अंगण

विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान यांचा साक्षात्कार घडविणारे दक्षिणेश्‍वर मंदिर

– सौ. पौर्णिमा केरकर खादा प्रदेश, परिसर पाहण्याची मनाची ओढ ही प्रत्येक वेळी निसर्गसंपन्नच परिसराची असेल असे नाही. अशा अनेक जागा आहेत की ज्यांना वैचारिक उंची प्राप्त झालेली आहे. आत्मा आणि परमात्मा यांतील संबंध दर्शविणार्‍या अंतिम सत्याच्या साक्षात्काराने जी माती पुनीत झालेली आहे, इतिहास साक्षी असलेल्या अनेक वास्तूंनी ज्या प्रदेशाचे सौंदर्य खुलविले आहे, असा प्रदेश ज्याला शक्तिपीठ मानले जाते- ते ... Read More »

आरोग्य क्षेत्राचे बिघडलेले आरोग्य

– शशांक मो. गुळगुळे  आरोग्य खाते हे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे या दोघांच्याही आधिपत्याखाली येते. पण दुर्दैवाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे जनतेच्या आरोग्याची हवी तितकी काळजी घेताना दिसत नाहीत. याला अपवाद फक्त तामिळनाडू राज्य सरकार. येथे औषध खरेदी व वितरणाची उत्तम योजना राबवली जात असून, परिणामी येथील नागरिकांना कमी दरात औषधे मिळतात. आपण ‘जीडीपी’च्या ४ टक्के निधीच आरोग्यावर ... Read More »

विधानसभेचे कामकाज प्रश्‍नोपनिषद ते शून्य प्रहर

– विष्णू सुर्या वाघ प्रश्‍नोत्तराच्या तासाची प्रक्रिया कशी चालते ते आपण पाहिले. प्रत्येक सदस्याला त्या दिवसांसाठी नेमून दिलेल्या खात्यांसंदर्भात तीन तारांकित आणि पंधरा अतारांकित प्रश्‍न विचारता येतात. पण त्याने विचारलेले सर्वच प्रश्‍न स्वीकारले जातील याची मात्र खात्री देता येत नाही. प्रश्‍नांची निवड करण्याचा अंतिम अधिकार सभापतींचा असतो. त्यासाठी विधानसभेच्या कामकाज नियमावलीत काही निकष आखून दिले आहेत. सार्वजनिक महत्त्वाच्या अथवा प्रशासकीय ... Read More »

चला! रस्त्यावर शिस्त आणू!!

– गुरुनाथ केळेकर गोव्याचा वाहतूक प्रश्‍न हेल्मेटपुरता आता मर्यादित राहिलेला नाही. या प्रश्‍नावर सर्वंकष विचार झाला पाहिजे. आपल्यापुढे दोन प्रश्‍न आहेत. एक- रस्त्यांवरील बेशिस्त आणि दुसरा- रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यू. रस्त्यावरील बेशिस्तीला सरकारचे कायदेकानून वापरून थोडेसे नियंत्रण आणता येईल; परंतु अपघात व मृत्यू यासाठी खास तंत्र वापरावे लागेल. नियतीने आपणास दोन पाय दिलेले आहेत. तिला हवे असते तर पायांच्या जागी ... Read More »

ऋणानुबंध ‘वाळुंज’चे

– सौ. पौर्णिमा केरकर प्रवासाची आवड एकदा का मनीमानसी भिनली की पावले आपोआपच वाट चालू लागतात. प्रवासाचे असे एक व्यसनच मनाला जडते आणि मग ओढ लागते वेगळ्या प्रदेशाची, तिथल्या संस्कृतीची आणि माणसामाणसांमधील वैविध्य अनुभवण्याचीसुद्धा. या भटकंतीत फक्त स्थळांचे, निसर्गाचेच सौंदर्य प्राशून घ्यायचे अशी चौकट काही घालून घेतलेली नाही. त्यामुळे इतिहास, संस्कृती, परंपरा समजून घेण्यासाठी केलेला प्रवास माणसाविषयी जाणून घेण्याच्या कुतूहलाने ... Read More »

