आयुष

प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर – बाळंतपणानंतर बाळाची काळजी…

– डॉ. राजेंद्र साखरदांडे तुम्ही आई झालात! तुम्ही स्वतःची काळजीही घेऊ लागलात. आता नवजात शिशूचे लालन-पालन तुम्ही करणार आहात. तेव्हा तुम्ही काय कराल? खरे म्हणजे आपले मूल सुदृढ व्हावे याची काळजी मातेने गर्भारपणातच घ्यायला हवी. गरोदरपणात घेतलेल्या जेवणावर मूल पोसले जाते. गरोदरपणात काय खावे यावर आम्ही बोललोय. तरीही परत सांगावयास आणि तुम्हाला परत ऐकावयास हवे. कारण हे फार महत्त्वाचे असते. ... Read More »

किशोरवयीन मुला-मुलींची वाढ व विकास…

– डॉ. सुषमा कीर्तनी, नवजात, बालक व किशोर तज्ज्ञ, मळा, पणजी टीन एजर्स किंवा किशोरवयीन ही संज्ञा १० ते १९ वर्षांपर्यंतच्या वयातील मुला-मुलींसाठी वापरली जाते. ग्रीक शब्द ‘ऍडोलेसियर’ या शब्दापासून हा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे वाढ होणे किंवा विकास होणे. यामध्ये मुलामुलींच्या शरीराच्या आकारात, शरीर रचनेत तसेच मानसिक आणि सामाजिक क्रियांत गतीने बदल होत असतात. Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २५२) (स्वाध्याय – २०) भगवंताने निर्माण केलेल्या विश्‍वात अनेक तर्‍हेचे कृमी-कीटक, पशू-पक्षी, प्राणी-जनावरे… आहेत. त्यातलाच एक प्राणी- मानव. पण मानव आणि इतरांत फरक हा की मानवाला देवाने बुद्धीचे वरदान दिलेले आहे. हेतू हा की त्याने विचार करावा, चिंतन करावे. सृष्टीचे, जीवनाचे, सृष्टिकर्त्याचे गुह्य शोधावे. त्याने सज्जन, सुसंस्कृत असावे. त्याने आपली हुशारी स्वतःच्या व इतरांच्या ... Read More »

समुपदेशन गीतेतून : … तत् कुरूष्व मदर्पणम्

– प्रा. रमेश सप्रे आपलं जीवन बनतं आपण करतो त्या सार्‍या क्रिया आणि उपयोगात आणतो त्या सर्व वस्तू किंवा व्यक्तींनी! सार्‍या क्रियातली अगदी मुळातली (मूलभूत) क्रिया म्हणजे श्‍वसन – श्‍वासोच्छ्‌वास करणं. अन् सार्‍या वस्तूंतली अगदी आपली सहज मिळालेली वस्तू म्हणजे आपला देह. सारी इंद्रियं नि त्यांची कार्यं. हे सारं भगवंताला अर्पण करणं हे जीवनातील आनंदाचं रहस्य आहे. हीच जीवनमुक्तीसाठी आवश्यक ... Read More »

प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर – बाळंतपणानंतर आईची काळजी…

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी आता आपण माता झालात! खरेच हे तुम्हा बायकांचे.. स्त्रियांचे भाग्य आहे की तुम्हीच माता- आई होऊ शकता… व ते भाग्य पुरुषांना लाभत नाही! आता तुम्ही एका अपत्याला जन्म दिलाय.. तेव्हा स्वतःबरोबर तुमच्या तान्हुल्या बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे. पहिल्यांदा हे बघायला हवे की झालेले अपत्य हे मुलगा आहे की मुलगी? भारतात लिंग निदान करणे हा गुन्हा ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २५१) (स्वाध्याय – १९) चहूकडे नजर फिरवली की लगेच लक्षात येते की विश्‍वाची परिस्थिती महाभयंकर आहे. मानवा-मानवांमध्ये विविध तर्‍हेचे भेदाभेद आहेत म्हणून तंटे-लढाया चालू आहेत. त्याला जोडून नैसर्गिक आपत्ती वाढतातच आहेत. त्याशिवाय सामाजिक समस्या तर आहेतच. माणूस हा माणसापासून, निसर्गापासून, भगवंतापासून दूर चालला आहे. म्हणूनच स्वाध्यायाची नितांत आवश्यकता आहे.  Read More »

समुपदेशन गीतेतून – पत्रं पुष्पं फलं तोयम् …

– प्रा. रमेश सप्रे आपण करतो ते सर्व भगवंताला अर्पण – समर्पण करणं हे गीतेत ‘राजगुह्य’ सांगितलंय. म्हणजे भगवंत प्राप्तीचं सर्वात श्रेष्ठ रहस्य (तत्त्व) सांगितलंय. त्याचबरोबर हे अर्पण कसं करायचं ती कलाही सांगितलीय. तिला ‘राजविद्या’ असं म्हटलंय. म्हणजे सर्व कलांचा, विद्यांचा राजा किंवा राणी! वरवर हे फार सोपं वाटतं. तसं ते आहे ही. कृती करणं सोपं आहे पण मनात जर ... Read More »

प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर : गरोदरपणा

– डॉ. राजेंद्र साखरदांडे (भाग – ३) गरोदरपणाची मानसिक तयारी झाली म्हणायची! बरे झाले. नाहीतर तयारी होता होता वयाची पस्तिशी जवळ यायची व कधी निघून जायची ते पण समजणार नाही व मग मूल व्हावे अशी इच्छा असेल तरीदेखील मग मूल होेणे नाही. तेव्हा करिअर सांभाळता सांभाळता… आपल्या कुटुंबाचा… मुलांचा विचार करावा. नाहीतर वाढत्या वयात झालेले मूल स्वतः आपण रिटायर होऊ ... Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २५०) (स्वाध्याय – १८) – डॉ. सीताकांत घाणेकर ‘स्वाध्याय = स्व + अध्याय’. स्वतःबद्दलचा अभ्यास. पतंजलीच्या अष्टांगयोगातील एक नियम. पण या एकाच शब्दाचा अर्थ एवढा खोल व व्याप्ती एवढी प्रचंड की जन्मोजन्मी अभ्यास करूनही न संपणारा विषय. मानवाचा संपूर्ण जीवनविकास साधण्याचा एक उत्तम मार्ग. कदाचित म्हणूनच वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत पू. पांडुरंगशास्त्री आठवले या महापुरुषाने आपल्या कार्यात स्वाध्यायाचे ... Read More »

समुपदेशन गीतेतून : क्षिप्रं भवति धर्मात्मा…

– प्रा. रमेश सप्रे भगवंतांनी गीतेत अनेक ठिकाणी अर्जुनाला (म्हणजेच आपल्याला) काही आश्‍वासनं, काही आज्ञा दिल्या आहेत. पण क्वचित् भगवंत आपली प्रतिज्ञाही व्यक्त करतो व नीट विचार करून त्या प्रतिज्ञेवर विश्‍वास ठेवून त्यासंबंधी सांगितलेली गोष्ट करायला सांगतात. नववा अध्याय हा गीतेचा मध्यवर्ती अध्याय आहे. त्यातली भगवंताची भाषाशैली व समुपदेशन पद्धती पाहून ज्ञानोबा ‘श्रीकृष्णाचे नवमीचे बोलणे..’ असे उद्गार काढतात. भगवंतांच्या मुखातून ... Read More »