अंगण

घसरती टक्केवारी… वाढता गोंधळ!

– विष्णू सुर्या वाघ (भाग-२) भारतीय लोकशाही ही सांसदीय स्वरूपाची आहे. राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा या तीन संस्था मिळून आपली संसद बनते. या तिन्ही संस्था निवडणुकीद्वारे अस्तित्वात येतात. मात्र प्रत्येक ठिकाणी वापरली जाणारी निवडणुकीची पद्धत वेगवेगळी असते. भारतातील सांसदीय लोकशाहीचा आराखडा हा प्रामुख्याने ब्रिटनमधील लोकशाहीच्या धर्तीवर आधारलेला आहे. ब्रिटनमध्ये जसे ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आहे, तशीच आपली लोकसभा आहे. तिथे ‘हाऊस ... Read More »

एका शिक्षिकेची शिदोरी : आनंददायी अध्यापनक्रियेची अनुभूती

– डॉ. सोमनाथ कोमरपंत  आपल्या जीवनप्रवाहातील शिक्षण ही निरंतर प्रक्रिया होय. भविष्यकालीन जीवनाची ती प्रयोगशाळा होय. शिक्षक हा नव्या पिढीचा शिल्पकार. संस्कारक्षम वयात आपल्या विद्यार्थ्यांना तो योग्य प्रकारचे वळण लावून त्यांना घडवितो. कार्यक्षम बनवितो. अध्ययनप्रक्रिया आणि अध्यापनप्रक्रिया या एकमेकांना पूरक असतात. अध्यापन हे अध्ययनाचे प्रयोजक रूप. ‘आधी केले व मग सांगितले’ असा तो अनुक्रम आहे. शिक्षक आणि शिक्षिका अध्ययनशील असतील ... Read More »

‘जीएसटी’ने आर्थिक विकासाला चालना मिळेल?

– शशांक मो. गुळगुळे  माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी २००७ साली ‘वस्तू आणि सेवाकर’ म्हणजेच ‘जीएसटी’ (गुड्‌स ऍण्ड सर्व्हिसेस टॅक्स) करप्रणाली विधेयक लागू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती; मात्र मागील सरकारला हे विधेयक संमत करता आले नाही. या विधेयकाबाबतची चर्चा सुमारे गेली १५ वर्षे चालू आहे. सध्याच्या शासनाने मात्र हे विधेयक नुकतेच लोकसभेत सादर केले. Read More »

सरत्या ‘नमो’नाम संवत्सरावर नजर

– सुरेश वाळवे ‘घटका गेली, पळे गेली तास वाजे ठणाणा’ त्याप्रमाणे ३६५ दिवस सरून आता इ.स. २०१४ सालाची अखेर दृष्टिपथात आली आहे. जगभरात या वर्षामध्ये नाव घेण्याजोग्या शेकडो घटना घडल्या असतील. त्यांची जंत्री देण्याचा खटाटोप का? त्याऐवजी देश व प्रदेश यांच्यावर ओझरती जरी नजर टाकली तर राष्ट्रीय व प्रादेशिक रंगमंच अनुक्रमे ‘नमो’ आणि ‘मनो’ यांनी व्यापलेला दिसतो. सरत्या वर्षारंभी नरेंद्रमहाराजांचा ... Read More »

कोकणी अकादमीही खुली करा

– गुरुदास सावळ गोमंतक मराठी अकादमी कर्मचार्‍यांचे थकलेले नऊ महिन्यांचे वेतन मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि राजभाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वजरीकर अभिनंदनास पात्र आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मराठीबद्दल अत्यंत आत्मीयता होती. मराठी भाषा अस्खलितपणे आपल्याला बोलता येत नाही याची खंत त्यांना होती. कोकणी भाषेचा राजकारभारात वापर व्हावा म्हणून त्यांनी बरेच परिश्रम घेतले. कट्टर कोकणीवाद्यांना जे शक्य ... Read More »

