ब्रेकिंग न्यूज़

अंगण

गोव्याचा राजकीय प्रवास

– गुरुदास सावळ गोवा मुक्त झाल्यास १९ डिसेंबर २०१४ रोजी ५३ वर्षे पूर्ण झाली. या ५३ वर्षांत गोव्यात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवर क्रांतिकारक घडामोडी घडल्या आहेत. ४५० वर्षांच्या पोर्तुगिजांच्या जोखडातून गोवा मुक्त करणार्‍या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला गोव्यातील मतदारांनी झिडकारले, त्यामुळे ‘अजीब है गोवा के लोग!’ असे उद्गार काढण्याची पाळी भारताचे भाग्यविधाते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आली. आज गोव्यात जे ... Read More »

भारतीय निवडणूक पद्धतीत बदल हवा की नको?

– विष्णू सुर्या वाघ (भाग१) आर्मांद गोन्साल्विस हा माझा एक हरहुन्नरी मित्र. कला अकादमीच्या अगदी समोर असलेल्या कांपाल भागात तो राहतो. टीपीकल ख्रिश्‍चन भाटकाराच्या जुन्या घरांसारखंच आर्मांदचंही घर अगदी ऐसपैस आहे. ऐसपैस म्हणजे तब्बल २८ खोल्यांचं! या घरात अर्मांद एकटा राहतो. मात्र त्याचं घर कधीच सुनं सुनं असत नाही. रोज ते पाच-पंचवीस माणसांनी तरी गजबजलेलं असतं. घरातली गजबज साहजिकच आर्मांदच्या ... Read More »

भारतीयांकडे संपत्ती किती?

– शशांक मो. गुळगुळे आपण नेहमी भारत देशाच्या आकडेवारीचा विचार करतो. अर्थात, भारत देशाच्या आकडेवारीत भारतीय नागरिकांची संपत्ती समाविष्ट असतेच. पण या लेखात आपण फक्त भारताचे जे १२० ते १२५ कोटी नागरिक आहेत त्यांची एकूण मिळून वैयक्तिक संपत्ती किती आहे ते पाहणार आहोत. भारतीयांकडे वित्तीय मालमत्ता १३४.७१ लाख कोटी रुपयांची आहे, तर फिजिकल मालमत्ता (म्हणजे स्थिर संपत्ती घर वगैरे, सोने, ... Read More »

घारापुरीची शैलगृहे

– सौ. पौर्णिमा केरकर लहानपणी बालभारतीचे पुस्तक अभ्यासासाठी वापरताना पुस्तकाच्या मुख्य पानाच्या आतील बाजूस असलेले तीन चेहर्‍यांच्या महेशमूर्तीचे चित्र सतत लक्ष वेधून घ्यायचे. त्या चित्राचा अर्थ त्यावेळी कळत नव्हता, परंतु ती मूर्ती मात्र सदैव आकर्षित करायची. मूर्ती एक पण तीन चेहरे. प्रत्येक चेहर्‍याची ठेवण वेगळी, काही वेगळे सांगू पाहणारी. ही महेशमूर्ती पाहण्यासाठी कधीकाळी मी तिथपर्यंत जाईन असा त्यावेळी विचारसुद्धा केला ... Read More »

कूळ-मुंडकार कायद्याचा सामाजिक व राजकीय मागोवा

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट गोमंतक मुक्तीनंतर प्रथमच म.गो. सरकारच्या अमदानीत १९६८ साली ‘जमीन महसूल कायदा’ अस्तित्वात आला. १९७० सालापासून या कायद्यांतर्गत जमिनीचे सर्व्हेक्षण सुरू झाले. या सर्व्हेक्षणानुसार गोव्यातील एकूण जमिनीचे मोजमापासह आराखडे आणि नकाशे तयार करण्यात आले. महाराष्ट्रातील ७ आणि १२ उतार्‍यांच्या धर्तीवर कुळांचे सर्वेक्षण करून १ आणि १४ चे उतारे तयार करून जमिनीची हक्कसूची तयार करण्यात आली. पण ... Read More »

युती तुटली तर मगो आणि भाजपाचेही नुकसान!

– गुरुदास सावळ मगोबरोबर काडीमोड घेण्याचा विचार भाजपाच्या काही नेत्यांनी चालविला आहे. पणजी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्याविषयीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा तसेच विविध राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्याने भाजपा नेत्यांचा आत्मविश्‍वास बराच वाढला आहे. गोव्यात तर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपा नेते वेगळाच विचार करू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा खिशात पडल्याने ... Read More »

औद्योगिक प्रदर्शने व परिषदा

– शशांक मो. गुळगुळे विक्री व खरेदीचे ठिकाण म्हणजे बाजारपेठ! अगदी पूर्वी गावात किंवा शहरांत एका विशिष्ट जागी व विशिष्ट दिवशी बाजार भरत असे व या बाजारात प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री चाले. त्याकाळी खरेदीसाठी पैसे लागत, पण जर पैसे नसतील तर ‘बार्टर’ पद्धती चालत असे. यात वस्तूंची अदलाबदल होत असे. पुण्यात वारांवरून पेठांची नावे पडलेली आहेत- सोमवार पेठ, मंगळवार पेठ ... Read More »

शृंगारशिल्प खजुराहो

– सौ. पौर्णिमा केरकर ‘हेमवती’ नावाप्रमाणेच रसरशीत यौवनाची. जणू रूपाची भरती आलेले तारुण्य घेऊनच ती तळ्यात स्नानाला गेली. तिच्या त्या तारुण्याने आजूबाजूचा परिसर तर शहारलाच, पण आकाशातील चंद्रही तिच्या रूपलावण्यावर भाळला. विरघळून गेला. तो तळ्यात उतरला. त्याने हेमवतीला आलिंगन दिले. ब्राह्ममुहूर्तावरच चंद्राने हेमवतीचे कौमार्य भंग केले. तिने तर शापच दिला. चंद्राने हेमवतीला सांगितले की आपल्या दोघांच्या संयोगाने जो पुत्र होईल ... Read More »

कूळ-मुंडकार कायद्याचा राजकीय व सामाजिक मागोवा

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट (पूर्वार्ध) गोव्याची पोर्तुगिजांच्या साडेचारशे वर्षांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक गुलामगिरीतून १९ डिसेंबर १९६१ या दिवशी भारत सरकारने केलेली लष्करी कारवाई व अनेक हुतात्म्यांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या अथक प्रयत्नामुळे मुक्तता झाली. मुक्तीनंतर गोव्यात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत जी क्रांती घडून आली त्याचे सारे श्रेय मुक्तीनंतर सतरा वर्षे अधिराज्य गाजवणार्‍या कै. भाऊसाहेब बांदोडकर व त्यानंतर ... Read More »

नाण्यांचा प्रवास…

– वरद सु. सबनीस मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या जडणघडणीसाठी योग्य बदल घडत गेले. इतिहासाचा मागोवा घेताना अशा घटनांकडे जरा व्यापक दृष्टिकोनाने पाहावे लागते. कारण या घटनांची व्यापकता, परिणाम हा दीर्घकाळ टिकणारा असतो. उदाहरणार्थ, सुमारे १० हजार वर्षांपूर्वी शेतीची कला माणसाने अवगत केली व आजतागायत ... Read More »