ब्रेकिंग न्यूज़

आयुष

मांसाहार आणि आयुर्वेद

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) गरम हवामानात खूप वेळ मांस तसेच राहिले तर ते कुजू लागते व अशा मांसाशनापासून उलटी, अतिसार, प्रवाहिका, शीतपित्त, ज्वर व्याधी होण्याची शक्यता असते. डुक्कर, बैल यांच्या शरीरात टीनिया या जातीचा कृमी किंवा सिस्ट असू शकतात. असे मांस नीट न शिजवता खाल्ल्यास मनुष्याला कृमीरोग उत्पन्न होऊ शकतो. आहारपद्धतीमध्ये मांसाहार व शाकाहार असे प्रमुख दोन वर्ग आहेत. ... Read More »

गर्भाशय मुखाचा कर्करोग भाग – २

 डॉ. स्वाती अणवेकर कुक्षीमध्ये अथवा ओटीपोटात वेदना होत असल्यास प्राथमिक गाठ ही कटीविवराच्या भिंतींना लागून आहे असे जाणावे. या सर्वांपेक्षा महत्त्वाचे लक्षण म्हणजे डॉक्टरांना गर्भाशयमुखाजवळ गाठ प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणे होय. या कर्करोगाचे दोन प्रकार प्रामुख्याने आढळतात. १) क्वामोस सेल कॅन्सर – हा ८५ ते ९० % रुग्णांमध्ये आढळतो. २) एडिनोकार्सिनोमा – उर्वरित १० ते १५ % कर्करोग हे या प्रकारचे ... Read More »

‘गर्भाशय-मुखा’चा कर्करोग

 डॉ. स्वाती हे. अणवेकर हा कर्करोग ‘गर्भाशय-मुखा’चा असून ह्याला इंग्रजीमध्ये ‘सर्व्हायकल कॅन्सर’ म्हणतात. ह्याचा प्रसार योनीच्या वरच्या भागापर्यंत असतो. सर्व कर्करोगांमध्ये हा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात अधिक आढळणारा कर्करोग आहे. हा झाल्यावर बरेचदा अगदी भयंकर स्वरूप धारण करू शकतो कारण बर्‍याच स्त्रियांमध्ये एचपीव्ही ह्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येते. जगभरामध्ये जवळजवळ ५००,००० स्त्रियांना दरवर्षी ‘गर्भाशय-मुखा’चा कर्करोग होतो व त्यातील अंदाजे २४०,००० ... Read More »

टाइप वन मधुमेह आणि उपचारपध्दती

 डॉ. प्रदीप महाजन पेशींवर आधारित उपचारपद्धती मधुमेहाच्या मूळ कारणावर उपचार करते, म्हणजेच, बिटा पेशींचा नाश आणि इन्सुलिन तयार होण्यास प्रतिरोध या कारणांवर उपचार करते. म्हणूनच हळुहळू पण कायमस्वरूपी असे परिणाम मिळतात. टाइप वन मधुमेह हा तरुणांमध्ये सर्वाधिक आढळणार्‍या विकारांमधील एक आहे. भारतातील ९७,००० मुलांना टाइप वन मधुमेह आहे. संपूर्ण लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण केवळ ५-१० टक्के असले, तरी या ... Read More »

शेवगा ः एक बहुपयोगी वृक्ष (मॉरिंगा ऑलिफेरा)

– वर्षा नाईक आपण आपल्या अंगणात शेवग्याचे झाड लावून त्यातील पौष्टीक घटकांचा लाभ घेऊ शकतो. हे आकर्षक पदार्थ, ताज्या स्वरूपात तसेच पानांच्या किंवा शेंगांच्या रुपात कोणत्याही वयाच्या व्यक्तीने आणि कोणत्याही ऋतुमध्ये नियमितपणे सेवन करण्याची गरज आहे. मॉरिंगा ऑलिफेरा म्हणजेच शेवगा किंवा सहजन (हिंदी) वृक्षाला आज वाढती लोकप्रियता मिळते आहे ज्यामुळे तिला ‘वृक्षांची राणी’ म्हणता येईल. गोवेकर याला राणी – म्हाशिंग म्हणतात ... Read More »