प्रधानमंत्री जन-धन योजना २०१४

– शशांक मो. गुळगुळे बँकांच्या राष्ट्रीयीकरणापूर्वी बँकांचा व सामान्य जनतेचा बराच कमी संबंध होता. त्यावेळी काही विशिष्ट वर्गातील माणसेच बँकिंग व्यवहार करीत असत. राष्ट्रीयीकरणानंतर किंवा काही बँका सार्वजनिक उद्योगात आल्यानंतर, बँका तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून बरेच प्रयत्न झाले. पण आपल्या देशाचा एवढा अक्राळविक्राळ आकार व एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेली लोकसंख्या यामुळे वर्षानुवर्षे बँकांची तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया चालूच राहिली आहे. Read More »

‘नंदनवना’तील प्रकोप

– अजय तिवारी आभाळ फाटल्याचा अनुभव सध्या जम्मू-काश्मीरमध्ये येत आहे.सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. गावच्या गावं महापुरानं वाहून गेली. भारतीय नागरिकांना पाकिस्तानमध्ये नेण्यात तेथील लष्करालाही आतापर्यंत यश आलं नाही, परंतु निसर्गानं तो चमत्कारही करून दाखवला.जम्मू-काश्मीरमध्ये उगम पावलेल्या नद्यांनी काही गावं, त्यातील घरंदारं, माणसं थेट पाकिस्तानात वाहून नेली. सलग चार-पाच दिवस पाऊस कोसळत राहिला. त्यामुळे प्रचंड नुकसानी झाली. Read More »

कसे चालते विधानसभेचे कामकाज?

– विष्णू सुर्या वाघ (पूर्वार्ध) ‘काय वाघसाहेब, बरेच दिवस तुमचं दर्शन नाही?’ ‘‘नवप्रभा’तलं सदर बंद केलंत की काय तुम्ही?’ ‘लेखन संन्यास वगैरे घेतलाय का?’ ‘दर रविवारी वाट बघत बसतो आम्ही, आणि तुमचा तर पत्ताच नाही?’ जवळ जवळ एक महिना होत आला, रोज अशा प्रश्‍नांची सरबत्ती मी झेलतो आहे. सण, समारंभ, कार्यक्रमाला कुठंही गेलो की वाचक हमखास भेटतात. ‘या रविवारी तुमचं ... Read More »

चालुक्याची राजधानी : बदामी

– सौ. पौर्णिमा केरकर पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मनाला भुलविणार्‍या एकाहून एक सरस सुंदर पर्यटनस्थळांनी नटलेले राज्य म्हणजे कर्नाटक. या राज्यातील सौंदर्यस्थळे टिपण्यासाठी आयुष्यही अपुरे पडेल. म्हैसूरसारखी कर्नाटकाची सांस्कृतिक राजधानी असो, नाहीतर औद्योगिकीकरणात अग्रेसर असूनही नेटकेपणा, नैसर्गिक अधिष्ठान लाभलेली बेंगलोरसारखी राज्याची राजधानी असो- कुठल्याही ऋतूत अगदी सहजपणे ज्या जागेवर वर्षभर पर्यटनासाठी जावे ती जागा म्हणजे अर्थातच कर्नाटकच! Read More »

उत्कृष्ट शिक्षक : एक चिंतन

– गजानन हरिश्‍चंद्र मांद्रेकर उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य हे शिक्षणाशी व विद्यार्थ्याशी जोडलेले आहे. शिक्षक आणि शिक्षण हे हातात हात घालून चालत असते. शिक्षणातून काय साध्य करायचे आहे हे ध्यानी घेतल्याशिवाय कुठलाही शिक्षक उत्कृष्टतेकडे वाटचाल करू शकणार नाही. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा विकास कसा होतो ... Read More »