ब्रेकिंग न्यूज़

आयुष

…प्रसीद देवेश जगन्निवास

– प्रा. रमेश सप्रे अर्जुन हा नावाप्रमाणे ऋजू म्हणजे सरळ स्वभावाचा आहे. भगवंतानं आपल्या सर्व विश्‍वात पसरलेल्या विभूतींच वर्णन त्याच्यासमोर केलं. तेव्हा अर्जुनातील कुतुहल जागं झालं नि त्यानं भगवंताला म्हटलं, ‘तू सर्व चराचरात पसरलेला आहेस हे कळलं. पण आता हे सर्व चराचर तुझ्यात एकवटलं आहे त्याचंही दर्शन मला घडव.’ भगवंत व अर्जुन यांच्यामधलं स्नेहाचं नातं एवढं घट्ट होतं की भगवंतानं ... Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २६०) (स्वाध्याय – २८) – डॉ. सीताकांत घाणेकर ‘स्वाध्याय’- फक्त तीन अक्षरी शब्द, पणविश्‍वाला बदलण्याची ताकद स्वाध्यायात आहे. म्हणूनच स्वाध्याय शास्त्रशुद्ध करायला हवा. तेव्हाच त्यांचे चांगले परिणाम दिसून येतील. त्यासाठी मानवाची बुद्धी स्थिर, प्रभावी असणे अत्यंत जरुरी आहे. कठोपनिषदातील श्लोकामध्ये म्हटले आहे… बुद्धिं तु सारथिम् विद्धि| – बुद्धीला सारथ्याची उपमा दिलेली आहे. कुठल्याही वाहनाचा सारथी स्थिर असणे अपेक्षित ... Read More »

॥ अंतकाले च माम् एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् … ॥

– प्रा. रमेश सप्रे आपण सामान्य माणसं मरतो त्याला ‘देहांत’ म्हटलं जातं. असं मरणं ही पुढच्या जन्माची तयारी असते असं समजलं जातं. हे जन्ममृत्यूचं चक्र सतत गरगरत असतं. या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती असं मानलं जातं. जो परमात्मा- परमेश्‍वर आहे ज्याचे आपण एक सामान्य अंश आहोत. त्याच्याशी एकरुप होणं (सायुज्य पावणं) ही खरी मुक्ती ! सर्व माणसांचं हे समान अंतिम ... Read More »

डॉक्टरांवर पेशंटचा विश्वास…!

– डॉ. राजेंद्र साखरदांडे (साखळी – गोवा) खरेच! आजकाल डॉक्टर या मंडळींवर लोकांचा विश्‍वासआहे का? मी स्वतः डॉक्टर असल्याने गेली पस्तीस वर्षे जी गोष्ट अनुभवली… स्वतः रुग्णांशी बोललो… इतर डॉक्टरांशीही बोललो… त्यावरून शेवटी या निष्कर्षापर्यंत जरी पोहोचलो नसेन तरीही आजही लोकांचा डॉक्टरांवरचा विश्‍वास पूर्णपणे उडाला नाही. किंबहुना गोव्यातील कित्येक डॉक्टर आणखीच विश्वासपात्र ठरलेले आहेत. हे सदर लिहिताना कुणाची प्रशंसा वा टीका ... Read More »

योगमार्ग – राजयोग

(योगसाधना – २५९) (स्वाध्याय – २७) – डॉ. सीताकांत घाणेकर धरतीवर जन्म घेतला की ही अपेक्षा ठेवायलाच हवी कीजीवनाचे विविध पैलू नैसर्गिकरीत्या असतीलच. सुखदुःखं असतील. चांगल्या घटनांबरोबर अनेक संकटे-मस्याही असतील. सर्व मानवजातीसाठी तेच कायदे आहेत. सामान्य-ज्ञानी, गरीब-श्रीमंत, संतसत्‌पुरुष-चोर डाकू अगदी देवाधिक व अवतार – कुणालाही या संदर्भात सूट नाही. Read More »

