अंगण

भावगर्भ मंदिरांचे माहेरघर ‘पट्टदकल’

– सौ. पौर्णिमा केरकर  भारतीय स्थापत्त्यकलेच्या इतिहासाला आणि सांस्कृतिक संपदेला विलक्षण कलाटणी देणारी मंदिरे कर्नाटक राज्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाच्या कालखंडात उभी राहिली. भारतीय धर्म आणि संस्कृतीची यशोध्वजा अविरतपणे मनामनांत फडकत राहावी, जीवनाला नवनवीन प्रेरणा लाभावी म्हणून शिल्पकार-कारागिरांनी आपले संपूर्ण कसब पणाला लावून ही मंदिरे उभी केली. कर्नाटकात सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांनी आपल्या आराध्य दैवतांविषयीची भक्ती, प्रेम आणि आदर अभिव्यक्त ... Read More »

भारतीय बाजारपेठांत चांदीचे स्थान

– शशांक मो. गुळगुळे चांदी हा एक धातू असला तरी या धातूला आपल्या व्यवहारात, जीवनचर्येत विशिष्ट स्थान आहे. हिंदुधर्मियांना धार्मिक विधी करतानाही चांदीची भांडी लागतात. सौभाग्यवतींना एकमेकींना हळदकुंकू लावतानाही चांदीचाच करंडा लागतो. ‘ज्यांच्याकडे चांदी जास्त तो श्रीमंत’ असे ब्रिटिश लोकांचे मत आहे. इंग्लिश भाषेत तशी एक म्हणही आहे- ‘इेीप ुळींह ीळर्श्रींशी ीिेेप ळप र्ोीींह.’ एखाद्या माणसाने फार श्रीमंत घरात जन्म ... Read More »

मोदी… नवा शिकंदर?

-ऍड. रमाकांत खलप मनमोहनसिंग यांच्या काळात अवकाशात झेपावलेले मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करीत असतानाच नरेंद्रभाईंचे मोदीयान अमेरिकेला अवतरले. मंगळयानापेक्षाही मोदीयानाचे उड्डाण जास्त लक्षवेधी आणि डोळे दिपावणारे ठरले होतेच. जेमतेम सहा महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावाखाली गुजरातेत अखंड दहा वर्षे राज्य केलेल्या नरेंद्रभाई मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड घोषित केली होती. त्यावेळी भाजपा एक मोठा जुगार खेळतोय ... Read More »

विधानसभेचे कामकाज : जावे आमदाराच्या वंशा, तेव्हा कळे…!

– विष्णू सुर्या वाघ  ( भाग-४) आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मतदार विधानसभेत आमदारांना व लोकसभेत खासदारांना निवडून देतात. मात्र या लोकप्रतिनिधींचे काम नक्की काय असते याची बर्‍याच लोकांना यत्किंचितही कल्पना नसते. खासदारांचे तरी एकवेळ बरे आहे. कारण त्यांचा बहुतांश वेळ दिल्लीत जातो. बिचार्‍या आमदारांना मात्र रोज आपल्या मतदारांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकारची कामे घेऊन लोक आमदाराच्या घरी थडकतात. आमदाराने ... Read More »

राजवाड्यांची नगरी म्हैसूर

– सौ. पौर्णिमा केरकर  नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक वारशासाठी दक्षिण भारतातील कर्नाटक विशेष प्रसिद्ध. भारताच्या इतिहासाचे असंख्य क्षण या राज्याने अनुभवले. दक्षिण भारतात सत्तास्थानी आलेल्या असंख्य राज्यकर्त्यांनी आपल्या खुणा कर्नाटकातल्या इतिहास आणि संस्कृतीवरती कोरलेल्या आहेत. कर्नाटकातील ‘म्हैसूर’ हे जरी आज शहर असले तरी एकेकाळी हे एक संस्थान होते. भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून येथे असलेली संस्थाने खालसा झाली. राजे-सरदार यांची सत्ता लोप पावली. ... Read More »

देशवासीयांपुढे नवे गाजर ‘मेक इन इंडिया’

– शशांक मो. गुळगुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेचा शुभारंभ नुकताच झाला. या योजनेंतर्गत पंतप्रधानांनी ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’चा (एफडीआय) नारा दिला. भारताची क्रयशक्ती वाढविण्यासाठी उद्योगपतींनी प्रयत्न करावयास हवेत, तसेच इतर देशांनी भारताकडे फक्त बाजारपेठ म्हणून बघू नये, असे पंतप्रधानांचे मत आहे. हे अतिशय योग्य मत आहे. Read More »

कोण किती पाण्यात?

– डॉ. कुमार सप्तर्षी स्वबळाच्या खुमखुमीने सर्वच प्रमुख पक्षांची तशीही झोप उडवली होती.आता मात्र खरोखरच तशी संधी सर्वांच्या पुढ्यात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या रणमैदानात स्वबळावर लढण्याची हौस भागवून घेताना प्रथम आहे त्या जागा राखण्याचे व पुढे जाऊन त्यात नवी भर घालण्याचे अवघड आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. लोकसभेतील अभूतपूर्व यशामुळे भाजपला स्वबळातूनच आपली प्रतिष्ठा राखण्याचे मोठे आव्हान असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्‍चात ... Read More »

कविताव्रती प्रा. शंकर वैद्य : काही संस्मरणे

– डॉ. सोमनाथ कोमरपंत नुकतेच मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी प्रा. शंकर वैद्यसर यांचे पहाटे ४.३० वा. निधन झाले. मराठी साहित्यसृष्टीतील मूर्तिमंत चैतन्य हरपले. ८६ वर्षांचे अभिरुचिसंपन्न आणि परिपूर्ण जीवन प्रा. वैद्यसर जगले. वाङ्‌मयीन संस्कृतीवर निस्सीम प्रेम करणारा त्यांच्यासारखा व्यासंगी प्राध्यापक आपल्यातून निघून जाणे ही क्लेशदायक बाब आहे. साहित्यसृष्टीतील एक एक दिग्गज निघून जाताना प्रा. वैद्यसरांनी लौकिक जगाचा निरोप घेतला. ... Read More »

विधानसभेचे कामकाज-आमदारांचे विशेषाधिकार, हक्कभंग आणि विधानसभेचा अवमान

– विष्णू सुर्या वाघ (भाग-३) विधानसभेच्या सर्व सदस्यांना घटनेने काही विशेष अधिकार दिलेले आहेत. विधानसभेने एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही काही विशेषाधिकार प्रदान केलेले असतात. या अधिकारांच्या आड येईल असे वक्तव्य अथवा वर्तन कोणत्याही तिर्‍हाईत व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या गटाला करता येत नाही. तसे केल्यास तो हक्कभंगाचा विषय ठरू शकतो. Read More »

विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान यांचा साक्षात्कार घडविणारे दक्षिणेश्‍वर मंदिर

– सौ. पौर्णिमा केरकर खादा प्रदेश, परिसर पाहण्याची मनाची ओढ ही प्रत्येक वेळी निसर्गसंपन्नच परिसराची असेल असे नाही. अशा अनेक जागा आहेत की ज्यांना वैचारिक उंची प्राप्त झालेली आहे. आत्मा आणि परमात्मा यांतील संबंध दर्शविणार्‍या अंतिम सत्याच्या साक्षात्काराने जी माती पुनीत झालेली आहे, इतिहास साक्षी असलेल्या अनेक वास्तूंनी ज्या प्रदेशाचे सौंदर्य खुलविले आहे, असा प्रदेश ज्याला शक्तिपीठ मानले जाते- ते ... Read More »