अंगण

गणेश चतुर्थी विशेष – मोदे भरिले मोदक

– संकलन : सौ. अनुजा अ. पंडित गणेशचतुर्थी हा आपल्याकडे मांगल्याने नटलेला, प्रचंड उत्साहाने भरलेला दिवस असतो. या दिवशी अनेक घरांतून मांगल्याचे साक्षात प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना वा पूजा होते. कुणाकडे गणपती दीड दिवस असतो तर कुणाकडे पाच दिवस, नऊ, अकरा किंवा एकवीस दिवसांचासुद्धा असतो. घरोघरी उत्साहाचं वातावरण असतं. घरातील लहान मुलं व मोठी माणसं एकत्र येऊन सजावट करतात. हा ... Read More »

गणेश चतुर्थी विशेष – देवा, तूचि विद्याधरा…

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट मनभावन श्रावण आणि सृष्टीच्या समृद्धीचा सरताज म्हणजे भाद्रपद. या दोन्ही महिन्यांचा आनंददायी कालखंड म्हणजे वर्षाऋतू. ज्येष्ठ आणि आषाढ मासांत अविरत बरसणार्‍या पर्जन्यधारांनी न्हाऊन निघालेली सृष्टी तृप्तीच्या हिरव्याकंच वैभवलेण्याने सजून दिमाखात मिरवत असते. चैतन्याचा दरवळच जणू सृष्टीच्या रोमारोमांतून नित्य अनुभवास येत असतो. प्राणिमात्रही या चैतन्याच्या संजीवक स्पर्शाने आनंदविभोर मनःस्थितीत असतात. Read More »

गणेश चतुर्थी विशेष – विघ्नराजं नमामि|

 – लक्ष्मण कृष्ण पित्रे आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीला, विशेषतः हिंदूंच्या धार्मिक जीवनाला व्यापून राहिलेली अशी लोकप्रिय देवता म्हणजे गणपती होय. आपल्या धार्मिक धारणेनुसार हा देव मंगलाचा अधिष्ठाता आहे, सर्व विद्यांचे निवासस्थान आहे, तसेच सर्व कलांचा प्रेरणास्रोत आहे. तो विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ताही आहे, म्हणजेच विघ्ननियंता आहे. त्याच्या स्मरणाने विघ्नांचा परिहार होऊन कोणतेही कार्य सुरळीतपणे पूर्ण होते. त्यामुळेच कोणत्याही कार्याच्या आरंभी त्याचे ... Read More »

भारतीय भक्तिसंस्कृतीचा अनभिषिक्त सम्राट : भगवान श्रीकृष्ण

– डॉ. पांडुरंग फळदेसाई श्रीकृष्ण ही भारतीयांची आवडती विभूती. खरे तर प्रभू रामासारखा कृष्ण हा श्रीविष्णूचा अवतार; परंतु भारतीय जनमानसाला तो आपल्या कुटुंबाचाच एक घटक वाटतो, इतकी कृष्णचरित्राची विलक्षण आणि अवीट मोहिनी भारतीय लोकमानसावर आहे. श्रीकृष्णाविषयीच्या विविध कथा, भारतीय साहित्यातील कृष्णकाव्ये आणि कृष्णगीते, प्रांताप्रांतांतील कृष्णविषयक विविध चित्र-शिल्प शैली, त्याची देशभर असलेली मंदिरे यांचा विचार केला म्हणजे श्रीकृष्णाविषयीच्या प्रेमाची, भक्तीची आणि ... Read More »

व्हाईट वॉटर राफ्टिंग : साहसी पर्यटनाचा नवा अध्याय

– दीपक कृष्णा नार्वेकर निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेल्या गोव्याला देश-विदेशांतील लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. इथले रमणीय सोनेरी वाळूचे किनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आलेले आहेत. आता त्याला जोडूनच साहस आणि निसर्ग-पर्यटनाला सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जाऊ लागल्याने पर्यटकांना नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. म्हादईच्या खोर्‍यातील व्हाईट वॉटर राफ्टिंग हा त्यातीलच एक. Read More »