… प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिः अभाषत

– प्रा. रमेश सप्रे ‘समुपदेशन गीतेतून’ असं म्हणताना समुपदेशन म्हणून भगवान श्रीगोपालकृष्णच डोळ्यासमोर उभे राहतात आणि अर्जुन हा ते समुपदेशन स्विकारून त्यावर चिंतन करणारा ‘शुभार्थी’ म्हणून आपल्यासमोर येतो. जो कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीत आहे. गोंधळलाय – गांगरलाय तो आपल्या शुभा(कल्याणा)साठी एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडे समुपदेशनासाठी जातो. अशाला ‘शुभार्थी’ म्हटलं जातं. अर्जुन असा शुभार्थी आहे. आपणही गीतेच्या वाचन-मनन-चिंतनातून असं बनण्याचा संकल्प ... Read More »

समज-गैरसमज  – सिझेरियन कां करावे लागते?

– डॉ. राजेंद्र साखरदांडे (साखळी – गोवा) खरेच, तुम्हाला ‘सिझेरियन सेक्शन’ करून घ्यायचेय? हा प्रश्‍न मी गरोदर स्त्रियांना करतोय. उत्तर शोधून ठेवा…तोपर्यंत आम्ही त्याविषयी थोडेफार जाणून घेऊ या. गर्भवती झाल्यानंतर २८ आठवड्यांनंतर ज्या ऑपरेशन द्वारे नवजात बालकाला तिच्या उदरातून बाहेर काढले जाते ते ऑपरेशन म्हणजे ‘‘सिझेरियन सेक्शन’’ होय. १४० बी.सी.ला याचा पहिल्या प्रथम उल्लेख आढळतो. तेव्हा त्याला ‘‘लेक्स रेजिया’’ म्हटले ... Read More »

योगमार्ग – राजयोग

– डॉ. सीताकांत घाणेकर (योगसाधना – २५८) (स्वाध्याय – २६ ) विश्‍वात प्रत्येक जण काहीतरी कृती करीत असतो.प्रत्येकाचा त्यामागचा हेतू वेगवेगळा असतो.आपल्यापैकी बहुतेक जण अनेक कृती कुठल्यातरी फळाच्या अपेक्षेने करतो. अगदी थोड्या व्यक्ती आपल्या कृतीमुळे स्वतःला व इतरांना सुख-आनंद मिळावे यासाठी करतात. काहीजण स्वतःचा व इतरांचा जीवनविकास व्हावा म्हणून कृतिशील असतात. संत-महापुरुष तर भगवंताचे विश्‍व व त्यातील सर्व घटक गुण्यागोविंदाने ... Read More »

दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेत् युगपत् उत्थिता…

– प्रा. रमेश सप्रे सन एकोणीसशे पंचेचाळीसचा मे महिना. अमेरिकेतील नेवाडा वाळवंट. एका अभूतपूर्व क्षणाच्या प्रतीक्षेत असलेले विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोक. मानवाच्या इतिहासातील पहिल्यावहिल्या अणुबॉंब स्फोटाच्या चाचणीचा प्रसंग. चाचणी यशस्वी झाली. त्याचवेळी मानवता पराभूत झाली. पण या सार्‍या ऐतिहासिक प्रसंगाचा सूत्रधार काहीशा गोंधळलेल्या मनःस्थितीत, काहीसा सुन्न होऊन उभा होता. त्या कसोटीच्या यशस्वितेचा अर्थच त्याला कळत नव्हता. इतक्यात काही वार्ताहरांनी त्याला ... Read More »

पक्षाघात आणि आयुर्वेद उपचार

– कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ) सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात किंवा अर्धांगवायू. ही सर्व समान नावे आहेत. विशेषतः वृद्धापकाळात होणारा हा वातविकार असून मोठ्या कष्टाने बरा होणारा किचकट व्याधी आहे. यात शरीराच्या अर्ध्या भागामध्ये वैफल्य येणे, लकवा मारणे, शरीराचा अर्धा भाग लुळा पडणे इ. लक्षणे दिसून ... Read More »