अंगण

सातपुड्याची राणी पंचमढी

– सौ. पौर्णिमा केरकर (पायाला भिंगरी) (भाग-५) मेमहिन्याच्या उन्हाळ्यात दरवर्षी एखाद्या तरी थंड प्रदेशाच्या ठिकाणी प्रवास करावा व तेथील निसर्गसंपन्न वातावरणामधून तनामनाला एक वेगळी ऊर्जा मिळवावी ही जणू काही मनाला आता सवयच जडलेली आहे. ‘शिमला, आबू, पंचमढी, महाबळेश्‍वर जान उटकमण्ड अरू नीलगिरी, नैनीताल बखान’ असे एका कवीने आपल्या कवितेतून वैशिष्ट्यपूर्ण थंड हवेच्या ठिकाणांचे वर्णन केलेले आहे. त्यांतीलच मध्य प्रदेशात स्थित ... Read More »

बँका आणि आर्थिक घोटाळे

– शशांक मो. गुळगुळे बँका हे आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र असल्यामुळे बँकांत अफरातफरी, घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणे ही पूर्वापार चालत आलेली आहेत. यातली सगळीच प्रकरणे उजेडात येतात असे नाही. बँकांत प्रामुख्याने दोन तर्‍हेचे व्यवहार चालतात. एक ठेवी स्वीकारणे व दुसरे कर्जे देणे. पूर्वी ठेवी स्वीकारण्यातही भ्रष्टाचार होत असे. समजा एखाद्याकडे गैरमार्गे कमविलेला पैसा असेल तर तो इसम दुसर्‍याच खोट्या नावाने ते ... Read More »

गोमंतकीय कुटुंबांचे आनंदपर्व : चवथ

– डॉ. पांडुरंग फळदेसाई गोमंतकीयांचा एक विशेष म्हणजे ते कमालीचे उत्सवप्रिय. घरातला एखादा विधी असो, व्रत असो, सण असो, गावातला मंदिरातला उत्सव असो किंवा देवळातली जत्रा असो, तो त्याला आपल्या कुटुंबाचा आनंदसोहळा मानतो. त्यात आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबरच आपले शेजारी, मित्र, दूरवर राहणारे सगेसोयरे यांना सामावून घेण्यासाठी धडपडतो. त्या धडपडीत आणि नंतर होणार्‍या भेटीगाठीत तो धन्यता मानतो. अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा ... Read More »

खरा जनगणमनाचा अधिनायक!

– प्रा. रमेश सप्रे ‘सध्या ढोलताशांच्या गजरात गणरायाचं आगमन होतं. त्यात लोकांची उत्स्फूर्त भावभक्ती दिसून येते की स्पर्धात्मक मस्ती?’ असा प्रश्‍न एका प्रसिद्ध दैनिकाने आपल्या वाचकांना विचारला होता. बहुसंख्य वाचकांनी ‘स्पर्धात्मक मस्ती’च्या बाजूने कौल दिला. जरा खोल विचार केला तर आज ज्याला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतात त्याच्या प्रत्येक अंगाबद्दल असे म्हणता येईल की ‘भक्ती कमी, मस्ती अधिक!’ गणेशमूर्तींची भव्यता, त्यावर लोकांनी ... Read More »

शिल्पकलेचा अनुपम आविष्कार

– सौ. पौर्णिमा केरकर (भाग-४) प्राचीन भारताच्या इतिहासात शिल्पकलेने अत्युच्च टप्पा गाठला होता. आपला गौरवमयी वारसा समजून घेऊन त्याचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने आपल्याकडे एकूण अनास्थाच दिसून येते. आपल्या पूर्वजांच्या कलाकौशल्याची प्रचिती देणारा हा वारसा अगदीच कवडीमोल ठरला आहे का? अशी खंत मनाला असा ऐतिहासिक वारसा अनुभवताना सातत्याने वाटत राहते. Read More »