शौर्य आणि भक्तीचे संचित : अमृतसर

(पायाला भिंगरी) – सौ. पूर्णिमा केरकर (भाग ३) ते दिवस चैतन्याने भारावलेले होते. देशासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी लोकांनी ठेवली होती. ‘देश हा देव’ आहे अशी भावना बाळगून ‘जिंकू किंवा मरू’ या ध्येय-ध्यासाने भारतीय लोकमानस स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होत होते. स्वातंत्र्यप्रेमी जनतेत पारतंत्र्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली होती. ब्रिटिश सरकारने तेजोभंग करण्यासाठी हर तर्‍हेचे प्रयत्न आरंभले होते. अशाच प्रयत्नांपैकी रौवलेट ... Read More »

विमा उद्योगात थेट परदेशी गुंतवणुकीचा गुंता

– शशांक मो. गुळगुळे विमा उद्योगातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे विधेयक संमत करून घेण्यासाठी सध्या सत्तेवर असलेल्यांची धडपड चालू आहे. अगोदरच्या शासनाला थेट परदेशी गुंतवणुकीसंबंधीची विधेयके संमत करून घेण्यासाठी सध्या सत्तेवर असलेले तेव्हा ते विरोधी पक्षात असताना प्रचंड विरोध करीत होते. लोकसभेवर बहिष्कार टाकत, लोकसभेचे कामकाज ठप्प करत होते, लोकसभेला आखाड्याचे स्वरूप आणत होते. आणि आता ... Read More »

सुतापुनव : एक सांस्कृतिक धारणा!

– विनायक विष्णू खेडेकर श्रावण पौर्णिमा. गोमंतकीय जनजीवनातलं नाव ‘सुतापुनव.’ नव्हे, पुनव कोंकणी नव्हे. लक्षात घेऊया एक नाट्यगीत- ‘उगवला चंद्र पुनवेचा.’ गोव्यातल्या तमामांना सुतापुनव म्हणून ठाऊक असलेला हा दिवस. पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी नारळी पौर्णिमेला- म्हणजे याच दिवशी- समुद्राला नारळ अर्पण करून सुरू होते. त्याचं खवळलेपण कमी झाल्यानंतर पाण्यात होड्या सोडायच्या, त्या मच्छीमार बांधवांसाठी ही नारळी पौर्णिमा. याच दिवसाला आणखी ... Read More »

सौरऊर्जा प्रयोग

– डॉ. प्रमोद पाठक दिवसेंदिवस इंधनाच्या वाढत्या किमती पाहता भारताला राष्ट्रीय स्तरावर पर्यायी ऊर्जा वापरण्याचे धोरण अमलात आणावेच लागेल. आजच्या घटकेला भारतात ज्या ठिकाणी मोकळ्या मैदानी जागा आहेत, तिथे सौर विद्युत ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होते आहे. ज्या ठिकाणी वार्‍याचा वेग एक विशिष्ट मर्यादेच्या वर आहे- जसे तामिळनाडू- तेथे मोठ्या प्रमाणावर वायुविद्युत प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांची क्षमता अक्षरशः हजारो ... Read More »

दार्जिलिंग : रत्नांची भूमी

पायाला भिंगरी (भाग-२) – सौ. पौर्णिमा केरकर हिमालयाच्या डोंगरमाथ्यावर वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणांत सम्राज्ञीच्या लौकिकास प्राप्त झालेले दार्जिलिंग पाहण्याचा योग गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आला. भारतीय लोकमानसाची हिमालयाचे भव्यत्व आणि दिव्यत्व अनुभवण्याची ओढ पूर्वीपासूनचीच. मलाही ती होतीच. माझ्यात असलेल्या इच्छेची तृप्ती दार्जिलिंगला गेल्याने पूर्ण झाली. पूर्वेकडचा हिमालय ही भारताची जीवनरेषा. आकाशाशी स्पर्धा करणार्‍या हिमालयाच्या पर्वतरांगा अनुभवताना तना-मनाला आगळावेगळा अनुभव प्राप्त होतो. ... Read More »