ब्रेकिंग न्यूज़

आयुष

पावसाळ्यातील आजारांवर मात

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) वर्षा ऋतूत देहदुर्बलता व पित्ताची संचयावस्था ही शरीराची स्थिती असते. पण देहदुर्बलता जरी असली तरी अग्निमांद्य व वातप्रकोप लक्षात घेऊन बल्य औषधे न देता प्रथम पचनशक्ती वाढवून नंतरच बल्य औषधे द्यावीत. तसेच पित्ताचा संचयकाळ असल्याने पित्तकर आहार-विहार टाळावा. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे रोगजंतू झपाट्याने वाढतात व विविध रोगांची लागण व प्रसारण होत असते. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायरिया, ... Read More »

‘डॉक्टर्स डे’

मानसी म. बांदोडकर डॉक्टर म्हणजे पृथ्वीतलावरचा दुसरा परमेश्‍वरच आहे. कारण परमेश्‍वराला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव कोणाच्या ना कोणाच्याही रूपाने आपल्याला सतत जाणवत राहते. पण जो डॉक्टर आपल्याला आजारातून बरे करतो, आपल्याला पुन्हा एक नवीन आयुष्य जगण्यास नवे बळ देतो, आपल्या वेदना तात्काळ कमी करण्यास मदत करतो… तो डॉक्टर म्हणजे प्रत्यक्ष परमेश्‍वरासमानच वाटतो. या डॉक्टरला ... Read More »

आज ‘अंमली पदार्थ विरोधी’ दिन

डॉ. सुषमा कीर्तनी (पणजी) ‘‘प्रथम ऐका – मुलांना व तरुणांना निरोगी व ज्ञानी बनविण्यासाठी मदत करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रथम त्यांचे ऐकून घ्या.’’ अमली पदार्थांचा वापर टाळण्यास मदत करण्याचे हे पहिले पाऊल असून ते विज्ञानावर आधारित आहे व त्यामुळे मुले व तरुणांचे आयुष्य बनविण्यास उपयोगी ठरणार आहे. तरुणांना सामाजिक कार्यामंध्ये गुंतवून किंवा सामावून घेतले पाहिजे, कायद्याची अमलबजावणी समजावून दिली पाहिजे, ... Read More »

पावसाळ्यातील वातप्रकोप

डॉ. मनाली म. पवार पावसाळ्यात आहारात मधुर, आंबट, खारट या चवीचे पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत. त्यामुळे वाढलेला वातदोष कमी होण्यास मदत होते. जेवणात स्निग्ध पदार्थही भरपूर हवेत. विशेषतः तूप अधिक प्रमाणात. तूप हे वातप्रशमन करणारे व त्याचबरोबर उत्कृष्ट अग्निवर्धक असल्याने उपयुक्त ठरते. पावसाळा सुरू होताच झाडे हिरवीगार दिसू लागतात. त्यावर विविध फुले फुलतात. ढगांचा गडगडाट होतो. मयूर आणि बेडकांच्या गर्जनेने ... Read More »

फलवर्ग व फळ सेवनाचे नियम

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) ताजी फळे उष्ण ऋतूंत व सुका मेवा थंड ऋतूंत असे साधे फळांच्या सेवनाचे नियम पाळून फळे खाल्ल्यास आपल्याला सगळ्या प्रकारची जीवनसत्त्वे मिळतात. फ्रुक्टोज म्हणजे केवळ फ्रुट शुगर- फळांमध्ये आढळणारी साखर. या फळातील साखरेने रोग उत्पन्न होत नाहीत, तर आपण जे काही आधुनिकीकरण खाद्यपदार्थांमध्ये केलेले आहे त्याने रोगांना आमंत्रण दिलेले दिसते. फलवर्ग ः १. केळी – भारतात ... Read More »

