अंगण

बापूजींस….

  – डॉ. सोमनाथ कोमरपंत बापूजी, तुमच्यावर आम्हा भारतवासीयांनी जीवापाड प्रेम केले. पण तुमच्या स्वप्नांवर? याचे उत्तर नकारार्थीच. तुमचे जीवनादर्श तुमच्या जाण्यानंतर या देशातून निघून गेले. साधनशुचितेची चाड कुणालाच राहिली नाही. सत्तेची चटक सगळ्यांनाच लागली. स्वातंत्र्य मिळून एकोणसत्तर वर्षे झाली, पण अन्न, वस्त्र आणि निवारा याबाबतीत आम्हाला अजूनही स्वावलंबी होता आले नाही. आपला राष्ट्रीय आत्मा जोपर्यंत तुम्ही बाळगलेल्या स्वप्नांच्या ध्यासाने ... Read More »

रचिला ज्याचा पाया त्याची बरी उभारणी झाली

मॅन मेड मिरॅकल- १ – सुरेश वाळवे आजवर हजारो गोमंतकीयांनी सिंगापूरला भेट दिली असेल अन् डझनावारी लेखकानी त्यावर प्रवासवर्णन स्वरूप लिहिलेही आहे. पण वेगळ्या दृष्टिकोनातून केलेले हे लेखन असून त्या चिमुकल्या बेटाच्या विकासाचे शिल्पकार ली क्वां यू यांनी हा चमत्कार कसा घडवून आणला, त्याची ही अलौकिक गाथा. आपल्या सर्वच राज्यकर्त्याना मार्गदर्शनस्वरूप ठरणारी. बाणसाय- कुडचड्याचे वाचकमित्र मारुती व श्रीवल्लभ या करमलीबंधूंनी ... Read More »

जागर देवीचा

– सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर आपल्या संस्कृतीतही ‘जिथे नारीची पूजा होते, तिथे प्रत्यक्ष भगवंतांचा वास असतो’ असे म्हटले आहे. या उक्तीप्रमाणे तिची पूजा केली की आपोआपच सर्व देवतांचं सान्निध्यही प्राप्त होतं. या स्त्रीशक्तीचा सत्कार, आदर म्हणजे नवरात्र. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते| आपल्या हिंदू धर्मात आध्यात्मिक जीवनशैलीला महत्त्वाचं स्थान आहे व त्यासंदर्भात देवादिकांचे सणवार-उत्सव ... Read More »

गोमंतविभूषण चित्रयोगी ः लक्ष्मण पै

– डॉ. गोविंद काळे ‘मेयो मेडल’ विजेते म्हणून कारकीर्द सुरू करणार्‍या लक्ष्मण पैंनी वयाची नव्वदी गाठली तरी ती आजही अथक सुरू आहे. कला समर्पित जीवन म्हणजे काय आणि कसे याचा चालता-बोलता आदर्श म्हणजे लक्ष्मण पै. रंगात ब्रश बुडविल्याशिवाय आणि कॅनव्हासला लावल्याशिवाय त्यांचा दिवस मावळत नाही. गोवा मुक्तीपूर्व काळ. १९४३ ते ४७ या पाच वर्षांच्या काळात मुंबईच्या सर जे जे स्कूल ... Read More »

विठ्ठलवाडी- अन्साभाट येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात साजरे होणारे उत्सव

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानात चैत्र महिन्यापासून उत्सवांना प्रारंभ होतो. संपूर्ण वर्षभर हे उत्सव देवस्थानात मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने आणि धार्मिक प्रथेनुसार प्रतिवर्षी साजरे केले जातात. श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानात चैत्र महिन्यापासून उत्सवांना प्रारंभ होतो. संपूर्ण वर्षभर हे उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, गुरुपौर्णिमा, श्रावणी बुधवार, नवरात्रौत्सव, काकड आरती उत्सव, तुकाराम बीज, दत्तजयंती, कोजागिरी पौर्णिमा आदी ... Read More »

स्वतंत्र बलुचिस्तान हा एकमेव पर्याय

– दत्ता भि. नाईक भारत सरकारवर जनतेने आता लोकमताचा रेटा लावून बलुचिस्तानला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले पाहिजे. आता युद्ध झाल्यास पुन्हा साहस करण्यासाठी पाकिस्तान जिवंत राहणार नाही हेही तितकेच खरे आहे. दि. १८ सप्टेंबर २०१६ रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी सीमाभागातील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर जबरदस्त मोठा हल्ला करून येथील विश्रांती घेणार्‍या जवानांच्या निवासामध्ये बॉम्बस्फोट घडवला. यात सतरा जवान जागीच मरण ... Read More »

अपारंपरिक ऊर्जा विकास आणि गोवा

– डॉ. प्रमोद पाठक आपल्या देशात २०२२ पर्यंत सुमारे १०० हजार मेगावॅट केवळ सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्‍चित केले आहे. त्याला धरून प्रत्येक राज्याला त्याच्या आकार आणि लोकसंख्येच्या प्रमाणात सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट दिले गेले आहे. गोवा राज्यासाठी हे उद्दिष्ट १५० मेगावॅट क्षमतेचे आहे. भारत पर्यायी ऊर्जा वापराच्या दिशेने सूत्रबद्धरीत्या आणि निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने पाऊल उचलतो आहे, हे ... Read More »

‘संतसाहित्य कथासंदर्भकोशा’च्या निमित्ताने

– डॉ. सोमनाथ कोमरपंत प्रा. आचार्य यांनी पुराणकथांचे संदर्भ शोधून ते नोंदविण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भग्रंथात प्रा. आचार्य यांचे व्युत्पन्नता, रसज्ञता आणि मांडणीचा साक्षेप हे गुण दिसून येतात. सांस्कृतिक संचिताच्या जतनासाठी तो भविष्यकाळात फलदायी ठरणार आहे, संतसाहित्याच्या सम्यक आकलनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. प्रा. मा. ना. आचार्य यांनी नुकताच ‘संतसाहित्य कथासंदर्भकोश’ साकार केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या आणि ... Read More »

पुरुषांच्या कार्यक्षेत्रात महिलांचा प्रवेश

– डॉ. मृदुला सिन्हा (अनुवाद : ऍड. अक्षता पुराणिक-भट) पुरुषांच्या कार्यक्षेत्रामधील महिलांचा प्रवेश प्रशंसनीय तर आहेच, पण त्यांनी ही उपलब्धी केवळ पुरुषांना श्रेष्ठ मानून प्राप्त केली असेल तर ती प्रशंसनीय नाही. पुरुषांच्या क्षेत्रामध्ये महिलांच्या पदार्पणाचे स्वागत पुरुषही करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. हल्लीच्या दिवसांत शिक्षण आणि विकासाच्या संधी घेऊन पुढे जाणार्‍या तरुणींमध्ये एक स्पर्धा दिसून येते. ती म्हणजे, पुरुषांच्या ... Read More »

भारत-अमेरिका करार ः नफ्याचा की तोट्याचा?

– प्रा. दत्ता भि. नाईक पाकिस्तान सीमेवर दैनंदिन युद्ध चालले तरीही ही सीमारेषा युद्धबंदी रेषा नसून नियंत्रणरेषा बनवली गेली. या पार्श्‍वभूमीवर या कराराचे अवलोकन केले तर यात भारताची बाजू लंगडी पडेल असे नाही, याउलट या करारामुळे एक मोठा समंध शांत केला जाणार आहे. आपल्या देशाला नफा होणार की तोटा हे काळच ठरवणार आहे. डिसेंबर १९९१ मध्ये सोव्हिएत संघराज्याचे विसर्जन झाले ... Read More »