आयुष

‘किशोरवयीन मुलांचं पालकत्व’ : एक कठीण काम!!

– डॉ. सुषमा किर्तनी (भाग – १) किशोरावस्था ही बालकापासून तरुणापर्यंतचा प्रवास आहे आणि त्यामुळे त्यांचं पालकत्व हे सुद्धा बालवयापासून तारुण्यापर्यंत मार्गदर्शन करण्याचा एक प्रवासच आहे. पालकांना त्यांच्या मुलांमध्ये उत्तम गुणांची पेरणी करावी लागते, तसेच त्या मुलांना स्वावलंबी व एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी मदत करावीच लागते. आणि म्हणूनच पालकत्व हे मध्यम वयातील एक आव्हानात्मक आणि महत्त्वाचे विकासात्मक कार्य आहे. Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २५५) (स्वाध्याय -२३) आज विश्‍वात ज्ञानाचा फार मोठा स्फोट झाला आहे आणि तो चालूच राहणार. प्रत्येक सूज्ञ व्यक्तीला ज्ञानाची फारच आवश्यकता आहे- त्याच्या व्यवसायामध्ये, त्याच्या दैनंदिन व्यवहारात आणि विचार तरी किती?… अनेक. ज्ञान मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, तर्‍हा असतात पण मुख्यत्वे – पठण(वाचणे) व श्रवण(ऐकणे) दोन्हीची आवश्यकता आहे. तसेच या दोन्ही पद्धती चांगल्या. पण फक्त ... Read More »

समुपदेशन गीतेतून – अज्ञानजं तमः नाशयामि ज्ञानदीपेन भास्वता …

– प्रा. रमेश सप्रे गीतेतील समुपदेशनाचा भर आतून मिळणार्‍या सामर्थ्यावर, प्रेरणेवर आहे. कुठल्याही विशिष्ट वारी, विशिष्ट देवदेवतेची, विशिष्ट पद्धतीनं उपासना करा असं गीता म्हणजेच भगवंत एकदाही सुचवत नाहीत. गीतेत अर्जुन जरी ‘शिष्य’ भावानं श्रीकृष्णाला शरण गेला तरी ‘गुरू’ म्हणून कृष्णानं शिकवण दिलेली नाही किंवा उपदेशही केला नाही. ‘भगवान् उवाच’ म्हणून गीता सांगताना एका अतिशय उच्च अवस्थेतून भगवंताची वाणी वाहत राहते. ... Read More »

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – पोटातील जंतू

– डॉ. राजेंद्र साखरदांडे पोटात जंतू असतात का? खरे म्हणजे आपण आज प्रामुख्याने पोटातील किड्यांविषयी बोलणार आहोत. प्रत्येकाला त्याच्याविषयी माहिती आहे. माझ्या पोटात दुखतेय, मला दंत(जंत) झाले असणार! पूर्वीपासून याविषयी चांगलेच गैरसमज आहेत. साखर खाण्याने किंवा जास्त गोड खाल्ल्यावर जंताचा त्रास होतो. जंत पोटात असणे हे बरोबर – त्याने जेवण पचायला मदत होते. जंतावर औषध घेणे जरुरी आहे, पण थोडेतरी ... Read More »

योगमार्ग – राजयोग 

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २५४) (स्वाध्याय – २२) विश्‍वांतील सर्व जाणकार सांगतात की सर्व जीवांत प्राण असतो. कृमी-कीटक, पशू-पक्षी, मानव, वृक्ष-वनस्पती… पण वृक्षवनस्पती सोडल्या तर इतरांत आत्मा असतो. भारतीय तत्त्ववेत्ते या विषयावर विवरण देताना म्हणतात, ‘हा आत्मा त्या परमात्म्याचा अंश आहे. तो चौर्‍यांशी लक्ष योनीत जन्म घेऊन शेवटी अत्यंत उच्च व श्रेष्ठ अशा मनुष्य योनीत जन्म घेतो. प्रत्येक ... Read More »

