्थापक विजयानंद नाईक उपस्थित होते. यावेळी श्री. नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना नवप्रभा मोबाईल ऍपच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. नवप्रभेच्या या मोबाईल ऍपद्वारे मुख्यतः गोव्याबाहेरील व ... Read More »

आरटीओ कार्यालयातील ‘त्या’ कागदपत्रांची विल्हेवाट

>> सर्व दस्तावेज सुरक्षित : स्पष्टीकरण ओल्ड गोवा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बेवारस स्थितीत टाकण्यात आलेल्या पणजी वाहतूक कार्यालयातील कागदपत्रांची अखेर काल विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, वाहतूक कार्यालयातील सर्व दस्तावेज संगणकीकरणामुळे सुरक्षित असून जनतेने घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्टीकरण खात्याने केले आहे. ओल्ड गोवा येथे राष्ट्रीय महामार्गालगत पणजी वाहतूक कार्यालयातील जळलेली कागदपत्रे टाकण्यात आली होती. कदंब बसस्थानकावरील २ ऑक्टोबर रोजीच्या आग ... Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाही सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. काश्मिरातील गुरेज खोर्‍यात जवानांची भेट घेऊन मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड करताना पंतप्रधान. Read More »

भारताचा मलेशियावर विशाल विजय

>> अंतिम फेरीतील प्रवेशासाठी पाकिस्तानविरुद्ध बरोबरी पुरेशी भारताने व्यावसायिकतेचे दर्शन घडवत काल गुरुवारी झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतील ‘सुपर फोर’ फेरीतील लढतीत मलेशियाचा ६-२ असा फडशा पाडला. यासह भारताने दिवाळी साजरी करतानाच प्रतिस्पर्धी संघाचे दिवाळं काढले. सामन्याची पहिली तीन सत्रे भारताने गाजवली तर शेवटच्या सत्रात मलेशियाने आपले गोल नोंदविले. भारताने अल्प अंतराच्या पासेसवर जास्त भर देताना मलेशियाच्या बचावफळीला वेळोवेळी खिंडार ... Read More »

धेंपोचे गोवन एफसीवर चार गोल

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने गोवन फुटबॉल क्लबवर ४-० अशी मात करीत धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत देखण्या विजयसह पूर्ण गुणांची कमाई केली. या विजयामुळे धेंपोचे दोन सामन्यांतून ६ गुण झाले असून ते गुणतक्त्यात अग्रस्थानावर पोहोचले आहेत. गोवन फुटबॉल क्लब १ गुण मिळवून आठव्या स्थानी आहे. धेंपोने या सामन्यावर बव्हंशी वर्चस्व राखले होते. पहिल्या सत्रात लतेश मांद्रेकरने नोंदविलेल्या दोन ... Read More »

लक्ष्य सेन पुढील फेरीत

ज्युनियर क्रमवारीत द्वितीय स्थानावर असलेल्य लक्ष्य सेन याने बीडब्ल्यूएफ जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. दुसर्‍या मानांकित लक्ष्य याने इंडोनेशियाच्या मोहम्मद रेहान दियाझ याचा ३६ मिनिटांत २१-१२, २१-१२ असा पराभव केला. भारताच्या इतर खेळाडूंचे आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपले. मुलांच्या एकेरीत १३वा मानांकित कार्तिकेय कुलशन कुमार, महिला एकेरीत गायत्री गोपीचंद व मुलांच्या दुहेरीत तिसर्‍या मानांकित कृष्ण प्रसाग गारगा ... Read More »

धारगळचा आयुर्वेदिक प्रकल्प अडचणीत

>> भूखंडात तांत्रिक अडचणी >> आज महत्त्वपूर्ण बैठक पेडणे तालुक्यातील धारगळ येथे राष्ट्रीय आयुर्वेदिक प्रकल्प उभारण्यासाठी देण्यात आलेल्या जमिनीत तांत्रिक अडचणी असल्याने राज्य सरकारला नवीन भूखंड उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. या भूखंडाच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी आज गुरूवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल दिली. आयुष मंत्रालयातर्फे राज्यात आयुर्वेदिक संशोधन प्रकल्प ... Read More »

अयोध्येत योगी सरकारने शरयू नदीच्या ३ किलोमीटर परिसरात शहराची लोकसंख्या आहे तेवढेच १ लाख ७१ हजार दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली. राम घाट पार्क ते शरयूपर्यंतच्या सर्वच घाटांवर लख्ख – लख्ख रोषणाई केली होती. Read More »

गोयच्या सायबाचे फेस्त यंदा ४ डिसेंबर रोजी

ओल्ड गोवा येथील प्रसिद्ध ‘गोंयच्या सायबाचे फेस्त’ यंदा ४ डिसेंबर रोजी साजरे करण्यात येणार आहे. दरवर्षी हे फेस्त ३ डिसेंबरला साजरे होते. मात्र, यंदा ३ डिसेंबर रविवार असल्याने फेस्त दुसर्‍या दिवशी ४ डिसेंबरला साजरे करण्यात येणार असल्याचे फा. आल्फ्रेड वाझ यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारचा दिवस लॉर्ड जेजुच्या सेवेसाठी समर्पित असतो. त्यामुळे रविवारच्या दिवशी फेस्त साजरे करण्यात येत नसल्याचे ... Read More »