ब्रेकिंग न्यूज़

अंगण

देशवासीयांपुढे नवे गाजर ‘मेक इन इंडिया’

– शशांक मो. गुळगुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेचा शुभारंभ नुकताच झाला. या योजनेंतर्गत पंतप्रधानांनी ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’चा (एफडीआय) नारा दिला. भारताची क्रयशक्ती वाढविण्यासाठी उद्योगपतींनी प्रयत्न करावयास हवेत, तसेच इतर देशांनी भारताकडे फक्त बाजारपेठ म्हणून बघू नये, असे पंतप्रधानांचे मत आहे. हे अतिशय योग्य मत आहे. Read More »

कोण किती पाण्यात?

– डॉ. कुमार सप्तर्षी स्वबळाच्या खुमखुमीने सर्वच प्रमुख पक्षांची तशीही झोप उडवली होती.आता मात्र खरोखरच तशी संधी सर्वांच्या पुढ्यात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या रणमैदानात स्वबळावर लढण्याची हौस भागवून घेताना प्रथम आहे त्या जागा राखण्याचे व पुढे जाऊन त्यात नवी भर घालण्याचे अवघड आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. लोकसभेतील अभूतपूर्व यशामुळे भाजपला स्वबळातूनच आपली प्रतिष्ठा राखण्याचे मोठे आव्हान असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्‍चात ... Read More »

कविताव्रती प्रा. शंकर वैद्य : काही संस्मरणे

– डॉ. सोमनाथ कोमरपंत नुकतेच मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी प्रा. शंकर वैद्यसर यांचे पहाटे ४.३० वा. निधन झाले. मराठी साहित्यसृष्टीतील मूर्तिमंत चैतन्य हरपले. ८६ वर्षांचे अभिरुचिसंपन्न आणि परिपूर्ण जीवन प्रा. वैद्यसर जगले. वाङ्‌मयीन संस्कृतीवर निस्सीम प्रेम करणारा त्यांच्यासारखा व्यासंगी प्राध्यापक आपल्यातून निघून जाणे ही क्लेशदायक बाब आहे. साहित्यसृष्टीतील एक एक दिग्गज निघून जाताना प्रा. वैद्यसरांनी लौकिक जगाचा निरोप घेतला. ... Read More »

विधानसभेचे कामकाज-आमदारांचे विशेषाधिकार, हक्कभंग आणि विधानसभेचा अवमान

– विष्णू सुर्या वाघ (भाग-३) विधानसभेच्या सर्व सदस्यांना घटनेने काही विशेष अधिकार दिलेले आहेत. विधानसभेने एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही काही विशेषाधिकार प्रदान केलेले असतात. या अधिकारांच्या आड येईल असे वक्तव्य अथवा वर्तन कोणत्याही तिर्‍हाईत व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या गटाला करता येत नाही. तसे केल्यास तो हक्कभंगाचा विषय ठरू शकतो. Read More »

विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान यांचा साक्षात्कार घडविणारे दक्षिणेश्‍वर मंदिर

– सौ. पौर्णिमा केरकर खादा प्रदेश, परिसर पाहण्याची मनाची ओढ ही प्रत्येक वेळी निसर्गसंपन्नच परिसराची असेल असे नाही. अशा अनेक जागा आहेत की ज्यांना वैचारिक उंची प्राप्त झालेली आहे. आत्मा आणि परमात्मा यांतील संबंध दर्शविणार्‍या अंतिम सत्याच्या साक्षात्काराने जी माती पुनीत झालेली आहे, इतिहास साक्षी असलेल्या अनेक वास्तूंनी ज्या प्रदेशाचे सौंदर्य खुलविले आहे, असा प्रदेश ज्याला शक्तिपीठ मानले जाते- ते ... Read More »