॥ समुपदेशन गीतेतून ॥ – मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् …

– प्रा. रमेश सप्रे वासुदेव म्हणजे सगळीकडे वसून राहिलेला देव. जसा अणुअणूतला विष्णू नि कणाकणातला भगवान. सदासर्वदासर्वत्र अशा वासुदेवाचं ज्याला दर्शन होतं, देवत्वाचा अनुभव येतो नि त्याप्रमाणे त्याचं जीवन घडतं तो महात्मा. अशी साधुसंतसत्पुरुषमहात्मे यांची सहजसुंदर कल्पना भगवंतानं अर्जुनासमोर मांडली. यातूनच अर्जुनाची जिज्ञासा जागी झाली व त्यानं भगवंताचं दर्शन जास्त स्पष्ट व प्रभावी कुठे कुठे किंवा कशाकशात होईल असा प्रश्‍न ... Read More »

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – बाळाची काळजी

– डॉ. राजेंद्र साखरदांडे (भाग-२) ‘‘बाळाच्या काळजीचे पाल्हाळ एवढे लांबलेय’’, खरेच तुम्हास तसे वाटतेय! बाळाची लहानपणीच अत्यंत काळजी घेणे जरुरीचे असते. आता यावर एक उदाहरणच समोर ठेवतो. ‘‘परवा एक जोडपे आपल्या पहिल्या-वहिल्या वीस दिवसांच्या तान्ह्या सोनुल्याला माझ्याकडे घेऊन आले- सोनुल्याच्या कानातून पू वाहत होता. भलतीच थंडी भरली होती त्याला. सोनुला कुठे बाहेर फिरायला गेला होता का? नाही नां, मग त्याला ... Read More »

किशोरवयिनांची वाढ व विकास

– डॉ. सुषमा कीर्तनी (भाग – २) किशोरवय हे आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीतील वर्तणूकीच्या माध्यमातून आपले शरीर निरोगी आणि सशक्त बनविण्याची एक खिडकी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही व ज्यामुळे प्रौढ वयात चुकीचा आहार घेतल्यामुळे होणारे आजार टळू किंवा लांबू शकतील! दुसरा राष्ट्रीय संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की १५ ते १९ वयाच्या मुलींमध्ये १४.७% मुली या १४५ सेमी.पेक्षा कमी ... Read More »

योगमार्ग : राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २५३) (स्वाध्याय – २१) संत कबीर म्हणतात- ‘‘रसरी आवत जातते, सिलपर पडत निसान, करत करत अभ्यास के, जडमति होत सुजान’’ या महान महापुरुषाच्या दोनच पक्तींमध्ये महान तत्त्वज्ञान दिसते. प्रत्येक शब्द इथे फारच अर्थपूर्ण आहे. म्हणूनच फक्त या दोन ओळी वाचून-ऐकून भागत नाही. तर त्यांचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. पूर्वीच्या काळात भारतातील प्रत्येक गावांत-शहरात ... Read More »

समुपदेशन गीतेतून – मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू…

– प्रा. रमेश सप्रे लो. टिळकांनी गीतेचा सखोल अभ्यास करून त्यांच्या दृष्टीनं ‘गीतारहस्य’ कोणतं हे एका अमर ग्रंथात सांगितलं. त्यांच्या मते ‘कर्मयोग’ हे गीतेचं रहस्य म्हणजे महत्त्वाचं सूत्र, सार किंवा संदेश आहे. महात्मा गांधीजींनी कर्मयोगाला अनासक्तीची जोड दिली. नाहीतर खूप कर्म, कार्य करणारा कर्मवीर हा कर्मयोगी ठरला असता. कर्मयोगाचं रहस्य कर्म करण्यात नसून आसक्तिविरहित, कामनारहित (अशा अनासक्त, निष्काम) वृत्तीत आहे. ... Read More »