अंगण

जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांचा शिमगा!

– विष्णू सुर्या वाघ (भाग-१०) पणजीची पोटनिवडणूक कार्निव्हलच्या धामधुमीत पार पडली. आता शिमग्याच्या गदारोळात जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. पक्षीय पातळीवर होणारी राज्यातील ही पहिली निवडणूक असेल. तिचे फलित काय हे १९ मार्च रोजी स्पष्ट होणारच आहे. जिल्हा पंचायतीत पक्षीय राजकारण नको, अशी लोकभावना असतानाही तिची कदर न करता सत्ताधारी पक्षाने हा एकांगी निर्णय घेतला. कॉंग्रेस पक्षाने या प्रस्तावाला विरोध ... Read More »

बाबूश यांचा नवा पक्षपसारा…

– गुरुदास सावळ गोव्यात आणखी एका प्रादेशिक पक्षाची भर पडणार आहे. ताळगाव-सम्राट बाबूश मोन्सेरात यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याने नवा पक्ष काढण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला आहे. ‘बोले तैसा चाले’ अशी बाबूश यांची ख्याती असल्याने ते नवा पक्ष नक्कीच स्थापन करतील. बाबूश यांची राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. २००२ मध्ये त्यांनी प्रथम राजकारणात प्रवेश केला. सोमनाथ जुवारकर हे ताळगावचे ... Read More »

केंद्रीय अर्थसंकल्पात दडलेय काय?

– शशांक मो. गुळगुळे त्या शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. यंदाचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्रालयाने तयार केलेला नसून पंतप्रधान कार्यालयाने तयार केला आहे, अशी जोरदार चर्चा दिल्ली व मुंबईतील आर्थिक व औद्योगिक वर्तुळात आहे. अर्थसंकल्पाचे जेव्हा महत्त्वाचे काम चालू होते, त्या कालावधीत अर्थमंत्र्यांकडे दिल्लीच्या निवडणूक प्रचाराची सूत्रे देऊन, त्यांना दिल्लीत फिरायला लावण्यात आले ... Read More »

नेमाडे

– डॉ. वासुदेव सावंत सुवर्णमहोत्सवी ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्याला रा. रा. भालचंद्र नेमाडे यांच्या नावाने मिळाल्याची बातमी ऐकताच मराठी साहित्याचा एक अभ्यासक आणि नेमाडे यांच्या साहित्याचा निस्सीम प्रेमी म्हणून व्यक्तिश: मला खूप आनंद झाला. माझ्यासारख्या अनेक नेमाडेप्रेमी मित्रांनी ङ्गोनवरून त्यांच्या आनंदात मलाही सहभागी करून घेतले. नेमाडेंना पुरस्कार मिळाल्याचे ऐकल्यावर ते गोव्यात असताना लाभलेला त्यांचा सहवास, त्यांच्याशी केलेल्या (केलेल्या म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून ... Read More »

यह तेरा बयान गालिब…

– मनोहर रणपिसे मिर्जा असदुल्लाखान गालिब हे नाव उर्दू शायरांच्या मांदियाळीत ध्रुवतार्‍याप्रमाणे अढळपदी विराजमान होऊन, गेल्या १५० वर्षांहून अधिक काळ आपल्या तेजाने तळपते आहे. है और भी दुनिया में सुखन्वर बहोत अच्छे कहते है की गालिब का है अंदाज-ए-बयॉं और| स्वतःच्या अलौकिक काव्यशैलीविषयी गालिबने स्वतःच्या शेरात सांगितलेलं सत्य हे काळाच्या निकषावर सिद्ध झालेलं आहे. गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ ... Read More »

कूळ कायदा भाजपाच्या मुळावर?

– गुरुदास सावळ गोवा कूळ-मुंडकार संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून हरमलचे सदानंद वायंगणकर पणजी पोटनिवडणुकीत उतरले आहेत. पणजी ही पूर्वी गोव्याची राजधानी होती. त्यामुळे पणजीत कोणी कूळ किंवा मुंडकार उरला असे वाटत नाही. त्यामुळे कूळ-मुंडकार संघर्ष समितीने पणजीची निवडणूक लढविण्याचा निर्णय का घेतला हे कळत नाही. पणजीत कुळांचे कोणी हितचिंतक असलेच तर भाजपा-कॉंग्रेस युद्धात ते कुळांच्या प्रश्‍नाला दुय्यम स्थान देतील याबद्दल ... Read More »

आव्हान; लोकशाहीला बलवान करण्याचे!

– विष्णू सुर्या वाघ (भाग-९) भारतातील एकूण निवडणूक पद्धती कशी आहे तिचा साद्यंत आढावा आपण घेतला. या व्यवस्थेत कोणते बदल सुचवले आहेत तेही पाहिले. हे बदल कार्यान्वित केले तर लोकशाहीला सुदृढ व बलवान बनविण्यासाठी ते उपयुक्त ठरतील यात शंकाच नाही. मात्र प्रचलित व्यवस्थेत बदल एकाएकी करून चालत नाही. ते हळूहळू रुजवावे लागतात. स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजतागायत आपणाकडे ‘प्रथम पोचला तो ... Read More »

तेलाचे अर्थकारण

– शशांक मो. गुळगुळे  ऑगस्ट २०१४ पासून एकूण अकरा वेळा पेट्रोलच्या, तर ऑक्टोबर २०१४ पासून सात वेळा डिझेलच्या किमती कमी झाल्या. नोव्हेंबर २०१४ पासून या पदार्थांवरील एक्साईज ड्युटी एकूण चार वेळा वाढविण्यात आली. एक्साईज ड्युटीत चार वेळा वाढ झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झालेला कच्च्या तेलाच्या दराचा पूर्ण फायदा भारतीयांना मिळू शकला नाही. जून २०१४ मध्ये कच्च्या तेलाच्या एका बॅरलचे मूल्य ... Read More »

नाट्यसंगीताचा बुलंद गोमंतस्वर

– जनार्दन वेर्लेकर संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा एक वेधक, लोभस, हवाहवासा वाटणारा आकृतीबंध. ‘वेध तुझा लागे सतत मनी’ या नाट्यपदाप्रमाणे नाट्यसंगीत आणि संगीत नाटक यांचा दुहेरी वेध न लागलेला मराठी नाट्यरसिक विरळा. गोमंतभूमीने तर नाट्यसंगीत आणि संगीत नाटक या परस्परपूरक आकृतीबंधांवर जिवापाड प्रेम केले आहे. एवढेच नव्हे तर नाट्यसंगीताचा बुलंद गोमंतस्वर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आजतागायत निनादत ... Read More »

‘मोपा’चा वारू सुसाट…

– गुरुदास सावळ मोपा विमानतळ पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालावर गेल्या रविवारी मोपा विमानतळ परिसरात जाहीर सुनावणी झाली. मोपा विमानतळ समर्थक आणि विरोधकांत यावेळी बरीच जुंपली. गोवा पोलिसांनी पावलागणिक पोलीस ठेवल्याने या सुनावणीच्या वेळी हाणामारी झाली नाही. तीन हजार जनसमुदायासाठी हजारभर पोलीस उपस्थित होते. त्यामुळे कायदा हातात घेण्याची संधी कोणालाच मिळाली नाही. Read More »