अंगण

शौर्य आणि भक्तीचे संचित : अमृतसर

(पायाला भिंगरी) – सौ. पूर्णिमा केरकर (भाग ३) ते दिवस चैतन्याने भारावलेले होते. देशासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी लोकांनी ठेवली होती. ‘देश हा देव’ आहे अशी भावना बाळगून ‘जिंकू किंवा मरू’ या ध्येय-ध्यासाने भारतीय लोकमानस स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होत होते. स्वातंत्र्यप्रेमी जनतेत पारतंत्र्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली होती. ब्रिटिश सरकारने तेजोभंग करण्यासाठी हर तर्‍हेचे प्रयत्न आरंभले होते. अशाच प्रयत्नांपैकी रौवलेट ... Read More »

विमा उद्योगात थेट परदेशी गुंतवणुकीचा गुंता

– शशांक मो. गुळगुळे विमा उद्योगातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे विधेयक संमत करून घेण्यासाठी सध्या सत्तेवर असलेल्यांची धडपड चालू आहे. अगोदरच्या शासनाला थेट परदेशी गुंतवणुकीसंबंधीची विधेयके संमत करून घेण्यासाठी सध्या सत्तेवर असलेले तेव्हा ते विरोधी पक्षात असताना प्रचंड विरोध करीत होते. लोकसभेवर बहिष्कार टाकत, लोकसभेचे कामकाज ठप्प करत होते, लोकसभेला आखाड्याचे स्वरूप आणत होते. आणि आता ... Read More »

सुतापुनव : एक सांस्कृतिक धारणा!

– विनायक विष्णू खेडेकर श्रावण पौर्णिमा. गोमंतकीय जनजीवनातलं नाव ‘सुतापुनव.’ नव्हे, पुनव कोंकणी नव्हे. लक्षात घेऊया एक नाट्यगीत- ‘उगवला चंद्र पुनवेचा.’ गोव्यातल्या तमामांना सुतापुनव म्हणून ठाऊक असलेला हा दिवस. पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी नारळी पौर्णिमेला- म्हणजे याच दिवशी- समुद्राला नारळ अर्पण करून सुरू होते. त्याचं खवळलेपण कमी झाल्यानंतर पाण्यात होड्या सोडायच्या, त्या मच्छीमार बांधवांसाठी ही नारळी पौर्णिमा. याच दिवसाला आणखी ... Read More »

सौरऊर्जा प्रयोग

– डॉ. प्रमोद पाठक दिवसेंदिवस इंधनाच्या वाढत्या किमती पाहता भारताला राष्ट्रीय स्तरावर पर्यायी ऊर्जा वापरण्याचे धोरण अमलात आणावेच लागेल. आजच्या घटकेला भारतात ज्या ठिकाणी मोकळ्या मैदानी जागा आहेत, तिथे सौर विद्युत ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होते आहे. ज्या ठिकाणी वार्‍याचा वेग एक विशिष्ट मर्यादेच्या वर आहे- जसे तामिळनाडू- तेथे मोठ्या प्रमाणावर वायुविद्युत प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांची क्षमता अक्षरशः हजारो ... Read More »

दार्जिलिंग : रत्नांची भूमी

पायाला भिंगरी (भाग-२) – सौ. पौर्णिमा केरकर हिमालयाच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणांत सम्राज्ञीच्या लौकिकास प्राप्त झालेले दार्जिलिंग पाहण्याचा योग गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आला. भारतीय लोकमानसाची हिमालयाचे भव्यत्व आणि दिव्यत्व अनुभवण्याची ओढ पूर्वीपासूनचीच. मलाही ती होतीच. माझ्यात असलेल्या इच्छेची तृप्ती दार्जिलिंगला गेल्याने पूर्ण झाली. पूर्वेकडचा हिमालय ही भारताची जीवनरेषा. आकाशाशी स्पर्धा करणार्‍या हिमालयाच्या पर्वतरांगा अनुभवताना तना-मनाला आगळावेगळा अनुभव प्राप्त होतो. ... Read More »

कमी किमतीतील घरे!

– शशांक मो. गुळगुळे मानवाच्या ‘शीत, सूत व छत’ या तीन प्रमुख गरजा आहेत. यांपैकी सूत म्हणजे कपडे याबाबतीत भारतात तशी ओरड नाही. अगदी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डपासून ते रस्त्याच्या कडेलाही ज्याला जसे परवडतील तशा दराने कपडे उपलब्ध आहेत. शीत म्हणजे अन्न. याबाबतही विशेष काळजीचे कारण नाही. देशात अन्नधान्य साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अन्न सुरक्षा कायदा, शिधा वाटप विभाग यांच्यामार्फत गरिबांचीही ... Read More »

स्वतःवर जिथं प्रेम आहे, तिथं आत्महत्या कशी?

– डॉ. व्यंकटेश हेगडे श्री. श्री. रविशंकरजींना एकदा विचारलं गेलं, ‘तुमच्याकडे सर्व त्रासांसाठी उत्तर आहे का?’ श्री. श्री. म्हणाले, ‘होय! कारण ९० टक्के त्रास हे मनामुळं असतात; आणि मनाबद्दल जागृती कशी असावी, विचारांचं, भावनांचं आणि ताणतणावांचं व्यवस्थापन कसं करावं ते मी शिकवितो.’ नव्वद टक्के त्रास मनामुळे होतात. आपले मन हे आमच्या जीवनातले एक महत्त्वाचे अंग. एखादी आत्महत्या घडते तेव्हा हे ... Read More »

श्रावणात घननिळा…

– सौ. लक्ष्मी ना. जोग श्रावण! ओला श्रावण! भिजला श्रावण! गहिरा श्रावण! हिरवा श्रावण! आणि खरंच की! सृष्टीला लागलेला पाचवा महिना म्हणजे श्रावण! पहिलटकरणीला पाचवा महिना लागला की तिच्या मुखावरून गर्भतेज निथळू लागते, तशीच या महिन्यात सृष्टीची अनेक रूपे मनमोहित करतात. चैत्र… विंझणवारा घालणारा मधुमास! वैशाख… वणवा पेटवणारा! ज्येष्ठ… मेघगर्जना करत येणारा! आषाढ… मेघमल्हार आळवीत सहस्रधारांनी धरेवर अभिषेक करणारा आणि ... Read More »

सिक्किम : छोटा पण नेटका प्रदेश

– सौ. पौर्णिमा केरकर (भाग-१) प्रवासाची आवड एकदा मनाला लागली की रिकामा वेळ खायला उठतो. दिवाळीची, उन्हाळ्यातली लांबलचक सुट्टी मग वाया घालवावीशी वाटत नाही. अशी एखादी नवी जागा, माणसे, तिथली संस्कृती अनुभवायची, तेथील वैविध्य नजरेने टिपायचे, सौंदर्यांची अनुभूती घ्यायची आणि जगणं समृद्ध करीत जायचे ही सवयच आता मनाला लागलेली आहे. Read More »

मोकळे आकाश धोरणाची ‘सेकंड इनिंग’ यशस्वी होईल?

– शशांक मो. गुळगुळे भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे विमान प्रवास करणार्‍यांची संख्या फार कमी होती. टाटा उद्योग समूहाची प्रवासी विमान वाहतूक कंपनी होती. स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे उद्योग हे शासनानेच चालवावेत असे आपले धोरण होते. परिणामी टाटा उद्योग समूहाची प्रवासी विमान वाहतूक कंपनी शासनाने आपल्या पंखाखाली घेऊन तिचे दोन कंपन्यांत रूपांतर केले. यापैकी एअर इंडिया या कंपनीची विमाने ... Read More »