आयुष

इदं शरीरं कौंतेय क्षेत्रम् इति अभिधीयते …

– प्रा. रमेश सप्रे ‘संस्कृती’ या शब्दाकडे अनेक दृष्टीकोनातून पाहिलं जातं. त्यातली एक दृष्टी खूप छान आहे. संस्कृती म्हणजे मनाची मशागत म्हणजे शेती (कल्टिव्हेशन). प्रत्येकानं अशी शेती (कृषी) करायची म्हटलं तर प्रत्येकाच्या मालकीचं शेत हवं. भगवंताच्या मते असं शेत म्हणजे देह. ‘इदं शरीरं’ म्हणजे हे शरीर; ‘क्षेत्रं इति अभिधीयते’- शेत (क्षेत्र) म्हणवलं जातं. देहाला शेत म्हटलं की या शेताबद्दल, शेतीबद्दल ... Read More »

पाणी … जीवनसत्व!!

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी पाणी हा विषय एकदम साधा, त्यावर काय लिहावे? पाणी हे यथार्थाने जीवन आहे. जीवाचे मूळ पाण्यात सापडते. शास्त्रज्ञ मंगळावर किंवा कुठल्यातरी उपग्रहावर पाणी शोधत असतात. कारण कुठेही पाणी असणे म्हणजे तिथे जीवाचा उगम झाला आहे असे समजायचे. पाण्याला कुणी नीर म्हणतात, कुणी जीवन, कुणी एच२ओ तर कुणी उदक, पण जगण्यासाठी पाणी हे हवेच!! प्रेमाशिवाय माणसे जगतात, ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २७१) (स्वाध्याय – १९ ) भारतात अनेक शास्त्रे विकसित झाली. त्यात एक प्रमुख शास्त्र म्हणजे योगशास्त्र! योग हे एक शास्त्र आहे याची जाणीव प्रत्येक योगसाधकाला असायला हवी. मुख्य म्हणजे ज्यांना मानवजीवनाचे रहस्य समजून घेऊन या अतिमौल्यवान अशा जीवनाचा विकास साधायचा आहे. म्हणूनच या शास्त्राचा थोडा तरी अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच शास्त्रशुद्ध पद्धतीने ... Read More »

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः…

– प्रा. रमेश सप्रे अर्जुन व कृष्ण यांच्यातलं नातं अतिशय मधुर आहे. अर्जुनाकडून ते भक्त-भगवंत असं आहे. तर भगवंत अर्जुनाला सखाच मानतात. सख्यभक्तीचं उदाहरण म्हणजे श्रीकृष्णार्जुन! परस्पर सख्य भावानं जोडलं गेल्यामुळे ‘श्रीकृष्णार्जुन’ असा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळी श्रीकृष्ण आणि अर्जुन; श्रीकृष्णाचा अर्जुन (नि अर्जुनाचा कृष्ण). तसंच श्रीकृष्णच अर्जुन नि अर्जुनच श्रीकृष्ण असे अनेक अर्थ होतात. अन् विविध प्रसंगातून हे सर्व ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २७०) (स्वाध्याय – १८) ‘स्वाध्याय’- हा फक्त तीन अक्षरी शब्द नसून त्याचा विस्तार फार मोठा आहे. यामध्ये जीवनाचे अगाध व सखोल तत्त्वज्ञान आहे. म्हणूनच परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले ‘स्वाध्याय एक आगळे व्रत’ असे मानतात. ह्या व्रतामुळे एक आगळी वेगळी गुण-संपत्ती नियमित शास्त्रशुद्ध स्वाध्याय करणार्‍याला प्राप्त होते. कृतज्ञता, अस्मिता, तेजस्विता आणि भावपूर्णता शास्त्रीजी आपल्या स्वाध्याय परिवाराला ... Read More »

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति…

– प्रा. रमेश सप्रे आपण एक मजेदार खेळ कधी न कधी खेळलेलो असतो. रस्सीखेच (टग ऑफ् वॉर्). दोन बाजू एकमेकांना ओढत असतात परस्पर विरुद्ध दिशेनं. जोपर्यंत दोन्ही बाजू समतुल्य म्हणजे सारख्याच शक्तीच्या असतील तोपर्यंत कोणीच कोणाला ओढत नाही. समतोल, संतुलन साधलेलं असतं. आपल्या मनाचं असंच असतं. आशा-निराशा; सुख-दुःख, होकार-नकार अशा द्वंद्वांची रस्सीखेच सतत चालू असते. कोणत्या बाजूनं आपण ओढले जाणार ... Read More »

ताप : मोठ्या आजाराचे छोटे लक्षण!

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी साधारणपणे वर्षाला एकदा-दोनदा ताप आला तर नेहमीचेच वाटते. ताप, खोकला, नाक गळणे वर्षाला एकदा तरी यायलाच हवे, असे कित्येकांना वाटते. वर्षाकाठी एकदातरी नाक गळून गेल्याने बरे वाटते. मी ना त्या डॉक्टरकडे गेलेले… नाक भसाभसा गळत होते. मी म्हटले, ‘नाक गळणे चालूच ठेवा!’ पण डॉक्टर कुठले ऐकतात. त्यांच्या औषधांनी नाक, घसा सगळे सुजून गेले! हे असे नसते. ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २६९) (स्वाध्याय – १७ ) विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवली तर एक गोष्ट सहजलक्षात येईल की बहुतेक जण स्वार्थी, आत्मकेंद्री झाले आहेत. अशी दृश्ये अनेक कुटुंबात, समाजात, राष्ट्रात, विश्‍वात दिसतात. सुरुवातीला मानव फक्त ‘स्व’चा म्हणजे स्वतःचाच विचार करतो. बालपणी व तरुणपणी तो आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांचा विचार करतो. त्या नातेवाईकांत त्याचे आई-वडील, आजी-आजोबा, भावंडं… हीच ... Read More »

अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः …

– प्रा. रमेश सप्रे प्रसंग आहे एका हिंदी चित्रपटातील. मोठं कुटुंबं. अनेकमाणसं. पण प्रत्येकाचं तोंड विरुद्ध दिशेला. त्यामुळे घरातशांतीपेक्षा समरप्रसंगच अधिक. सर्वांची सर्व कामं करणारा एक नोकर ही त्या घराची अत्यंत गरज होती. सुदैवानं असा नोकर मिळतोही. आपल्या मनमोकळ्या स्वभावानं अन् अंगी असलेल्या अनेक गुणांनी युक्त अशा त्या नोकरानं चमत्कार घडवला. सर्व मंडळींची दिलजमाई झाली. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ... Read More »

सर्वांसाठी योगासने

– कांता जाधव भिंगारे, आयुर्वेद तज्ज्ञ आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगशास्त्राचा उपयोग होतो हे आता जगमान्य आहे. खास करून आजच्या धावपळीच्या, दगदगीच्या युगात व जीवनात ती एक अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे. खूप थकवा आल्यावर योग्य त्या आसन स्थितीत आपण काही काळ बसलो तर आपल्याला टवटवीतपणा तर येतोच शिवाय अगदी ‘आकाश कोसळलं’ तरीही माणूस आपल्या मनावर उत्तम ... Read More »