आयुष

हर्बल गार्डन

– डॉ. स्वाती अणवेकर बाकूची/बावची ह्याचे ०.५-१.५ मी उंच वर्षायू क्षुप असते. काण्ड सरळ असून फांद्या मजबूत असतात. पाने २.५-८ सेंमी लांब किंचित गोल अथवा हृदयाकृती, एकान्तर असतात. पत्र धारा दन्तुर असतात. फुले पिवळसर, निळे पुष्प दंड मोठा व त्यात १-३० फुले गुच्छात उगवतात. फळ काळे व गुच्छात येते. बीज काळे लहान कोवळे व विशिष्ट उग्रगंधी असते.बीज मगज पांढरा असतो. ... Read More »

‘वंध्यत्वा’वर आयुर्वेद परिणामकारक लेखांक – २

– डॉ. मनाली पवार (गणेशपुरी, म्हापसा) आजही वंध्यत्व म्हटलं की तपासणीसाठी बहुधा स्त्रीलाच पाठविण्यात येते. परंतु पुरुषांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की, पुरुषांमध्ये दोष असण्याचे प्रमाण जवळ जवळ ४० टक्के इतके आहे. शुक्रजंतुंचे प्रमाण कमी असणे, शुक्राणूंची गती आवश्यक तेवढी नसणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, कधी कधी अति उष्णतेमुळे आतल्या आतच शुक्राणू नष्ट होणे अशा अनेक समस्या असतात. सारी भौतिक ... Read More »

सूज

– भरत म. नाईक काही वेळेस सूज शरीराच्या दोन्ही शाखांमध्ये एकाच वेळेस सारखीच जाळत असते. तसेच दुसर्‍या प्रकारात सूज शरीराच्या कोणत्याही एकाच भागात येते. त्याला ‘एकदेशोत्थित शोध’ म्हणतात. व्यवहारात आम्हाला सहा प्रकारच्या सुजेचा सामना करावा लागतो. वात, पित्त, कफ, हृद, वृक्क (किडनी) व आगंतूक कारणाने येणारी सूज. सूज शारीरिक दोष व आगंतुक कारण, पुन्हा शोध आणखी शोध दोन प्रकारे वर्ग ... Read More »

वंध्यत्व ः ज्वलंत बोचरे दुःख

– डॉ. मनाली महेश पवार (गणेशपुरी, म्हापसा- गोवा) आयुर्वेदशास्त्रामध्ये वंध्यत्व येऊ नये व होणारी संतती उत्तम व्हावी यासाठी आचरणात आणायच्या विविध बाबींचा विचार झालेला आहे. त्यामुळे संततीप्राप्तीचा विचार करणार्‍या सर्वांनी ‘वंधत्व ः कारणे व निवारण’ तसेच ‘सुप्रजाजनना’संदर्भात आयुर्वेदाचे चिंतन मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. संततीप्राप्ती ही एक नैसर्गिक देणगी आहे. पण या नैसर्गिक योगदानाला अनेक कारणांनी जणू ग्रहणच लागले आहे. ... Read More »

त्वचा विकार

वैदू भरत म. नाईक उशीरा जेवण, उपवास, कदान्न, शिळे जेवणे, पोषणाअभावी त्वचा रुक्ष होते. भरीस भर म्हणून उन्हातान्हात, पावसात श्रमाची भरपूर कामे करणे, त्यामुळे त्वचा रुक्ष होऊन जळवात, भेगा असे विकार होतात. केवळ त्वचाविकार फारच थोडे आहेत. बरेचसे त्वचेचे वाटणारे विकार हे यकृत, रक्त, मांस, मेद, कफ, पित्त यांच्या दुष्टीमुळे पोटातील अन्नवहस्रोतस व रसरक्ताभिसरणाची यंत्रणा बिघडल्याची वॉर्निंग देणारे त्वचेवरचे दर्शन ... Read More »

किचन क्लिनीक

१) संत्र/नारंगी नागपूर ह्या फळाकरीता जगभरात प्रसिध्द आहे. संत्री हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळच असेल. ह्याचा रसदेखील आपण आवडीने पितो. तसेच केक, बिस्कीट, जाममध्येदेखील ह्याच्या रसाचा वापर करतात असे म्हणतात. ऑरेंज फ्लेवर हा भारी फेमस आहे बुवा. ह्याचे झाड हे लिंबाच्या झाडा समान असते. ह्याची फळे चवीला आंबट, उष्ण, रूचीवर्धक, वातनाशक व सारक म्हणजेच मोठ्या आतड्यातील मळ पुढे ... Read More »

हेमंत, शिशिर ः आरोग्यदायी ऋतू

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) उत्कृष्ट देहबल, सर्व दोषांची समस्थिती व प्रदीप्त जाठराग्नी यामुळे या ऋतूंत सहसा अनारोग्य येत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे भरपूर खाणे, पिणे व व्यायाम करणे आरोग्यदायक आहे. सकाळी वेळ नसल्यास रोज रात्री पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला तेलाने अभ्यंग केल्यास त्वचेला स्निग्धता मिळते. शिवाय त्वचेमार्फत तेल आत जिरून रस-रक्त-मांस या धातूंचेही पोषण करते. दरवर्षी ... Read More »

किचन क्लिनीक = फळ वर्ग

– डॉ. स्वाती अणवेकर (म्हापसा) आता आपण कंदमुळं हा वर्ग पूर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळू – तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट फळांचा!! फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे. आपण सर्वचजण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो. ‘‘उस वक्त हम आव देखते हैं न ताव’’. हो, खरेच फळे पौष्टिक, रूचकर असतात. तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिजदेखील ... Read More »

हर्बल गार्डन

कुटज/कुडा ह्याचे वर्षायू पाने असणारा ९-१२ मीटर उंच वृक्ष असतो. बुंध्याकडील साल पांढरी धुरकट रंगाची व कोरडी असते. पाने ९-१२ सेंमी लांब व ४-८ सेंमी रूंद व कदंबाच्या पानांप्रमाणे असतात. फुले पांढरी व मंद सुवासयुक्त असतात व मंजीरीस्वरूप असतात. फळ शेंगाच्या आकाराचे २०-४०सेंमी लांब व ०.५- १ सेंमी व्यासाचे असते. एका देठाला २-२ शेंगा येतात. या शेंगांवर. पांढरे डाग असतात, ... Read More »

आरोग्यरक्षणासाठी हिरव्या भाज्याच…

 वर्षा नाईक (प्रा. गोवा कॉलेज ऑफ होमसायन्स) भाज्या लवकर खराब होत असल्यामुळे खरेदी करताना थोड्याच म्हणजे १-२ दिवसांपुरत्याच व ताज्या ज्यांच्यावर डाग, धब्बे, सडकेपणा किंवा भेगा नसतील अशा खरेदी करा. प्रत्येक व्यक्तीला या हिरव्या भाज्यांच्या आरोग्यरक्षक आणि नियामक गुणधर्मांबद्दल माहिती असायला हवी ‘‘सुरक्षित आहार घेणे हा आपला हक्क आहे’’.   हिवाळा आला आणि त्याच्याबरोबर येणारा उत्साह आपल्यात संचारलाय. जसे तुम्ही ... Read More »