आयुष

आचार्योपासनम् …

– प्रा. रमेश सप्रे ज्ञानेश्‍वरांनी आपल्या गीतेवरील ‘भावार्थदीपिकेत’ (ज्ञानेश्‍वरीत) सर्वांत जास्त ओव्या ज्या एका शब्दावर केल्यायत तो शब्द- ‘आर्योपासनम्’॥ याला तसंच कारण आहे. निवृत्तिनाथ हे ज्ञानदेवांचे आध्यात्मिक गुरू या नात्यानं आचार्य अन् त्यांचं आचरण ज्ञानोबादी भावंडांना व इतर संतमंडळींनाही आदर्श वाटायचं म्हणूनही ते आचार्य! आपल्या मोठ्या भावाबद्दल या दोन्ही नात्यांमुळे ज्ञानेश्‍वरांच्या मनात अपार प्रेम व आदर. अनेक अध्यायांचा आरंभ करताना ... Read More »

जागतिक मूत्रपिंड दिवस

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी जागतिक मूत्रपिंड (रिनल) दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारी जगभर साजरा केला जातो. २००६ पासून हा दिवस साजरा करायचे ठरवले गेले. या दिवशी जगभर मूत्रपिंडाचे महत्त्व, त्यांचा आपल्या आरोग्याशी संबंध व मूत्रपिंडाच्या आरोग्यासंबंधी माहिती दिली जाते. पूर्वी जगभर संसर्गजन्य रोगांचे वर्चस्व होते व त्या रोगांनी मरणार्‍यांचे प्रमाणही जास्त होते. आज ते प्रमाण कमी झालेले आहे ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २७३) (स्वाध्याय – २१ ) स्वाध्याय हा शब्द आपण बर्‍याच वेळा ऐकतो. त्याचा अर्थसुद्धा आम्हाला समजतो- ‘स्व’चा अभ्यास. कधी असे वाटते की स्वतःचा आणखी अभ्यास काय करायचा? ‘मी’ कोण आहे… हे मला माहीत आहे आणि इतरांनादेखील माहीत आहे. पण ही माहिती वरवरची झाली. म्हणजे फक्त या दृश्य शरीराची माहिती झाली. पू. आठवलेजी सांगतात- ‘‘स्वाध्याय’’ म्हणजे ... Read More »

अमानित्वं अदंभित्वं अहिंसा क्षान्तिः आर्जवम्…

– प्रा. रमेश सप्रे ‘ज्ञान समाज’ (नॉलेज सोसायटी) असं आजच्या जनजीवनाला उद्देशून म्हटलं जातं. याचा अर्थ ज्ञानाचा पाया असलेला समाज म्हणजे सामाजिक संस्था-संबंध-जीवनशैली अशा सर्वांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाया ज्ञान हाच असतो. समाज हा अखेर माणसांचाच बनलेला असतो. ‘ज्ञानसमाजा’साठी व्यक्ती ज्ञानसंपन्न असणं आवश्यक असतं. अशा ज्ञानी व्यक्तीची लक्षणं भगवंत सांगताहेत. पूर्वी ‘श्रवण’ ही ज्ञान मिळवण्याची महत्त्वाची पद्धती होती. कारण विहिण्या-वाचण्याच्या ... Read More »