इंधन उद्योगात आमूलाग्र बदलासाठी भारत सज्ज

– शशांक मो. गुळगुळे आपल्या देशाला पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेची समस्या भेडसावत आहे. मागणी व पुरवठा यात मोठी तफावत असल्यामुळे आपण जादा दराने तेल आयात करतो. मार्च २०१४ मध्ये भारताने २४.५ कोटी लिटर डिझेल एका दिवसात वापरल्याचे पेट्रोलियम प्लॅनिंग ऍनॅलिसिस सेलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. याप्रमाणे एका महिन्यात अंदाजे ७६० कोटी लिटरवर आकडा पोहोचतो, तर वार्षिक वापराचा विचार केला ... Read More »

गणेश चतुर्थी विशेष – श्रीगणेशाचा विश्‍वसंचार

– दत्ता भि. नाईक एकोणीसशे पंच्याण्णवनंतर यंदा दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा गणेशचतुर्थी २९ ऑगस्टला येत आहे. दर एकोणीस वर्षांनी येणारा हा योग म्हणजे केवळ योगायोग नव्हे; आपल्या पूर्वजांनी सूर्य व चंद्र यांचा जो अभ्यास केलेला आहे, त्यामुळे हा ठरल्याप्रमाणे सातत्याने घडणारा योग आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेशाचे पूजन करण्याची परंपरा आहे. गणपती हा विशेषत्वाने महाराष्ट्रात अधिक प्रमाणात ... Read More »

गणेश चतुर्थी विशेष – लोकमानसाच्या हृदयातील गणपती

– सौ. पौर्णिमा केरकर भारतीय लोकमानसाला भूमी ही केवळ अन्नधान्य पुरविणारी उपजावी जमीन वाटली नाही. तिच्यात त्यांनी भूदेवी आणि भूमातेचे रूप पाहिले. सर्जन, सुफलीकरण, संरक्षण आणि समृद्धी यांची अधिष्ठात्री देवता म्हणून भूमीकडे त्यांनी पाहिले. पावसात ही भूमी सर्वांगाने सचैल न्हाते. तिच्या अंगाखांद्यावरची माती पाण्याबरोबर वाहत खाली येते. अशा मातीत पेरलेले उगविण्याची ताकद असते. आणि यासाठी या मातीला एकत्रित करून तिच्या ... Read More »

गणेश चतुर्थी विशेष – स्वागत गणरायाचे

– सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर  मंगलमूर्ती मोरया’ अशा गजरात दरवर्षी ज्या गणरायाचे स्वागत होते, त्याची आपण सारेच उत्सुकतेने वाट पाहत असतो. नावातच ‘मंगल’ शब्द असलेल्या गणेशाच्या आगमनाने वातावरणात पावित्र्य, मांगल्य याचं वास्तव्य भरून राहतं. येताना तो आपल्यासाठी घेऊन येत असतो आनंदाचा ठेवा, सुखशांतीचा- भरभराटीचा आशीर्वाद. संकटे नि चिंता तर याच्या आगमनानेच दूर पळून जातात. Read More »

गणेश चतुर्थी विशेष – गणराज रंगी नाचतो…

– सौ. लक्ष्मी जोग वर्षा ऋतू मेघमल्हार आळवीत येतो. अवनीचा कणन्‌कण आनंदाने तरारून उठतो. वर्षाराणीमुळे भूमी खर्‍या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होते. न्हात्या-धुत्या झालेल्या सृष्टीची सुंंदरता ऐन भरात येते. झाडाझुडपांपासून ते चिमुकल्या तृणपात्यापर्यंत जणू सौंदर्यस्पर्धा लागलेली असते. एखाद्या टिंबासारख्या दिसणार्‍या पांढर्‍याशुभ्र मोत्यांप्रमाणे चमकणार्‍या असंख्य कळ्या अंग-प्रत्यंगावर लेवून तृप्त अनंत डौलात उभा असतो. हिरव्यागार टिकल्यांच्या पर्णसंभारातून पिवळ्या व लाल शंकराचे तुरे डोकावत ... Read More »