भारतीय लोकशाहीचे स्वरूप आणि ब्रिटिश राजसत्तेचा प्रभाव

– विष्णू सुर्या वाघ (भाग- २) लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे लहान-मोठे धर्म, हजारो जाती, अगणित भाषा आणि आहारविहार, आचार-विचार, प्रकृती-संस्कृती यात असलेले विलोभनीय वैविध्य आणि तरीही ‘भारतीयत्वा’च्या सूत्राने बांधलेले असे राष्ट्र जगाच्या पाठीवर कुठेही नसेल. कोणी काही म्हणो, पण विचारांचे व उच्चारांचे जे स्वातंत्र्य ... Read More »

सरत्या वर्षावर एक नजर

– शशांक मो. गुळगुळे २०१४ हे वर्ष जवळजवळ संपत आले आहे. या वर्षाच्या मे महिन्याच्या मध्यावर विद्यमान सरकार केंद्रात विराजमान झाले. देशाच्या जनतेला विकासाची स्वप्ने दाखवल्यामुळे व लोकांना खराच विकास होईल असे वाटल्यामुळे हे सरकार सत्तेवर येऊ शकले. या सरकारच्या सुदैवाने जागतिक पातळीवर तेल/क्रूड ऑईलच्या किमती सध्या घसरल्या असल्यामुळे महागाई आटोक्यात आली आहे. पण या तेलाच्या किमती घसरण्यासाठी अमेरिकेने मुद्दाम ... Read More »

अजंठा : ऐतिहासिक वैभवाचा मानबिंदू

– सौ. पौर्णिमा केरकर अजंठा लेणी पाहण्यासाठी आम्ही औरंगाबादला जाण्याची तयारी केली ती अंगाची काहिली करणार्‍या वैशाख वणव्याच्या दिवसांतच. मे महिन्याच्या दिवसांतही महाराष्ट्रातील कोरड्या भागात जाण्याचे धाडस आम्ही सर्वांनी केले ते अभूतपूर्व अशी बुद्ध लेणी पाहण्यासाठीच! जाताना वाटेत ठिकठिकाणी डाळिंबाची शेती दिसली. काही ठिकाणी द्राक्षांचे मळे पाण्याअभावी अगदीच सुकून गेलेले दिसले. आमचा प्रवास होता बसचा. सूर्य वरून आग ओगत होता. ... Read More »

प्रेम, करुणा आणि सेवाभाव यांचा आविष्कार : ख्रिसमस

–  डॉ. पांडुरंग फळदेसाई  संतांच्या आणि थोर विभूतींच्या आयुष्यावर नजर टाकल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, ती म्हणजे, त्यांच्या वाट्याला आलेले खडतर जीवन. त्यांना आयुष्यभर उपसावे लागलेले कष्ट, खाव्या लागलेल्या खस्ता आणि तत्कालीन समाजाचा सोसावा लागलेला कडवा विरोध. या सर्व अडचणी पार करून ज्यांनी मानवजातीसाठी आपल्या आयुष्याचेच अग्निदिव्य केले, तेच पुढे संतपदाला पोचले. अशाच महामानवांना मागाहून देवत्व बहाल केले. Read More »

गोव्याचा राजकीय प्रवास

– गुरुदास सावळ गोवा मुक्त झाल्यास १९ डिसेंबर २०१४ रोजी ५३ वर्षे पूर्ण झाली. या ५३ वर्षांत गोव्यात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवर क्रांतिकारक घडामोडी घडल्या आहेत. ४५० वर्षांच्या पोर्तुगिजांच्या जोखडातून गोवा मुक्त करणार्‍या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला गोव्यातील मतदारांनी झिडकारले, त्यामुळे ‘अजीब है गोवा के लोग!’ असे उद्गार काढण्याची पाळी भारताचे भाग्यविधाते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आली. आज गोव्यात जे ... Read More »