अंगण

पाकिस्तान युद्धाचे साहस करील काय?

– दत्ता भि. नाईक गेल्या ऑगस्ट महिन्यात ‘हुर्रियत’ या जम्मू-काश्मीरमधील विभाजनवादी संघटनेचा नेता शबीर शहा याने दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्तांची भेट घेतली. पाकिस्तानी उच्चायुक्त बशीर अली यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याची सारवासारव केली असली तरी एका देशविरोधी काम करणार्‍या संघटनेच्या प्रमुखाने परदेशी राजदूताला भेटणे व तेही या कारवायांना खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानसारख्या राष्ट्राच्या उच्चायुक्ताला, ही साधी गोष्ट नव्हती. याचा परिणाम म्हणून ... Read More »

धावा धावा… कोण पुढे धावणार?

– हेमंत देसाई महाराष्ट्रातील या वेळच्या विधानसभा निवडणुकीतील पंचरंगी लढतीचे निष्कर्ष जाहीर होण्यास केवळ काही दिवसांचा अवधी आहे. या लढतीनंतर भाजपा पुढे असेल की कॉंग्रेस आणि शिवसेना, राष्ट्रवादीची स्थिती काय असेल याबद्दल आपण केवळ अंदाज बांधू शकतो. नुकत्याच समोर आलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षात बहुतेकांनी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात शेवटच्या दिवशी चित्र पालटूही शकते. ... Read More »

फालेरोंसमोर पक्षसंघटना बळकटीचे आव्हान!

– गुरुदास सावळ पहिल्या दिवसापासून वादग्रस्त ठरलेले गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांचा आदेश शिरसावंद्य मानून आपण ही कठीण जबाबदारी स्वीकारल्याचे फालेरो सांगत आहेत. अर्थात सुभाष शिरोडकर यांनी विधानसभा निवडणूक निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केल्यावर ... Read More »

विधानसभेचे कामकाज- विधिकार्य आणि अर्थसंकल्पीय कामकाज

– विष्णू सुर्या वाघ (भाग-५) आमदाराला इंग्रजीत ‘लेजिस्लेटर’ म्हणतात. लेजिस्लेटर म्हणजे कायदे करणारा. त्याला ‘विधिकार’ म्हणण्याचीही प्रथा आहे. ‘लेजिस्लेशन’ म्हणजे कायदे (तयार) करण्याची प्रक्रिया. त्याला संक्षेपाने मराठीत ‘विधिकार्य’ म्हणता येईल. आमदाराने काय करावे याबाबत जनतेच्या कितीही अपेक्षा असल्या तरी ‘विधिकार्य’ हेच आमदाराचे प्रमुख कर्तव्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. Read More »

भावगर्भ मंदिरांचे माहेरघर ‘पट्टदकल’

– सौ. पौर्णिमा केरकर  भारतीय स्थापत्त्यकलेच्या इतिहासाला आणि सांस्कृतिक संपदेला विलक्षण कलाटणी देणारी मंदिरे कर्नाटक राज्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाच्या कालखंडात उभी राहिली. भारतीय धर्म आणि संस्कृतीची यशोध्वजा अविरतपणे मनामनांत फडकत राहावी, जीवनाला नवनवीन प्रेरणा लाभावी म्हणून शिल्पकार-कारागिरांनी आपले संपूर्ण कसब पणाला लावून ही मंदिरे उभी केली. कर्नाटकात सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांनी आपल्या आराध्य दैवतांविषयीची भक्ती, प्रेम आणि आदर अभिव्यक्त ... Read More »

भारतीय बाजारपेठांत चांदीचे स्थान

– शशांक मो. गुळगुळे चांदी हा एक धातू असला तरी या धातूला आपल्या व्यवहारात, जीवनचर्येत विशिष्ट स्थान आहे. हिंदुधर्मियांना धार्मिक विधी करतानाही चांदीची भांडी लागतात. सौभाग्यवतींना एकमेकींना हळदकुंकू लावतानाही चांदीचाच करंडा लागतो. ‘ज्यांच्याकडे चांदी जास्त तो श्रीमंत’ असे ब्रिटिश लोकांचे मत आहे. इंग्लिश भाषेत तशी एक म्हणही आहे- ‘इेीप ुळींह ीळर्श्रींशी ीिेेप ळप र्ोीींह.’ एखाद्या माणसाने फार श्रीमंत घरात जन्म ... Read More »

मोदी… नवा शिकंदर?

-ऍड. रमाकांत खलप मनमोहनसिंग यांच्या काळात अवकाशात झेपावलेले मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करीत असतानाच नरेंद्रभाईंचे मोदीयान अमेरिकेला अवतरले. मंगळयानापेक्षाही मोदीयानाचे उड्डाण जास्त लक्षवेधी आणि डोळे दिपावणारे ठरले होतेच. जेमतेम सहा महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावाखाली गुजरातेत अखंड दहा वर्षे राज्य केलेल्या नरेंद्रभाई मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड घोषित केली होती. त्यावेळी भाजपा एक मोठा जुगार खेळतोय ... Read More »

विधानसभेचे कामकाज : जावे आमदाराच्या वंशा, तेव्हा कळे…!

– विष्णू सुर्या वाघ  ( भाग-४) आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मतदार विधानसभेत आमदारांना व लोकसभेत खासदारांना निवडून देतात. मात्र या लोकप्रतिनिधींचे काम नक्की काय असते याची बर्‍याच लोकांना यत्किंचितही कल्पना नसते. खासदारांचे तरी एकवेळ बरे आहे. कारण त्यांचा बहुतांश वेळ दिल्लीत जातो. बिचार्‍या आमदारांना मात्र रोज आपल्या मतदारांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकारची कामे घेऊन लोक आमदाराच्या घरी थडकतात. आमदाराने ... Read More »

राजवाड्यांची नगरी म्हैसूर

– सौ. पौर्णिमा केरकर  नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक वारशासाठी दक्षिण भारतातील कर्नाटक विशेष प्रसिद्ध. भारताच्या इतिहासाचे असंख्य क्षण या राज्याने अनुभवले. दक्षिण भारतात सत्तास्थानी आलेल्या असंख्य राज्यकर्त्यांनी आपल्या खुणा कर्नाटकातल्या इतिहास आणि संस्कृतीवरती कोरलेल्या आहेत. कर्नाटकातील ‘म्हैसूर’ हे जरी आज शहर असले तरी एकेकाळी हे एक संस्थान होते. भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून येथे असलेली संस्थाने खालसा झाली. राजे-सरदार यांची सत्ता लोप पावली. ... Read More »

देशवासीयांपुढे नवे गाजर ‘मेक इन इंडिया’

– शशांक मो. गुळगुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेचा शुभारंभ नुकताच झाला. या योजनेंतर्गत पंतप्रधानांनी ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’चा (एफडीआय) नारा दिला. भारताची क्रयशक्ती वाढविण्यासाठी उद्योगपतींनी प्रयत्न करावयास हवेत, तसेच इतर देशांनी भारताकडे फक्त बाजारपेठ म्हणून बघू नये, असे पंतप्रधानांचे मत आहे. हे अतिशय योग्य मत आहे. Read More »