ब्रेकिंग न्यूज़

अंगण

गोव्याने ‘इफ्फी’तून काय साधले?

– मिलिंद म्हाडगुत  २००४ साली ‘इफ्फी’ने गोव्यात प्रवेश केला. यंदाचा हा गोव्यातील अकरावा ‘इफ्फी.’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार म्हणून २००४ साली रसिकांत भरपूर उत्कंठा होती. त्यावर्षी २९ नोव्हेंबर रोजी अभिनेता दिलीपकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचे कला अकादमीत उद्घाटन झाले. ९ नोव्हेंबर २००४ रोजी या ‘इफ्फी’चा समारोप झाला होता. त्यावेळी पणजीत जवळजवळ लाख- दीड लाखाचा जनसमुदाय जमला होता. संपूर्ण ... Read More »

भाजपची सावध खेळी

– गुरुदास सावळ गोवा विकास पार्टीचे आमदार मिकी पाशेको यांची पावणेतीन वर्षांची तपश्‍चर्या अखेर फळाला आली. गोव्यात जे राजकारणी आहेत त्यांत मिकी हे सर्वात तापट आहेत हे आतापर्यंत घडलेल्या घटनांवरून सिद्ध झालेले आहे. वीज खात्याच्या एका अभियंत्याला मारहाणप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून पॅरोलवर सोडले होते. या प्रकरणी वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यात आले आहे. आपल्या मोटरीला बाजू न देणार्‍या कदंबाच्या एका ... Read More »

आनंदयात्री बा. भ. बोरकर : काही संस्मरणे

– डॉ. सोमनाथ कोमरपंत बा.भ. बोरकरांची कविता जशी अम्लान; तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आठवणे हे आनंददायी. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांचे नाव घेतल्याबरोबर मूर्तिमंत चैतन्य डोळ्यांसमोर उभे राहते. जवळजवळ पाच तपे अहर्निश कवितेच्या निर्मितीत ते मग्न राहिले. दैवदत्त प्रतिभेचा आनंदानुभव त्यांनी काव्यरसिकांना भरभरून दिला. अक्षरांच्या वर्षावात ते भिजत राहिले. रसिकांनाही त्यांनी भिजविले. अनेक वर्षाऋतू आले अन् गेले. काव्यभाषा बदलली. अभिरूची भिन्न भिन्न ... Read More »

शिव-शक्तीच्या मीलनाचे स्थान श्रीशैल

– सौ. पौर्णिमा केरकर मंजुनाथ आमच्या घराशी जोडला गेला तेव्हापासून मनात सतत आंध्र प्रदेशात एकदा तरी जाऊन यायला हवे हा विचार घोळत राहिला. आंध्र-कर्नाटकचा महत्त्वपूर्ण उत्सव म्हणजे दसरोत्सव; व या वर्षीच्या दसरोत्सवाला सलग चार दिवस सुट्टी मिळाल्याने ही संधी वाया घालवायची नाही हाच विचार करून आम्ही प्रवासाची तयारी सुरू केली. Read More »

परदेशी थेट गुंतवणुकीची वस्तुस्थिती

– शशांक मो. गुळगुळे गेले काही महिने भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसत आहे. केंद्र सरकारचे गुंतवणूक धोरण व सुधारणा प्रक्रियेला चालना यामुळे ‘जीडीपी’त सुधारणा दिसून येत आहे. गेल्या जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत ५.७ टक्के वाढ झाली. २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जास्त वाढ दिसून आली. Read More »

नवे क्षितिज

– विष्णू सुर्या वाघ ९ नोव्हेंबर २०१४ या दिवशी, मध्यान्हीच्या मुहूर्तावर गोमंतकीयांचे लाडके भाई, मनोहर पर्रीकर देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची शपथ घेतील तेव्हाच्या रोमहर्षक क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. तमाम गोमंतकीयांसाठी तो एका स्वप्नपूर्तीचा क्षण असेल. एक असं स्वप्न जे पाहायलाही एकेकाळी गोमंतकीय धजावले नसते. संख्याबळाच्या हिशेबाने चालणार्‍या देशाच्या राजकारणात अवघे दोन खासदार पाठवणार्‍या चिमुकल्या गोव्याच्या वाट्याला एक राज्यमंत्रिपद मिळाले तरी ... Read More »

पर्रीकर चालले, पण…?

– गुरुदास सावळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची इच्छा आणि पक्षाचा आदेश यामुळे मनोहर पर्रीकर यांना अखेर नमते घ्यावे लागले. पर्रीकर यांच्यासारख्या कर्तबगार नेत्याने गोव्यासारख्या छोट्या राज्यात न राहता राष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडावी असे नागपूरच्या संघनेत्यांना वाटत होते. त्यामुळे भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार या अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी पर्रीकर यांचे नाव पुढे केले होते. राजनाथसिंग यांच्याऐवजी मनोहर पर्रीकरच राष्ट्रीय ... Read More »

कथा एका ‘सदाशिवा’ची

– रामनाथ न. पै रायकर नशीब ही चीजच मुळी अजब आहे. एखाद्याची कुठल्याही क्षेत्रातील कारकीर्द शेवटपर्यंत फुलतच नाही, तर काहीजणांना ती सुरुवातीलाच बहरण्याचे भाग्य लाभते. परवाच अकाली निधन झालेले नाट्य तसेच चित्रपट कलावंत सदाशिव अमरापूरकर यांचा समावेश आपण अशा दुसर्‍या गटातील भाग्यवंतांमध्ये करू शकतो. एखाद्या मराठी माणसाने हिंदी मुलूखात घेतलेली नेत्रदीपक झेप बघायची झाल्यास अमरापूरकरांच्या कारकिर्दीचे उदाहरण द्यावे लागेल. Read More »

मठग्राममधील विराट वटवृक्ष

– डॉ. सोमनाथ कोमरपंत मडगाव शहराला समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. १९१० नंतरच्या कालखंडात गोमंतकात सांस्कृतिक उत्थानाचे नवे पर्व निर्माण झाले. त्याची परिणती म्हणून येथे सामाजिक, वाङ्‌मयीन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्‍या अनेक संस्था स्थापन केल्या गेल्या. सुशिक्षितांची पहिली पिढी सृजनशील साहित्यनिर्मितीकडे वळली. मडगावमध्ये ध्येयवादी तरुणांच्या अंतःप्रेरणेने ‘गोमंत विद्या निकेतन’ ही संस्था निर्माण झाली. आज शतकाची परिक्रमा पूर्ण ... Read More »

काळा पैसा : एक आव्हान

– शशांक मो. गुळगुळे रतीय अर्थव्यवस्थेत फार मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी पैसा आहे हे जगजाहीर आहे. या पैशांचे प्रमाण इतके मोठे आहे की या बेहिशेबी पैशाने देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. बेहिशेबी पैशांचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे, भारतीयांनी परदेशी बँकांत दडविलेला पैसा. हा पैसा ठेवण्यामागची कारणे म्हणजे, ज्या पैशांचा स्रोत जाहीर करणे शक्य नाही किंवा भारतात आयकराचे दर ... Read More »