आरोग्य क्षेत्राचे बिघडलेले आरोग्य

– शशांक मो. गुळगुळे  आरोग्य खाते हे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे या दोघांच्याही आधिपत्याखाली येते. पण दुर्दैवाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे जनतेच्या आरोग्याची हवी तितकी काळजी घेताना दिसत नाहीत. याला अपवाद फक्त तामिळनाडू राज्य सरकार. येथे औषध खरेदी व वितरणाची उत्तम योजना राबवली जात असून, परिणामी येथील नागरिकांना कमी दरात औषधे मिळतात. आपण ‘जीडीपी’च्या ४ टक्के निधीच आरोग्यावर ... Read More »

विधानसभेचे कामकाज प्रश्‍नोपनिषद ते शून्य प्रहर

– विष्णू सुर्या वाघ प्रश्‍नोत्तराच्या तासाची प्रक्रिया कशी चालते ते आपण पाहिले. प्रत्येक सदस्याला त्या दिवसांसाठी नेमून दिलेल्या खात्यांसंदर्भात तीन तारांकित आणि पंधरा अतारांकित प्रश्‍न विचारता येतात. पण त्याने विचारलेले सर्वच प्रश्‍न स्वीकारले जातील याची मात्र खात्री देता येत नाही. प्रश्‍नांची निवड करण्याचा अंतिम अधिकार सभापतींचा असतो. त्यासाठी विधानसभेच्या कामकाज नियमावलीत काही निकष आखून दिले आहेत. सार्वजनिक महत्त्वाच्या अथवा प्रशासकीय ... Read More »

चला! रस्त्यावर शिस्त आणू!!

– गुरुनाथ केळेकर गोव्याचा वाहतूक प्रश्‍न हेल्मेटपुरता आता मर्यादित राहिलेला नाही. या प्रश्‍नावर सर्वंकष विचार झाला पाहिजे. आपल्यापुढे दोन प्रश्‍न आहेत. एक- रस्त्यांवरील बेशिस्त आणि दुसरा- रस्त्यांवरील अपघात आणि मृत्यू. रस्त्यावरील बेशिस्तीला सरकारचे कायदेकानून वापरून थोडेसे नियंत्रण आणता येईल; परंतु अपघात व मृत्यू यासाठी खास तंत्र वापरावे लागेल. नियतीने आपणास दोन पाय दिलेले आहेत. तिला हवे असते तर पायांच्या जागी ... Read More »

ऋणानुबंध ‘वाळुंज’चे

– सौ. पौर्णिमा केरकर प्रवासाची आवड एकदा का मनीमानसी भिनली की पावले आपोआपच वाट चालू लागतात. प्रवासाचे असे एक व्यसनच मनाला जडते आणि मग ओढ लागते वेगळ्या प्रदेशाची, तिथल्या संस्कृतीची आणि माणसामाणसांमधील वैविध्य अनुभवण्याचीसुद्धा. या भटकंतीत फक्त स्थळांचे, निसर्गाचेच सौंदर्य प्राशून घ्यायचे अशी चौकट काही घालून घेतलेली नाही. त्यामुळे इतिहास, संस्कृती, परंपरा समजून घेण्यासाठी केलेला प्रवास माणसाविषयी जाणून घेण्याच्या कुतूहलाने ... Read More »

प्रधानमंत्री जन-धन योजना २०१४

– शशांक मो. गुळगुळे बँकांच्या राष्ट्रीयीकरणापूर्वी बँकांचा व सामान्य जनतेचा बराच कमी संबंध होता. त्यावेळी काही विशिष्ट वर्गातील माणसेच बँकिंग व्यवहार करीत असत. राष्ट्रीयीकरणानंतर किंवा काही बँका सार्वजनिक उद्योगात आल्यानंतर, बँका तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून बरेच प्रयत्न झाले. पण आपल्या देशाचा एवढा अक्राळविक्राळ आकार व एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेली लोकसंख्या यामुळे वर्षानुवर्षे बँकांची तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया चालूच राहिली आहे. Read More »