ब्रेकिंग न्यूज़

आयुष

योगसाधना – ३३२ योगमार्ग – राजयोग आसन – १६

– डॉ. सीताकांत घाणेकर हल्ली जमिनीवर मांडी घालून बसण्याची आपली सवय मोडली आहे. कारण आपण पाश्‍चात्त्यांसारखे खुर्चीवर बसतो. सगळे ‘चेअर मेन’ झालो आहोत. त्यामुळे थोड्या वेळाने हे सुखासन (भारतीय बैठक) ‘दुःखासन’ होण्याची शक्यता असते. निदान योगसाधकांनी तरी या तीन आसनांचा उपयोग करून घ्यावा – टीव्ही बघताना जरी याचा सराव केला तरी फायदा होईल. आपण कोणतीही चांगली महत्त्वाची गोष्ट करतो त्यावेळी ... Read More »

ज्ञानेंद्रियांच्या स्वास्थ्याचे महत्त्व

– डॉ. मनाली म. पवार(गणेशपुरी-म्हापसा) ध्वनी प्रदूषण हे श्रोत्रेंद्रियांचा अति योग, मिथ्या योग, धूळ-धुरळा-धूर हे स्पर्शेंद्रियांना तर फास्ट फूड हे रसनेंद्रियांना हानिकारक आहे. या गोष्टींचा हानीकारक परिणाम केवळ त्या त्या इंद्रियांपुरताच मर्यादित राहात नाही. तर त्याचे दुष्परिणाम सर्व शरीरावर व मनावरदेखील होतात. त्यामुळेच इंद्रियांच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. जीवनाचा उद्देश सुखप्राप्ती व सुखोपभोग हा आहे. ‘स्व’ म्हणजे आपण ... Read More »

हितकारक नारळपाणी

नारळपाणी म्हणजे नैसर्गिक उत्तम पेय, असे आपण म्हणतो. केरळ आणि महाराष्ट्रातील कोकण भागात सहज उपलब्ध होणारे हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. आपल्याकडे आजारी किंवा अशक्त व्यक्तीला नारळपाणी आवर्जून दिले जाते. मात्र दैनंदिन व्यवहारात प्रत्येकाने नारळपाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय हितकारक असते. नारळपाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. मात्र नारळपाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत बरेचदा संभ्रम ... Read More »

‘एसी’मध्ये बसण्याचे दुष्परिणाम…

दिवसभरातील एकूण वेळापैकी जास्त वेळ ऑफीसमध्ये असणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कामाचा वाढता ताण आणि तो सांभाळताना होणारी तारांबळ नेहमीचीच. आता इतके तास एका ठिकाणी बसायचे म्हणजे त्याठिकाणी योग्य त्या सोयीसुविधाही हव्यात ना. त्यानुसार बहुतांश ऑफीसेसमध्ये एअर कंडिशनर असतोच. मुंबईसारख्या शहरात तर उकाड्यामुळे हा एअर कंडिशनर जणू आवश्यकच असतो. ही गार हवा शरीराला चांगली वाटत असली तरीही आरोग्याच्यादृष्टीने ती अजिबात ... Read More »

गूळ खाण्याचे फायदे….गूळ खाण्याचे फायदे….

पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. साखरेमुळे हळूहळू गुळाचं महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला. गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणवारापुरत. एरव्ही मात्र गुळाचा तितकासा ... Read More »

योगसाधना – ३३० योगमार्ग – राजयोग आसन – १४

– डॉ. सीताकांत घाणेकर ही अनुभूती कशी असते ते वर्णन करता येत नाही. ती स्वतः नियमित योगसाधना करूनच अनुभवायची असते. मानव इथे स्वतःचे, विश्‍वाचे अस्तित्वच विसरून जातो. योगसाधनेमध्ये आत्मा-परमात्म्याचे हेच अत्युच्च मीलन अपेक्षित आहे. पण त्यासाठी प्राथमिक पायरीवरील योगासनांपासून सुरुवात करायला हवी. योग म्हणजे मीलन – प्राथमिक अवस्थेत मन व शरीर यांचे आणि तेसुद्धा भावनिक मीलन. प्रत्येक व्यक्ती क्षणोक्षणी कुणाला ... Read More »

इंद्रियाच्या स्वास्थ्याची काळजी त्वचा

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) त्वचेखालील फाजील मेद कमी होऊन त्वचा घट्ट राहण्यासाठी दोन चमचे कुळथाचे पीठ लिंबाच्या रसात एकत्र करून साबणाऐवजी वापरावे. त्वचा निरोगी व तेजस्वी बनविण्यासाठी दूध, लोणी, तूप, मध, केशर, हळद वगैरे त्वचापोषक व रक्तशुद्धी करणार्‍या गोष्टींचे नियमित सेवन करावे. सर्वशरीरवर्ति स्पर्शनेंद्रियं इत्यभिधीयते | सर्व शरीर व्यापून राहणारे त्वचा हे एकमेव ज्ञानेंद्रिय आहे, ज्याने स्पर्शाचे ज्ञान ... Read More »

इंद्रियांच्या स्वास्थ्याची काळजी जीभ

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) अति थंड, अति तिखट, अति गोड, अति खारट, अति उष्ण पदार्थ टाळावेत. सुपारीसारख्या तुरट चवींचे खाद्यपदार्थ टाळावेत, पण जिभेच्या आरोग्यासाठी तांबुलसेवन मात्र पथ्य आहे. जीभ हे रसनेंद्रियाचे स्थान आहे. हे वागेंद्रियं व रसनेंद्रिय या दोघांचेही स्थान आहे. म्हणजे जिभेच्या ठिकाणी एक ज्ञानेंद्रियं आहे जे रसज्ञान करवते आणि एक कर्मेंद्रिय आहे जे बोलण्याचे काम करते. ... Read More »

किचन क्लिनीक

– वैद्य स्वाती हे. अणवेकर (म्हापसा ) भारतीय आहार पद्धतीमध्ये जेवण बनवीत असताना आपण ब-याच जिन्नसांचा वापर आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये करत असतो.आपली भारतीय आहार पद्धती इतकी विशाल आणि समृद्ध आहे.आपल्याला हे माहीत आहे का की आपण आपल्या जेवणामध्ये वापरत असलेले बरेचसे पदार्थ हे जरा वेगळ्या पद्धतीने वापरले तर आपण त्यांचा उपयोग घरच्या घरीच शरीराच्या छोट्या मोठ्या तक्रारी ब-या करण्याकरीता करु ... Read More »

इंद्रियांच्या स्वास्थ्याची काळजी ‘‘नाक’’

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) वेगवान वाहनातून प्रवास करताना नाकाचा भाग झाकून घ्यावा.. जेणेकरून धुलीकण वेगाने नाकात जाणार नाहीत. तसेच घरातून बाहेर पडण्यापूर्वी रोज नाकाला आतून तेल लावावे. पञ्चेन्द्रियाधिष्ठानेष्वेका घ्राणम् | पाच इंद्रियांच्या अधिष्ठानापैकी एक इंद्रिय म्हणजे घ्राण म्हणजेच नाक. नाक हे घ्राणेंद्रियाचे स्थान आहे. याची उत्पत्ती पृथ्वी महाभूतापासून झाली आहे. याचा गुण गंध होय. श्‍वासोच्छ्वास करणे हे नाकाचे ... Read More »