नैराश्याची परिणती ः आत्मघात

 डॉ. व्यंकटेश हेगडे आत्महत्येचे प्रमाण हल्ली खूपच वाढलंय. आपली बदललेली जीवनशैली हे मुख्य कारण. त्या जीवनशैलीमध्ये भोग आहे. मानवी मूल्यांचा र्‍हास आहे. चांगल्या संस्कारांचा अभाव आहे. वखवखलेल्या वासनेचा सुकाळ आहे. अप्रामाणिकपणाने कळस गाठलाय. प्रसारमाध्यमे अनेकवेळा आत्महत्येच्या बातम्या ठळक व भडक करून अगदी पहिल्या पानावर देतात. हे वाचून अनेकांच्या मनातल्या आत्महत्येच्या विचाराला बळ मिळते. माणसाला निसर्गाने शरीर आणि मन दिले. त्या ... Read More »

दमा – कफ – टॉन्सिल

 वैदू भरत म. नाईक लहान मुलांना कफ थुंकता येत नाही व त्यामुळे ते तो गिळतात व तो शौचावाटे बाहेर पडतो. कफ चिकट असल्यास तो श्‍वासनलिकेत साचतो. चिकट कफामुळे श्वासोच्छ्वासात घरघर असा आवाज होतो. दमा सर्द हवा, आकाशात ढग येतात, त्यावेळी किंवा कधी कधी रात्री दम कोंडतो, श्वास लागतो व खोकल्याची उबळ येते. हा विकार मोठ्या माणसांत त्यातल्या त्यात पुरुषांत जास्त ... Read More »

॥ बुद्धीने सर्वही होते ॥ आस्तिक … नास्तिक

प्रा. रमेश सप्रे उगीचच उथळ विचार करून इतरांविषयी मतं बनवून त्यावरून आपलीच मनं कलुषित नि बुद्धी प्रदूषित करून घेऊन जगणं हे सर्वांच्याच दृष्टीनं घातक असतं. आज सर्वत्र असाच आचार दिसून येतो. हा खरा भ्रष्टाचार आहे, जो सारं जीवन पोखरून टाकतो आणि अनुभव देतो असमाधानाचा, असंतोषाचा, अशांतीचा. स्वामी विवेकानंदांसारख्या सेवाव्रती तत्त्वज्ञांनी अनेकदा हा प्रश्‍न विचारलाय – ‘जगात संपूर्णतः (शंभर टक्के) नास्तिक ... Read More »

शाकाहार व आयुर्वेद

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) वरी किंवा वर्‍याचा तांदूळ उपवासाला वापरतात पण पित्तप्रकोप करणारे द्रव्य आहे. रुक्ष गुणात्मक असल्याने मेदोवृद्धीच्या रुग्णांना द्यावे. सर्व नवीन धान्ये पहिल्या वर्षापर्यंत पचायला जड, मधुर, कफकर व मलस्तंभक असतात. ही धान्ये दुसर्‍या वर्षी पचायला (त्या मानाने) लघु व पथ्यकारक होतात आणि तिसर्‍या वर्षी निःसत्व किंवा नीरस होतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये शाकाहाराला खूप महत्त्व दिलेले आहे. उत्तम ... Read More »

गर्भाशय मुख कर्करोग भाग – ३

– डॉ. स्वाती अणवेकर ज्या रुग्णांमध्ये कर्करोगाचा प्रसार हा गर्भाशयमुख व कटी भागातील पेशींपर्यंत झाला असेल तेव्हा यात फक्त शस्त्रक्रिया करून थांबणे पुरेसे नसते. तर अशा रुग्णांना फक्त रेडिओथेरपी अथवा शस्त्रक्रिया व रेडिओथेरपीचा वापर करावा लागतो. हल्लीच्या काळात रेडिओथेरपीसोबत किमोथेरपीदेखील दिली जाते गर्भाशय मुख कर्करोग निदान या कर्करोगाचे निदान करण्यासाठी सर्वप्रथम पॅप स्मिअर टेस्ट करून गर्भाशयमुख पेशींमध्ये काही अनावश्यक बदल ... Read More »