ब्रेकिंग न्यूज़

अंगण

जर्मनीचा डंका

– सुधाकर नाईक रिओ द जानेरोमधील ऐतिहासिक मार्काना स्टेडियमवर गेल्या रविवारी ७४,७३८ फुटबॉलशौकिनांच्या सापेक्ष रंगलेल्या विश्‍व चषक महासंग्रामात, अंतिम लढतीत उमद्या जर्मनीने तूल्यबळ अर्जेंटिनावर मात करून चौथ्यांदा विश्‍व चषक अजिंक्यपदाचा मान पटकावला. विशेष म्हणजे दक्षिण अमेरिकेत विश्‍व चषक जिंकणारा पहिला युरोपीयन संघ बनण्याचा सुवर्णाध्याय फिलिप लॅहमच्या नेतृत्वाखालील जर्मनीने लिहिला. १९५४ (बेर्न, इंग्लंड), १९६४ (प. जर्मनी) आणि १९९० (रोम, इटाली), नंतर ... Read More »

प्रेमात पाडणारे पहलगाम

(चिनारच्या छायेत-५) – परेश वा. प्रभू अनंतनागहून मार्तंड ऊर्फ मट्टणमार्गे आपण पहलगामच्या रस्त्याला लागतो आणि काश्मीरचे खरे सौंदर्य आपल्यापुढे उलगडू लागते. समोर दोन्ही बाजूंनी उंच उंच हिमाच्छादित पर्वतशिखरे आणि त्यांना जणू टेकलेले, खाली उतरलेले निळेशार आभाळ आपल्याला गुंग करून सोडते. हिमाचल प्रदेशात मंडीहून मनालीकडे जाताना जशी बियास नदी आपल्या रस्त्याच्या कडेने अखंड खळाळत मागे जात असते, तशी येथे लिडार नदी ... Read More »

हे विश्‍वचि माझे घर… ऐसी मती जयाचि स्थिर!

– विष्णू सूर्या वाघ  दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातली सर्वात पहिली मोठी परीक्षा. आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावणारी, शाळेबाहेरच्या जगात तुम्ही कुठे आहात हे दाखवून देणारी, त्याचप्रमाणे भावी वाटचालीसाठी तुमच्या वाटेवर यशाच्या पायघड्या घालणारी अशी ही परीक्षा. साहजिकच दहावीच्या परीक्षेचं थोडंसं टेन्शन माझ्या मनावर आलं होतं. माझ्या परीनं माझा अभ्यास चालूच होता. गाईड तर मी वापरत नव्हतोच. पण जुन्या प्रश्‍नपत्रिका सोडवण्याचा परिपाठ ... Read More »

जीवन विमा पॉलिसीची दशसूत्रे

– शशांक मो. गुळगुळे तुम्ही जी जीवन विमा पॉलिसी घेता त्यात बरेच नियम समाविष्ट असतात. विम्याची पॉलिसी हा ‘डॉक्युमेंट’ असतो, म्हणजे तुम्ही व विमा कंपनी यांच्यातील करार असतो. विमा हे असे एकमेव वित्तीय इन्स्ट्रुमेंट आहे की ज्यातून तुम्हाला तीन फायदे मिळतात. पहिला फायदा म्हणजे तुमच्या जोखमीचे संरक्षण होते, दीर्घ मुदतीची बचत होते व कर वाचतो. Read More »