आहारातील त्रिदोष-त्रिगुण विचार

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) आहार सेवन करताना फक्त प्रोटीन्स, फॅट्‌स, कॅलरीज, व्हिटामिन्स यांचाच विचार न करता आयुर्वेदाने सांगितलेल्या व्यापक दृष्टी ध्यानात ठेवून आहाराची निवड केल्यास हा आहार स्वास्थ्यरक्षणार्थ उपयोगी येईल. आहारामध्ये त्रिदोषांचा, त्रिगुणांचा, लोकपुरुष सिद्धांताचाही विचार व्हायला पाहिजे. उत्तम आहार तोच ज्याने मनुष्य स्वस्थ राहील. शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य म्हणजेच खर्‍या अर्थाने पूर्ण आरोग्य. उत्तम पोषण होण्यासाठी योग्य गुणकर्माचे ... Read More »

विषम भोजन- रोगांना निमंत्रण

– डॉ. मनाली पवार आहारापासूनच मनुष्याचे शरीर तयार होते. माणे रोगही मुळेच उत्पन्न होतात व म्हणून आहार अत्यंत काळजीपूर्वक सेवन करावा. प्राणधारण करणार्‍या प्रत्येक प्राणिमात्रांना आहार हा प्राणमय आहे. आहारावरच वर्ण, प्रसन्नता, जीवन, प्रतीक्षा, शरीर पुष्टी, उत्तम स्वर, सुख, संतोष, बल, मेधा अवलंबून असतात. शरीरामध्ये स्वास्थ्य टिकून राहील व पुढे उत्पन्न होणार्‍या रोगांचाही परिहार होईल अशा प्रकारचाच आहार सेवन करावा. ... Read More »

गंडमाळा

 वैदू भरत म. नाईक, कोलगाव गंडमाळाचे गांभीर्य लोक लक्षात घेत नाहीत. विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी झोपडपट्टीत कामगार वनस्पती याचे प्रमाण वाढत आहे. गंडमाळा म्हणजे क्षयच होय. त्यामुळे लहान मुलामुलींची वाढ होणे थांबते. मोठ्या वयाच्या बायका झिजून झिजून भोगत राहतात. स्ट्रॉंग औषधे, इंजेक्शन यांचे चक्र मुंबई सारख्या शहरात संपतच नाही. आयुर्वेदात अमरकंद, कांचन साल, चुन्याची निवळी वापरून ते लक्ष्मी विलास, सुवर्णमालिनी, ... Read More »

उन्हाळ्यातील आहार-विहार

– डॉ. मनाली महेश पवार (गणेशपुरी, म्हापसा-गोवा) सर्वत्र वातावरणात उष्मा वाढलेला आहे. अंगाची नुसती लाही लाही होत आहे. खावसं काहीच वाटत नाही, पण थंडगार प्यावसं मात्र वाटतं. घरातील फ्रीज थंड पाण्याच्या बाटल्यांनी, सॉफ्ट ड्रींक्स, रसना सारखे ड्रींक्स, फ्लॅवरल्ड – ज्यूस सारख्या बाटल्यांनी तुडुंब भरलेले आहे. बाहेर गेलात तरी थंडपेय, घरात ए. सी., गाडीत ए. सी., ऑफिसात ए. सी. तरीही उष्णतेचा ... Read More »

स्तनाचा कर्करोग – भाग १

वैद्य सौ. स्वाती अणवेकर सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा हा स्तनाचा कर्करोग पुष्कळ बायकांमध्ये अकाली व वाढत्या मृत्यूचे कारण बनला आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये असे आढळले की भारतामध्ये २८ स्त्रियांपैकी १ स्त्री ही स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. शहरांमध्ये तर हे प्रमाण २२ स्त्रियांमध्ये १ स्त्री असे आहे. तर गावात हेच प्रमाण ६० स्त्रियांमध्ये १ स्त्री असे आहे. भारतात साधारणपणे ४३-४६ ह्या ... Read More »