अंगण

अट्टहासामुळे सेना-राष्ट्रवादी तोंडघशी!

– अभय अरविंद शिवसेना आणि भाजप हे दोन मित्रपक्ष. त्यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावर होती. लोकसभेत भाजपा हा मोठा पक्ष तर शिवसेना हा लहान पक्ष; आणि महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना हा मोठा पक्ष तर भाजपा हा लहान पक्ष असा अलिखित संकेत होता. शिवसेना हा मोठा पक्ष होता, तरी कमी जागा मिळूनही भाजपाच्या यशाचा ‘स्ट्राईक रेट’ जास्त होता. तरीही शिवसेनेमागे भाजपाची ङ्गरङ्गट होत ... Read More »

खटलेही जलद निकाली निघणे गरजेचे

– गुरुदास सावळ गोवा विधानसभेने अलीकडेच संमत केलेल्या कूळ कायदा आणि मुंडकार कायदा दुरुस्तीमुळे गोव्यातील कूळ आणि मुंडकारांमध्ये असंतोष पसरला आहे. गोव्यातील अनुसूचित जमातींच्या हितासाठी लढणार्‍या ‘उटा’ या संघटनेनेही या कायदा दुरुस्तीला आक्षेप घेणारे निवेदन राज्यपालांना सादर केले आहे. राज्यपालांनी या कायद्याला आधीच मान्यता दिलेली असल्याने राज्यपाल त्या कायद्याविषयी आता काहीही करू शकणार नाहीत. त्यामुळे राज्यपालांना निवेदन सादर करण्यामागचा उद्देश ... Read More »

विधानसभेचे कामकाज – खासदार-आमदारांसाठी आचारसंहिता असावी का?

– विष्णू सुर्या वाघ (भाग-७) भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. या काळात एकूण १६ लोकसभा अस्तित्वात आल्या. १९५६ साली देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि नवी राज्ये अस्तित्वात आली. कालांतराने काही संघप्रदेशांचे राज्यात रूपांतर झाले. नंतर काही विशाल राज्यांचे विभाजन होऊन झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढसारखी राज्ये निर्माण झाली. अगदी अलीकडे जुन्या आंध्रप्रदेशपासून तेलंगण व सीमांध्र ही दोन राज्ये अस्तित्वात आली. केंद्रात ... Read More »

अहिल्याबाई होळकरांची स्मृती जागवणारे : माहेश्‍वर

– सौ. पौर्णिमा केरकर भारत देशाचे हृदय असेच ज्याला संबोधले जाते तो प्रदेश म्हणजे मध्य प्रदेश. नैसर्गिक प्रसन्नता, वैभवशाली इतिहास, वन्य प्राणिजीवन, वास्तुशिल्पकला, डोंगराळ प्रदेशातील दाट जंगल, कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण मंदिरे, बौद्ध धर्मीयांची पवित्र स्थाने, एकापेक्षा एक सरस शिल्पमंदिरे यांनी हा प्रदेश एवढा समृद्ध आणि दिमाखदार स्वरूपात आपल्यासमोर येतो की त्या प्रदेशाचा दिमाख आणि लावण्य एकदा तरी अनुभवायलाच हवे हा ... Read More »

डिझेल नियंत्रणमुक्त काय साध्य होणार?

– शशांक मो. गुळगुळे या अगोदर पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते, आता डिझेल नियंत्रणमुक्त करण्यात आले. पण याने काय साध्य होणार? याचा भारतीय जनतेला काय फायदा होणार? तेल कंपन्या ज्या प्रामुख्याने सार्वजनिक उद्योगात आहेत त्यांना काय फायदा होणार? भारतीय अर्थव्यवस्थेला याचा काय फायदा होणार? असे प्रश्‍न बर्‍याच लोकांच्या मनात निर्माण होत असतील. या निर्णयामुळे होणार असलेल्या परिणामांचा विचार या लेखात केला ... Read More »

दीपावली उत्सव

– लक्ष्मण कृष्ण पित्रे दीपावली हा उत्सव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्त्वाचा उत्सव आहे. तेजस या तत्त्वाची उपासना हे या उत्सवाचे मूलसूत्र. त्या तत्त्वात माणसाला आदिमकाली देवत्वाचा साक्षात्कार झाला. इतर पंचमहाभूतांप्रमाणेच या तत्त्वाचीही संहारक आणि उपकारक अशी दोन रूपे मानवाला दिसली. दिसेल ते स्वाहा करणारे वणव्यासारखे अग्निरूप हे त्या तत्त्वाचे संहारक रूप, तर आपणास ऊर्जा आणि प्रकाश देणारे दीपरूप हे ... Read More »

पक्षसंघटना मजबुतीसाठी फालेरोंची धडपड

– गुरुदास सावळ कॉंग्रेस भवनासमोरील एका खुल्या हॉटेलात झालेल्या एका शानदार सोहळ्यात विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी लुईझिन फालेरो यांना अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. मावळते अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी ही सूत्रे प्रदान केली असती तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते. पण ज्या पद्धतीने जॉन यांची उचलबांगडी करण्यात आली ते पाहता ते या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. Read More »

विधानसभेचे कामकाज  – सभागृह समित्या रचना आणि बलस्थाने

– विष्णू सुर्या वाघ (भाग-६) विधानसभेपुढे विचारार्थ आलेल्या एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी किंवा विशिष्ट विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी काही समित्या नियुक्त करण्याचा अधिकार विधानसभेला असतो. यातल्या काही समित्या स्थायी स्वरूपाच्या असतात तर काही अस्थायी असतात. नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात सभापती काही समित्यांची स्थापना करतात. त्यानंतर आवश्यकतेनुसार किंवा एक वर्षाच्या कालावधीने समित्यांची पुनर्रचना करण्यात येते. विधानसभेने नियुक्त केलेल्या समित्यांना काही ... Read More »

भारताचे स्वित्झरलँड : डलहौसी – खज्जियार

– सौ. पौर्णिमा केरकर देवभूमी हिमाचल प्रदेशाचा प्रवास हा नेहमीच भव्यत्व व दिव्यत्वाचा साक्षात्कार घडविणारा ठरतो. आकाशाशी स्पर्धा करू पाहणार्‍या देवदार वृक्षांनी व्यापलेले आणि एकमेकांत समरस होऊन आपल्या सदासतेज अस्तित्वाने या भूमीत येणार्‍या तमाम पर्यटकांना आपल्यासमोर नतमस्तक व्हायला लावणारे डोंगर म्हणजे आपल्या देशाचे वैभवच आहे. या हिरव्या चैतन्याला पार्श्‍वभूमी लाभलेली आहे चकाकणार्‍या हिमशिखरांची. इथले लोकजीवन पर्वतशिखरांच्या चढ-उतारांशीच जोडले गेले आहे, ... Read More »

सतत मागणी असलेला धातू : सोने

– शशांक मो. गुळगुळे ज्या देशाची आयातीपेक्षा निर्यात जास्त असते तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो, पण भारताची मात्र निर्यातीपेक्षा आयात जास्त असते. याचे कारण आपला देश इंधन व सोने यांची फार मोठ्या प्रमाणावर आयात करतो. भारतात वाहनांची संख्या भरमसाठ आहे. एका कुटुंबात दोन-दोन, तीन-तीन वाहने असतात. त्याप्रमाणात आपल्या देशात पेट्रोल उत्पादित होत नाही. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पेट्रोलची आयात करावी ... Read More »