कंबरदुखी : एक व्याधी

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी सामान्यपणे तीस-चाळीस वयोगटातील बायका नेहमीच सर्रास डॉक्टरांकडे जातात. त्यांची कंबर दुखते. माझ्याकडेही अशा काही येतात व त्या आपल्या कंबरदुखीचे कारण स्वतःच सांगतात… ‘डॉक्टरसाहेब, माझे ना नसबंदीचे ऑपरेशन झाले आहे. तेव्हा वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिसर्‍या मुलानंतर मी ऑपरेशन करून घेतले. तेव्हापासून माझी कंबर दुखते. तेव्हा ते ऑपरेशन करतेवेळी त्यांनी मला कंबरेला इन्जेक्शन दिले होते. तिथेच कंबर दुखते ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २७२) (स्वाध्याय – २० ) योगसाधना करण्याचे विविध हेतू आहेत. पण सर्वोच्चहेतू, अत्युच्च ध्येय म्हणजे आत्मज्ञान मिळविणे होय. त्या ज्ञानाचा उपयोग करून आत्मिक उन्नती करणे. पंचकोशातील अत्यंत सूक्ष्म असा आनंदमय कोश त्यापर्यंत पोचणे. मानवाच्या चिदानंद स्वरूपाचा अनुभव घेणे. पण ही प्रगती सोपी नाही व कठीणही नाही. ऋषीप्रणित पद्धती अनुसरली तर प्रगतीकडे वाटचाल सोपी आहे. ... Read More »

इदं शरीरं कौंतेय क्षेत्रम् इति अभिधीयते …

– प्रा. रमेश सप्रे ‘संस्कृती’ या शब्दाकडे अनेक दृष्टीकोनातून पाहिलं जातं. त्यातली एक दृष्टी खूप छान आहे. संस्कृती म्हणजे मनाची मशागत म्हणजे शेती (कल्टिव्हेशन). प्रत्येकानं अशी शेती (कृषी) करायची म्हटलं तर प्रत्येकाच्या मालकीचं शेत हवं. भगवंताच्या मते असं शेत म्हणजे देह. ‘इदं शरीरं’ म्हणजे हे शरीर; ‘क्षेत्रं इति अभिधीयते’- शेत (क्षेत्र) म्हणवलं जातं. देहाला शेत म्हटलं की या शेताबद्दल, शेतीबद्दल ... Read More »

पाणी … जीवनसत्व!!

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी पाणी हा विषय एकदम साधा, त्यावर काय लिहावे? पाणी हे यथार्थाने जीवन आहे. जीवाचे मूळ पाण्यात सापडते. शास्त्रज्ञ मंगळावर किंवा कुठल्यातरी उपग्रहावर पाणी शोधत असतात. कारण कुठेही पाणी असणे म्हणजे तिथे जीवाचा उगम झाला आहे असे समजायचे. पाण्याला कुणी नीर म्हणतात, कुणी जीवन, कुणी एच२ओ तर कुणी उदक, पण जगण्यासाठी पाणी हे हवेच!! प्रेमाशिवाय माणसे जगतात, ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २७१) (स्वाध्याय – १९ ) भारतात अनेक शास्त्रे विकसित झाली. त्यात एक प्रमुख शास्त्र म्हणजे योगशास्त्र! योग हे एक शास्त्र आहे याची जाणीव प्रत्येक योगसाधकाला असायला हवी. मुख्य म्हणजे ज्यांना मानवजीवनाचे रहस्य समजून घेऊन या अतिमौल्यवान अशा जीवनाचा विकास साधायचा आहे. म्हणूनच या शास्त्राचा थोडा तरी अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच शास्त्रशुद्ध पद्धतीने ... Read More »

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः…

– प्रा. रमेश सप्रे अर्जुन व कृष्ण यांच्यातलं नातं अतिशय मधुर आहे. अर्जुनाकडून ते भक्त-भगवंत असं आहे. तर भगवंत अर्जुनाला सखाच मानतात. सख्यभक्तीचं उदाहरण म्हणजे श्रीकृष्णार्जुन! परस्पर सख्य भावानं जोडलं गेल्यामुळे ‘श्रीकृष्णार्जुन’ असा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळी श्रीकृष्ण आणि अर्जुन; श्रीकृष्णाचा अर्जुन (नि अर्जुनाचा कृष्ण). तसंच श्रीकृष्णच अर्जुन नि अर्जुनच श्रीकृष्ण असे अनेक अर्थ होतात. अन् विविध प्रसंगातून हे सर्व ... Read More »